वाळवीपासून नवीन कलमांची देखभाल व मुक्तता

श्री. गणेश पाटील,
मु.पो. पनवेल, जि. रायगड,
मोबा. ९९६७५८६६२७


दापोली येथून १०० हापूस व बाकी केशर, निलम, सिंधूची ५० अशी एकूण १५० कलमे आणली आहेत. ती मध्यम प्रतीच्या जमिनीत १५' x १५' वर १० जून २०१५ ला लावलेली आहेत. मी 'कृषी विज्ञान' मासिकाचा डिसेंबर २०१४ पासून वार्षिक वर्गणीदार आहे. त्यातील माहितीच्या आधारे ही लागवड केली आहे. आता पुढील नियोजनासाठी सरांचा सल्ला घेण्यास तसेच तंत्रज्ञान वापरण्यासाठी आज (१० जुलै २०१५) आलो आहे. याला सरांनी सांगितले, "प्रथम पत्येक रोपास अर्धा किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्या. तसेच याला पाऊस झाल्यावर आल्यात पाणी साठल्यावर त्यामध्ये एक - एक काडीपेटी प्रोटेक्टंट द्या. वाळवीचा प्रादुर्भाव असल्यास वाहत्या पाण्यात अथवा पावसाच्या अर्धा इंच साठलेल्या आळ्यातील पाण्यावर क्रुड ऑईल (खराब झालेले ऑईल - वंगण) १ थेंब टाकणे. दुसरी गोष्ट या झाडांच्या खोडाला चुना, मोरचुद, गेरू आणि प्रोटेक्टंट प्रत्येकी १ किलो २० लि. पाण्यात कालवून तागाच्या कुंच्याने लावणे. यावर मी सरांना विचारले, झाडाचे खोड हे सध्या अंगठ्यापेक्षा कमी जाडीचे आहे. यासाठी कसे वापरावे ? यावर सरांनी सांगितले, फर्निचर रंगविण्यासाठी जो १" बारीक ब्रश वापरतात, त्याने जमिनीपासून वरच्या फांदीपर्यंत खोड रंगविणे. काही कलमे ३ फूट, ४ फूट, ५ फुटाची असतील तेथे ती १।। फुटापर्यंत किंवा खालची फांदी जेथून निघते तिथपर्यंत म्हणजेच करड्या रंगाच्या जून खोडापर्यंत रंगविणे. वर जो फांदीच्या हिरवा रंग असतो तो करंगळीच्या आकाराचा असतो. या हिरव्या भागावर पावसाळ्यात उधई, मावा, पाने खाणारी आली झपाट्याने अटॅक करते. कारण या किडीस उन्हाळ्यात आणि जुनमध्ये पाऊस जरी झाला तरी लगेच किडीस खाण्यास काहीच नसल्याने ती अशा लागवड केलेल्या कलमांचे शेंडे खाते. सर्वसाधारण जेथे जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अधिक आहे. तेथे पावसाने सेंद्रिय कर्ब व पाण्याचा संयोग होऊन ह्युमस आणि सेल्युलोज, ह्युमिसेल्युलोज, कार्बोहायड्रेटस, लिग्मिन आणि सेंद्रिय कणांचा गाभा तयार झालेला असतो. या खाद्यावर जिवाणू पोसतात. याचे काही रूपांतर ह्युमिक अॅसिडमध्ये होते. या घटकांच्या वासाने वाळवी आकर्षिक होते. यासाठी वर सांगितलेला उपाय खोडाच्या जाडी व उंचीप्रमाणे खालून वर व वरून खाली चोहोबाजूने मिश्रण लावणे. मिश्रण लावताना दर ५ मिनिटांनी मिश्रण काठीने ढवळून घेणे म्हणजे असे एकजीव झालेले मिश्रण अधिक परिणामकारक ठरते.

कलमे नवीनच लावली असल्याने पाऊस पडण्यापुर्वी जर्मिनेटर ५०० मिली, प्रिझम ५०० मिली, थ्राईवर ५०० मिली, क्रॉपशाईनर ५०० मिली, न्युट्राटोन ५०० मिली, प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम १५० लि. पाण्यातून डबल (पानांच्या खालून व वरून) फवारावे. कारण या अवस्थेत पानांच्या खालून मावा किडीचा प्रादुर्भाव होत असतो. तसेच पोपटी कोवळ्या शेंड्यावर मावा, तुडतुडे, पाने खाणारी अळी ही गणपतीपर्यंत येते, तेव्हा सप्तामृताच्या फवारण्या दर महिन्यास घेणे. तसेच प्रोटेक्टंट हे अमावास्या व पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर फवारावे. म्हणजे किडीचा प्रादुर्भाव होत नाही किंवा झाला असल्यास तो आटोक्यात राहतो. जी कलमे ४ फुटाच्या वरची आहेत त्यांना मोहोर लागला तरी घाबरू नये. जर वानोळा घ्यायचा असेल तर ५ ते ७ फळे धरण्यास हरकत नाही. कारण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १ वर्षातच कोडी हिरवी गर्द, रसरशीत होऊन बुंधा हा पायाच्या अंगठ्यापेक्षा जाड होतो. झाडे निरोगी राहून पाने हिरवीगार रुंद, टवटवीत तयार होतात. जरी १ वर्षात फळे घेवू असे वाटत नसले तरी असा प्रयोग करण्यास हरकत नाही. कारण ज्ञान आणि विज्ञान हे रोज बदलत असते. ज्या काळ्या पाषाणात जेसीबीने खड्डे निघत नसताना ब्रोकरने खडक फोडून तेथे फपुट्याच्या मातीत पोयटा भरून त्यात आंबा लावला. तो प्लॉट सरांनी पाहिल्यावर सरांनी सांगितले होते की, या आंब्यास ३ वर्षात फळे लागतील आणि प्रत्यक्षात ती लागली देखील. (संदर्भ : कृषी विज्ञान, जुलै २०१५, पान नं. १०)

