डाळींबासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा १००% रिझल्ट !

श्री. संजय गोरखनाथ इंगोले,
मु.पो. सालगाव, ता. परतूर, जि. जालना.
मोबा. ९५२७८३४४२३


माझ्याकडे सध्या ३ एकर डाळींब आहे. २ वर्षात झाडांची उंची ५ ते ६ फूट आहे. मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल कोणतीच माहिती नव्हती. डाळींबाची पानगळ करण्यासाठी औषध घेण्यास राजे फर्टिलायझर्स परतूर चांच्याकडे गेलो असता त्यांना विचारले पानगळीनंतर पुढे छाटणी केल्यावर फुल सेटिंग व डाळींबाची क्वॉलिटी मिळण्यासाठी कोणती औषधे चांगले रिझल्ट देतील ? यावर त्यांनी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती देऊन कंपनी प्रतिनिधी श्री. योगेश वाघमारे यांचा मोबाईल नंबर (९९९२१०१००६९) दिला. मी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते आमच्या प्लॉटवर येऊन प्लॉटची पाहणी करून पहिल्या फवारणीपासून ते फुल सेटिंगपर्यंतचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फवारणीचे वेळापत्रक दिले. यामध्ये पहिल्यांदा त्यांनी जर्मिनेटर ड्रीपद्वारे द्यायचे सांगितले व जर्मिनेटर, प्रिझमची बाग फुटण्यासाठी फवारणी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे वापर केला असता पांढऱ्या मुळीचा जारवा वाढून फुटवे व्यवस्थित व एकसारख्या प्रमाणात फुटले. त्यानंतर थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम व हार्मोनी चा स्प्रे केला. त्यामुळे पिकावर कोणत्याच प्रकारच्या बुरशीचा प्रादुर्भाव झाला नाही. झाडास जोमदार फुटवे फुटण्यास मदत झाली. नंतर थ्राईवर, क्रॉपशाईनरची फवारणी केली. एवढ्यावर फुलकळी भरपूर लागून सेटिंग होऊ लागले. सध्या माझा प्लॉट एकदम चांगल्या क्वॉलिटीचा आहे. कोणत्याच कीड व रोगाचा प्रादुर्भाव नाही. फळांच्या फुगवणीसाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर, सोबत न्युट्राटोन व राईपनर वापरल्याने फळांची फुगवण चांगल्याप्रकारे होत आहे. यावरून मी एवढेच सांगू शकतो की, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे हे प्रोडक्ट खरोखरच अमृत आहे. त्याचा शेतकरी बांधवांनी जरूर वापर करावा.