कृषी विज्ञान मासिकाने आमचे अज्ञान दूर करून प्रगती व समृद्धीचा मार्ग दाखविते

श्री. अविनाश नामदेव हांडगे मु.पो. चाटोरी, ता. निफाड, जि. नाशिक.
मोबा.९०११९६७७४१


चाटोरी येथे आमच्याकडे तीन एकर द्राक्ष बाग आहे. त्यात दीड एकर सोनाका व दीड एकर थॉमसन आहे.

मी पिंपळगाव येथे कांदा विक्रीसाठी कांदा घेऊन गेलो असता मार्केटमध्ये एका शेतकऱ्याशी ओळख झाली. तो शेतकरी सटाण्याचा होता. त्या शेतकऱ्याने कांदे उत्तम प्रतीचे होते. त्यावेळेस त्याने मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केल्याचे सांगितले.

मी त्या शेतकऱ्याने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी बद्दल ऐकले व नाशिक येथील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये जाऊन भेट दिली. विविध पिकांबद्दल माहिती घेतली. कृषी विज्ञान अंक घेतले. वर्गणी भरून कृषी विज्ञान अंक चालू केला. त्यातून माहिती घेऊन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करण्यास सुरवात केली व आता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधींची वेळोवेळी भेट होत असून मार्गदर्शन मिळत आहे.

चालू वर्षी मी माझ्या बागेच्या छाटणीच्या वेळेस पेस्टमध्ये १० लि. ला ३५० मिली जर्मिनेटर वापरले. परिमाणी प्रत्येक काडी व डोळे, फुट एकसारखी मिळाली. इतर वेळेस ती मिळत नव्हती. पोग्यात असताना जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर वापरले. परिणामी शेंडा फुट जोमदार निघाली. घड जिरू नये म्हणून थ्राईवर + न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. २०० लि. पाण्यासाठी याप्रमाणे घेऊन स्प्रे केला. परिणामी घड जिरणे थांबले. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताने पत्ती जाड, रुंद, कॅनॉपी जबरदस्त आली. इतरांच्या बागेच्या पत्तीत व माझ्या बागेच्या पत्तीत खूप फरक पडला. मी माझ्या बागेला अॅमिस्टारचा स्प्रे केला. पत्ती पिवळी झाली. त्यानंतर मी थ्राईवर, क्रॉंपशाईनरचा स्प्रे दिला. मला ४८ तासात पत्ती हिरवीगार झालेली दिसली. नंतर प्रतिनिधींच्या मार्गदर्शनानुसार डिपमध्ये वापर केला तर मणी सुटसुटीत मोठे होऊन घडाचा आकार वाढला, तसेच कांदा व गहू लागवडीच्यावेळी कल्पतरू खत वापरले तर त्यामुळे कांद्याची फुगवण चांगली मिळाली, तसेच गव्हाचाही उतारा एकरी १५ पोत्याचा मिळाला. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ही एक खरोखर उच्च प्रतीची टेक्नॉंलॉजी आहे. हे मी स्वत: हून अनुभवले आहे.