हापूस हा डेरेदारपणे वाढणारा असल्याने १५' x १५' अंतर जरी कमी वाटत असले तरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने झाडांची वाढ करून अनावश्यक फाद्यांची छाटणी करून आवश्यक त्या फांद्यात अन्नसाठा साठवून अनावश्यक पालवी वाढ थांबवून मोहोर काढून माल घेता येतो. आंब्याला आयुष्यात कधीच कल्टार वापरू नका. आपल्याला नैसर्गिकरित्या फळे घ्यायची आहेत. कल्टारने फळधारणा लवकर होते. मात्र नंतर झाडे निकामी होऊन फळे लागत नाहीत, ती मरतात.

झाडे डेरेदार होण्यासाठी भाद्रपदात शेंडा कधीही कट करू नये. कारण उन्हाची तिरीप त्यावर पडून त्याला भिरूड किंवा इतर किडी, काळी बुरशी लागू शकते. त्याने रोपे मरण्याची भिती राहते. तेव्हा पावसाळ्यात किंवा थंडीत शेंडा कट केल्यानंतर १ किलो शेणात ५० मिली जर्मिनेटर व १० ग्रॅम प्रोटेक्टंट कालवून कट केलेल्या भागावर त्या शेणाच्या मिश्रणाचा गोळा लावावा. म्हणजे शेंडा कापल्यावर जो रस निघतो आणि तो खाण्यास मुंगळे येतात व पुढे बुरशीचा प्रादुर्भाव होतो तो प्रादुर्भाव वरीलप्रक्रियेमुळे होत नाही.

आंब्यामध्ये कोथिंबीर, मेथी, पालक, काही प्रमाणात शेवग्याचे तसेच काकडी (शिराळा), दोडका, दुधी ही आंतरपिके घेता येतात. जोपर्यंत आंब्याची झाडे लहान आहेत. तोपपर्यंत या पिकांनाही वरीलप्रमाणेच फवारणी आपोआपच मिळते त्यासाठी स्वतंत्र फवारणी घ्यायची नाही. फक्त प्रमाण कमी जास्त होते ते मात्र लक्षात ठेवणे. यामुळे वेगळ्या फवारणीचा खर्च येत नाही. यासाठी नैपुण्य (Skill) असणारे मजूर असावेत. ते जरी अशिक्षित किंवा कमी शिकलेले असले तरी त्यांना दिलेल्या सुचनांचे त्यांनी काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ३ - ४ वर्षांनी पिकलेले आंबे चांगल्या दराने मुंबई मार्केटला जातील.

मी प्रयोगासाठी 'सिद्धीविनायक' शेवग्याचे एक पाकिट बी घेतले आहे. तेव्हा सरांना याची कोकोपीटमध्ये रोपे तयार करू का ? असे विचारले असता सरांनी सांगितले, "कोकोपीटमध्ये पोकळी अधिक असते. त्यामुळे हवा पाणी जास्त राहते. त्या पाण्याने शेवग्याच्या मुळ्या सडू शकतात. कारण शेवग्याच्या मुळ्या, पाने, फांद्या ह्या नाजूक असतात. मुळांना आधार न मिळाल्याने मेथी, शेपू, बडीशेपच्या काडीसारखी नाजूक राहतात. त्यामुळे ही रोपे पुढे कायम जागी लावताना मुळ व खोड नागेलीच्या वेलासारखी वेडी वाकडी होतात. तेव्हा ती दुखावली जातात. पांढऱ्या मुळ्या वाढण्यास बाधा येते. याला शेंडा निट न वाढल्याने काडीला आधार राहत नाही. वाऱ्याच्या झोताने वरचा शेंडा तुटून जातो. तेव्हा सरांनी सांगितले शेवग्यासारख्या नाजूक पिकांची रोपे तयार करण्यास कोकोपीट वापरू नये. चिलार, काटेरी डुरांटा, जांभूळ, सिताफळ, रामफळ, बोगनवेल अशी काटक झाडे जी उगवायला वेळ घेतात. त्यांची रोपे तयार करण्यासाठी कोकोपीट वापरण्यास हरकत नाही.

आंब्यास वरीलप्रमाणे तंत्रज्ञाना वापरल्यानंतर परत दसऱ्याच्या सुमारास दक्षिणेकडील ९ इंच ते १ फुटाची फांदी घेवून भेटण्यास येणे, तसेच मातीचे पृथ:करण करून आणणे म्हणजे त्याची पाहणी करून परिस्थितीनुसार पुढील मार्गदर्शन करता येईल.