पाण्याचा ताण असूनही पिकाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची यशस्वी साथ

श्री. दत्तात्रय काळू पवार, मु.पो. अहिवंतवाडी, ता. दिंडोडी, जि. नाशिक


मी मागे वणी बसस्टॉंपवरून आपले 'कृषी विज्ञान' मासिक घेतले आणि घरी गेल्यावर संपूर्ण पुस्तक वाचून काढले. नंतर मी मिरची पिकासाठी वापर करण्याचे ठरविले. मिरचीचे बियाणे प्रथम जर्मिनेटरमध्ये भिजत टाकून नंतर वाफ्यावर टाकले. उगवण १० दिवसांनी १०००% झाली. रोप चार पानावर आल्यावर वाफ्यावरती झारीच्या सहाय्याने सप्तामृताची आळवणी घातली. रोपे तरतरीत राहिली. पिवळी पडली नाही. वाढ चांगली व नेहमीपेक्षा झपाट्याने झाली. रोप लागवडीस लवकर तयार झाले. मिरचीची रोपे जर्मिनेटरच्या द्रावणामध्ये बुडवून लागवड केली. लागवड झाल्यावर आठ दिवसांनी जर्मिनेट, थ्राईवर, क्रॉंपशाईनर एका पंपास ६० मिली याप्रमाणे घेऊन फवारणी केली असता रोपांची मर झाली नाही. रोपे लागवडीनंतर दरवर्षी उन्हाळ्यात माना टाकतात. पण या प्रक्रियेमुळे व फवारणीमुळे रोपांनी अजिबात माना टाकल्या नाहीत. पाणी आठ दिवसांनी संध्याकाळी देत होतो. लागवडीनंतर १५ -१५ दिवसांनी सप्तामृताच्या ३ फवारण्या केल्या. दुसऱ्या फवारणीतच फुलकळी लागली. फवारणी नियमित चालू असल्याने फुलगळ झाली नाही. माल भरपूर लागला होता. पहिला तोडा ८०० किलो निघाला. भाव १४ रू. किलो मिळाला. दुसऱ्या तोड्याला ९५० किलो मिरची निघाली. ती १६ रू. किलोने गेली. तिसऱ्या तोड्याला ११५० किलो निघाली. मिरचीचा तोडा आठ दिवसाला चालू असून अजून फुलकळी मागे आहे. आमच्याकडे पाऊस नसल्या कारणाने पाण्याचा ताण पडत असे. पण आपल्या सप्तामृताच्या फवारण्या करत असल्यामुळे तसे काय जास्त जाणवू दिले नाही.