डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या ३ फवारण्या व जमिनेटरचे २ आळवणी १।। एकरात ३० क्विंटल हळद उशिरा लावून लवकर निघाली.

श्री. ज्ञानेश्वर भोयर, मु.पो. अकोली, ता. उमरखेड, जि. यवतमाळ - ४४५२०७.
मो. ८६००३७६१२९


मी २०१५ पासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे. आपल्या कंपनीचे प्रतिनिधी सतीश दवणे हे आमच्या गावात मार्गदर्शनासाठी आले होते तेव्हा त्यांची भेट झाली आणि त्यांनी मला जर्मिनेटर, कल्पतरू व टेक्नॉलॉजी बद्दल माहिती दिली. त्यावेळेस मी त्यांना हळदीच्या बीजप्रक्रियेबद्दल विचारले. त्यांनी मला जर्मिनेटर १ लि. + हार्मोनी ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅमचे १०० लि. पाण्यात द्रावण करून त्यामध्ये बेणे बुडविण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी बेणे प्रक्रिया करून ७ जून २०१५ रोजी हळद लागवड केली. त्यामुळे बेण्याची उगवण १००% झाली. तसेच पांढरी मुळी जोमदार वाढली. मर प्रतिबंधक रोपे मिळाली. पांढरी मुळी जलद व भरपूर निघाल्याने वाढ झपाट्याने झाली. ज्या लोकांनी २५ ते ३० मे च्या दरम्यान लागवड केयी होती त्यांच्यापेक्षा आमची हळद चांगली उगवून वाढ चांगली होती. त्यांनतर १५ दिवसांनी जर्मिनेटर २५० मिली + थ्राईवर २५० मिली + क्रॉपशाईनर २५० मिली + हार्मोनी २०० मिली + नुवार १५० मिली + १०० लि. पाणी याप्रमाणे फवारले आणि जर्मिनेटर एकरी १ लि. याप्रमाणे ड्रेंचिंग केले. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ होऊन खोड व फुटव्याच्या जाडीत वाढ होऊन पाने निरोगी, हिरवीगार झाली. क्रॉपशाईनरमुळे पानांना शाईनिंग आली. तसेच बदलत्या हवामानापासून पिकाचे संरक्षण झाले. त्यांनतर ३० दिवसांनी थ्राईवर ३०० मिली + क्रॉपशाईनर ३०० मिली + हार्मोनी २०० मिली + क्लोरगार्ड ३०० मिली + स्प्लेंडर १५० मिली + १०० लि. पाणी याप्रमाणे दुसरी फवारणी केली. त्यानंतर तिसरी फवारणी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. + हार्मोनी ५०० मिलीची २०० लि. पाण्यातून फवारणी केली आणि जर्मिनेटर २ लि. १।। एकर क्षेत्राला सोडले. त्यामुळे माझ्या पिकाला इतर शेतकऱ्यांच्या पिकापेक्षा चकाकी, हिरवेगारपणा, फुटव्याची संख्या अधिक असून कंदांची कुज, डावणी, करपा, भुरी, असा कुठलाही रोग आला नाही. कंदकुज रोगाचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे ते माझा प्लॉट पाहण्यास येत असे व ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही काय फवारले आम्हालापण सांगा, असे म्हणत.

अशा प्रकारे आम्ही हळदीवर एकूण ३ फवारण्या व २ वेळा जर्मिनेटरचे ड्रेंचिंग केले असता १।। एकरातून वाळलेली ३० क्विंटल हळद उत्पादन मिळाले. यापुर्वी मला जास्तीत जास्त १७ ते १८ क्विंटल उत्पादन मिळत होते. या अनुभवातून यापुढे दरवर्षी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे ठरविले आहे.