संत्र्याला भाव नसतानाही आंबे बहाराचे संत्र्याचे मला मिळाले दर्जेदार उत्पादन व दुप्पट भाव

श्री.अशोकराव किसनजी गोरडे,
मु.पो.शें.घाट, ता. वरूड, जि. अमरावती - ४४४९०७.
मो. नं. ९४०४८५६३८५


मी गेल्या २ वर्षपासून नागपूरी संत्र्याच्या ६०० झाडांवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताचा वापर करीत आहे. आमच्याकडे १३ वर्षाची ६०० झाडांची संत्रा बाग आहे. जमीन काळी असून लागवड १८' x १८' वर केली आहे. बागेला पाट सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते. पुर्ण क्षेत्र विहीर बागायत आहे. आम्ही या तंत्रज्ञानाने आंबे बहार धरतो. जानेवारीच्या शेवटी अंबिया बहार फुटण्यास सुरुवात होते. त्यावेळेस त्यावर जर्मिनेटर व प्रिझम वापरतो. जर्मिनेटर व प्रिझम वापरल्यानंतर हमखास जोमदार फुट होते. जमिनीतून कल्पतरू सेंद्रिय खत प्रती झाड १ किलो देतो. तसेच गुंडीगळ होऊ नये यासाठी हरभऱ्याएवढी गुंडी झाल्यावर दुसरी फवारणी थ्राईवर, क्रॉपशाईनर व स्प्लेंडरची केली असता फळगळ कमी होते व फळांची शाईनिंग वाढते. किडीचा प्रादुर्भाव होत नाही. नंतर लिंबाएवढी फळे झाल्यावर तिसऱ्या फवारणीमध्ये न्युट्राटोन, राईपनर व क्रोपशाईनर वापरले असता फळांची साईज व शाईनिंग वाढली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीनुसार फवारणी व खत व्यवस्थापनामुळे संत्राची क्वॉलिटी व साईज वाढल्यामुळे चांगली मागणी असून इतर शेतकऱ्यांपेक्ष माझ्या संत्राला चांगला भाव मिळाला. या वर्षी आंबिया संत्राला भाव नसतांनाही आमच्याकडे नग पद्धतीने म्हणजेच हजाराने संत्री दिली जातात. यावर्षीचा दर ७०० रू./हजार असताना पंधराशे रुपये हजार या भावाने माझी संत्री विकली गेली.

संत्रा नर्सरीची पन्हेरी निरोगी म्हणून भाव अधिक

तसेच माझ्याकडे संत्रा नर्सरी पनेरी (५५०००) चा प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी पद्धतीने केला असता पनेरी या रोपट्याची वाढ व शाईनिंग चांगली झाली आणि त्याही रोपांना मला इतरांपेक्षा बाजारभाव जड मिळाला. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी पद्धतीने उत्कृष्ट दर्जाची १ नं. संत्रा कलम असल्याने माझ्या संत्रा पनेरीला आज भरपूर डिमांड आहे. योग्य मार्गदर्शन वेळोवेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. चंदन सर करीत असतात.