निरोगी भेंडीच्या यशाचे ३० एकरावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे तंत्रज्ञान

श्री. निवृत्ती रघुनाथ कळमकर,
मु पो. लवळे, ता. मुळशी , जि. पुणे,
मो:९८२२२ ३८४००


गेली १० -१२ वर्षा पासून आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत आणि कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करीत आहोत. सुरुवातीला भेंडीसाठी वापर केला होता. तेव्हा भेंडीवर व्हायरस, यलोव्हेन मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव इतरत्र जाणवत असताना आमच्या प्लॉटवर त्याचा प्रादुर्भाव झाला नाही, तसेच लालकोळी किंवा भेंडी किडकी, वाडकी होणे या विकृती आल्या नाहीत. भेंडीचा मालही दोन महिने चालू होता. भेंडी हिरवीगार, लवयुक्त, एकसारखी मिळत असल्याने पुणे मार्केटला माल १४ ते २० रू. किलो भावाने विकला जात होता. त्यावेळी प्रथमच केलेल्या भेंडीने या तंत्रज्ञानामुळे सुखद धक्का दिला. तेव्हापासून कांदा, बटाटा या पिकांनाही हे तंत्रज्ञान वापरले, तर चांगला अनुभव आला. तेव्हापासून कोरेगांव, ता. श्रीगोंदा (अ.नगर) येथील ३० एकर जमिनीवर हे तंत्रज्ञान वापरात आहे.

तेथे सध्या सोयाबीन ५ एकर १ महिन्याचे तूर ५ एकर, मटकी ५ एकरमध्ये आहे. तसेच राजापूर माठ (ता. श्रीगोंदा) येथे २८ एकर क्षेत्र नवीनच तयार केले आहे. त्यातील २ एकरमध्ये लाल कांदा पेरला आहे. तो एक महिन्याचा झाला असून ५ एकरमध्ये लागणीचा कांदा करायचा आहे. त्यासाठी बी टाकून रोपे १५ दिवसांनी झाली आहेत. या कांद्यासाठी आज सप्तामृत २ - २ लिटर आणि कल्पतरू खत ५० किलोच्या ५ बॅगा घेऊन जात आहे. सोयाबीन, तुरीलाही सप्तामृत फवारणी करणार आहे. २० - २५ जर्सी, होलेस्टेन फ्रिजीयन गाई पाळल्या आहेत. त्यामुळे दूधबरोबरचे शेतीसाठी घरचेच शेणखत उपलब्ध होते.