डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने 'सिद्धीविनायक' शेवग्याची यशस्वी लागवड

श्री. अजित एकनाथ पाटील,
मु.पो. सादळे, ता. करवीर, जि. कोल्हापूर,
मोबा. ९६५७८४७११८



मी शिक्षक असून घरची शेतीही करीत असतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर १ वर्षापासून चालू केला आहे. प्रथम काकडी, टोमॅटो, वांगी या पिकांवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घेतल्या व औषधांचा रिझल्ट पाहिला. तो अतिशय चांगला वाटला. त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या 'सिद्धीविनायक' शेवग्याची माहिती वाचली व शेवगा लावायचे ठरविले. १९ ऑगस्ट २०१४ रोजी मध्यम १२ गुंठे क्षेत्रात शेवग्याची लागवड केली. शेवगा लावल्यापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांची फवारणी दर १५ दिवसांनी आवश्यकतेनुसार केली. त्यामुळे रोपांची वाढ वाढ चांगली व सुदृढ झाली. परंतु २ ते ३ झाडांवर आळ्यांचे प्रमाण दिसल्याने प्रोफेक्स सुपर या कीटकनाशकाची फवारणी करून किडीचे प्रमाण आटोक्यात आणले. त्याचबरोबर प्रती झाड लागवडीच्या वेळेस २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत व ५ किलो शेणखत घातले. दर दोन महिन्यांनी २०० ग्रॅम कल्पतरू खत प्रतिरोप देत आहे. सध्या रोपांची वाढ सशक्त आहे व पहिला बहार लागण्यास सुरुवात होत आहे. त्यामध्येच आंतरपीक काकडी व वांगी लावली आहेत. अशा पद्धती ने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर चालू आहे. तरी माझे म्हणने असे आहे की, डॉ.बावसकर सरांची औषधे स्वस्त व खात्रीशीर रिझल्ट देणारी आहेत. त्याचबरोबर ती सेंद्रिय असल्याने शेती मालात अपायकारक घटक राहत नाही. बाजारात अशा सेंद्रिय शेती मालास चांगला भाव मिळतो. सेंद्रिय शेती उत्पादन मानवी शरीरास चांगले असल्याने आयुष्यभर सेंद्रिय औषधांचा वापर ठेवणार आहे.