हळदीची उत्तम उगवण, सोयाबीन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी यशस्वी

श्री. उत्तम नागोराव काळे, मु.पो. ब्राम्हणगाव, ता. उमरखेड, जि. यवतमाळ - ४४५२०६.
मो ९८५०८९०१८५


मी जि. प. शाळेवर शिक्षक आहे. माझ्याकडे वडीलोपार्जीत ४ एकर शेती आहे. गावाजवळ शाळा असल्याने सकाळी ७ ते ९ यावेळेत शेतीतील कामे करत असे. पण यामध्ये पारंपारिक पद्धतीने पिके घेत होतो. आमच्या भागातील कंपनी प्रतिनिधी श्री. सतीश दवणे यांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला हळदीच्या बीज प्रक्रियेबद्दल डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या जर्मिनेटरची माहिती दिली. त्यावरून सहारा कृषी केंद्र, ब्राम्हणगाव येथून जर्मिनेटर घेऊन गेलो. त्याची बेणे प्रक्रिया केली असता हळद नेहमीपेक्षा २- ३ दिवस लवकर व सर्व उगवली. या अनुभवावरून सोयाबीन या पिकावर डॉ.बावसकर तंत्रज्ञान आम्हाला वापरायचे आहे असे सतीश दवणे यांना सांगितले. कारण आमच्या भागात मागील ३ वर्षापासून सोयाबीन पिकावर यालोव्हेन मोझॅक हा रोग येऊन त्याने सोयाबीनची पाने पिवळी पडत असत. त्यामुळे सोयाबीन पिकाचा उतारा एकरी फक्त ३ ते ४ क्विंटल येत होता. जून २०१५ मध्ये सोयाबीन पिकाला पेरणी अगोदर कल्पतरू एकरी १०० किलो फोकून दिले. नंतर सोयाबीनला जर्मिनेटर + प्रोटेक्टंटची पेस्ट चोळून बीजप्रक्रिया केली. त्याने सोयाबीनची उगवण चांगली झाली. झाडे एकसारखी, निरोगी, हिरवीगार दिसत होती. मात्र उगवण झाल्यानंतर पावसाने ताण दिला. जवळपास २० - २२ दिवस पाऊस झाला नाही. मात्र कल्पतरू सेंद्रिय खत दिलेले असल्यामुळे जमीन भुसभुशीत राहून पिकाचा जारवा वाढून गारवा निर्माण झाल्याने पाण्याचो ताण सहन झाला. त्यामुळे झाडावर कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम झाला नाही. त्यानंतर पहिल्या फवारणीत जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ५०० मिली आणि प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम १५० लि. पाण्यासाठी घेतले. अशा प्रकारे १५ दिवसाच्या अंतराने २ फवारण्या केल्या. त्यामुळे सोयाबीनवर दरवर्षी येणाऱ्या येलोव्हेन मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव अजिबात झाला नाही. पाने हिरवीगार राहून दाणे एकसारखे मोठे वजनदार भरले. मागील २ - ३ वर्षपासून पावसाचा खंड पडत असल्याने पारंपारिक पद्धतीने एकरी ४ ते ५ क्विंटल सोयाबीन होत असे, मात्र या वर्षी पावसाची परिस्थिती दरवर्षी प्रमाणेच बिकट असूनही डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे एकरी ९ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले. यावरून चालूवर्षी देखील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरणार आहे.