सितारा १८ गुंठे, ८ ते ९ टन उत्पादन, २ लाख ७५ हजार !

श्री. स्वप्निल बाळासाहेब वर्पे,
मु. पो. कळंब, ता. आंबेगाव, जि. पुणे.
मोबा. ९९७०६३०३२८


मी २ वर्षापुर्वी १० डिसेंबर २०१० रोजी १८ गुंठ्यामध्ये सितारा मिरचीची लागवड ३' x १.५' वर केली होती. जमीन मध्यम प्रतिची असून पाणी ठिबकने देत होती. यावेळी प्रथमच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर मिरची पिकावर केला. मिरचीचे बियाणे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून लावल्यामुळे उगवण १००% झाल्याच्या सुरूवातीस आश्चर्यकारक अनुभव मिळाल्यानंतर पुढेही सप्तामृत फवारण्या करण्याचे ठरविले.

रोपांची लागवड केल्यानंतर १५ - १५ दिवसांच्या अंतराने जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ४० मिली आणि हार्मोनी २० मिली प्रति पंपास घेऊन पहिल्या दोन फवारण्या केल्या. त्यामुळे थंडी असतानाही मिरचीची वाढ जोमाने सुरू झाली. फुटवे निघू लागले. हार्मोनीमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. हवामान खराब असल्याने फुलगळ होऊ लागली. भुरी रोगाचा प्रादुर्भाव जाणवू लागला. म्हणून पुन्हा १५ दिवसांनी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट आणि हार्मोनीची फवारणी केली. त्याने भुरी रोग पूर्णता आटोक्यात आला. तसेच फुलकळीचे प्रमाण वाढून गळही थांबली. त्यामुळे फळधारणा चांगल्या प्रकारे झाली.

पुढे मिरचीचे पोषण होऊन आकर्षक चमक येण्यासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, सोबत राईपनर, न्युट्राटोन आणि हार्मोनीच्या फवारण्या चालू ठेवल्या. त्यामुळे झाडांवर फळांचे (मिरच्यांचे) प्रमाण वाढून दररोज तोडा करावा लागला. दररोज १५ ते २० गोणी (गोणी ४५ ते ५५ किलो वजनाची) म्हणजे ७०० ते ८०० किली मिरच्या निघत होत्या. मिरचीदेखील आकर्षक चमक असलेली सरळ, लांब, वजनदार होती. त्यामुळे मुंबई मार्केटला ३५ ते ४० रू. किलो भाव शेवटपर्यंत मिळत होता.

अडीच महिने तोडे चालू होते. या १८ गुंठ्यातून ८ ते ९ तन उत्पादन मिळाले. त्याचेपासून २ लाख ७५ हजार रू. उत्पन्न मिळाले. या अनुभवावरून इतर भाजीपाला पिकांवरदेखील डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे.