५० गुंठे झेंडू खर्च १। लाख उत्पन्न ३।। लाख

श्री. भास्कर पांडुरंग शिंदे,मु.पो. कार्वे, ता. कराड, जि. सातारा.
मोबा. ९५०३७०३१३४


फेब्रुवारी २०१४ मध्ये इंडस गोल्डन आणि यलोमॅक्स या वाणांचा झेंडू ५० गुंठ्यामध्ये लावला आहे. जमीन काळी कसदार निचऱ्याची आहे. त्यामध्ये लागवड ४।। फुटाच्या सरीला २ - २ फुटावर आहे. झेंडूची रोपे स्वत: तयार केली होती. ३० दिवसात रोपे तयार झाली. लागवडीनंतर ह्या झेंडूचा ५५ दिवसात पहिला तोडा २२ एप्रिल २०१४ ला केला. ४ थ्या दिवसाला फुलांचा तोडा करतो. सुरुवातीला ५० किलो माल निघाला. पुढे प्रत्यके तोड्याला मला वाढत - वाढत १००० किलो पर्यंत माल निधू लागला. आता पर्यंत (१८ जून २०१४) ११ तोडे झाले आहेत. सर्व फुले पुणे गुलटेकडी मार्केटला पवार पुष्प भांडार यांच्याकडे विकली. या फुलांना ५० रू. पासून ८० रू./किलो असा बाजार भाव मिळाला.

या झेंडूला कंपोस्ट खत ३० हजार रू., रासायनिक खते २० हजार रू., बियाणे १८ हजार रू. आणि मशागत मजूरी असा एकूण सव्वा लाख रू. खर्च झाला असून ३।। लाख रू. चे उत्पन्न मिळाले आहे.

सध्या झेंडूची अवस्था मोडकळीस आल्यासारखी झाली असून फुलकळी भरपूर आहे. मात्र ती पोसत नाही. फुलांची साईज बनत नाही. मी बी. एस्सी. केमिस्ट असून साखर कारखान्यात १५ वर्षे सर्व्हिस केली आहे. मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल बरेच ऐकले आहे. वाचन ही केले आहे. तेव्हा आज मार्गदर्शन घेऊन या झेंडूला पुन्हा नवीन फुट निघण्यासाठी फुले मोठी, घट्ट, आकर्षक दर्जाची मिळण्यासाठी सरांच्या मार्गदर्शनानुसार थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. घेऊन जात आहे.

सरांशी चर्चा करत असताना "सिद्धीविनायक" मोरिंगा शेवगा या पिकाबद्दल चर्चा झाली. तेव्हा चर्चेतून जाणवले की बऱ्याच प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीवर हे पीक मात करून दर्जेदार प्रतीचे उत्पादन व खात्रीशीर बाजारभाव मिळणारे हे पीक आहे. तेव्हा आमच्याकडे १ एकर क्षारपड जमीन आहे. त्यामध्ये ह्या 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड करून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ती यशस्वी झाल्यानंतर अजून ५ - ६ एकर 'सिद्धीविनायक' शेवगा लावणार आहे.

या क्षारपड जमिनीत भात, रताळी, गहू, सोयाबीन, मका ही पिके अत्यंत चांगली येतात. भात ४० क्विंटल, गहू २४ क्विंटल, सोयाबीन १४ क्विंटल/एकरी असे उत्पादन मिळते. फक्त उसाचे पीक या जमिनीत व्यवस्थित येत नाही. त्यापासून फक्त ३० ते ४० टन उत्पादन मिळते. रताळ्याचे पीक मात्र उत्तम प्रकारे येऊन चांगले उत्पादन मिळते. बटाटा या क्षेत्रात येतो. मात्र त्यावर करप्याचा प्रादुर्भाव जास्त होतो. तेव्हा अशा जमिनीत ह्या शेवग्याचा प्रयोग करणार आहे.

सध्या ४ एकर आडसाली १२ महिन्याचा ऊस आहे. तेव्हा याचे टनेज वाढीसाठी सरांनी सांगितल्या प्रमाणे जर्मिनेट थ्राईवर, राईपनर प्रत्येकी १ लि. २०० लि. पाण्यातून ठिबकद्वारे देणार आहे. तसेच ७ एकर लागणीच्या (१५ जून २०१४) उसाला जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. २०० लि. पाण्यातून सोडणार आहे. तसेच कल्पतरू सेंद्रिय खत एकरी २ बॅगा वापरणार आहे.