आपण जे लिहिलय तेच अनुभवलय !

श्री. भिकू बाबू पाटील,
मु. पो. वझरे, ता. सांगोला, जि. सोलापूर - ४१३३०८ .
मोबा. ९४२३३३४५४६


२०१० पासून २ - ३ वर्षे सतत शेवग्याची लागवड करत असून शेवग्याला एकरी ४० बैलगाड्या शेणखत मे महिन्यात दरवर्षी देतो.

लागवडीनंतर ३ फुटावरून शेंडा मारला. प्रदर्शनातून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुस्तकाचा फायदा झाला. यंदा २।। - ३ फुटावरून कोवळा शेंडा खुडला ४ - ५ फुटवे आले. फुटवे २-३ फूट झाल्यावर ते फुटवे पुन्हा खुडले तर झाड आंब्याच्या झाडासारखे डेरेदार झाले आहे. आठवड्याला शेंडा खुडतो. घरची ४- ५ माणसे आणि मजूर ४-५ असतात. तर ७ एकरात २२ लाख रू. आणि आंतरपीक वांग्याचे १० लाख असे ३२ लाख रू. उत्पादन मिळाले आहे, गेल्यावर्षी व्यापाऱ्यांचा संप असल्याने पुणे मार्केटला रस्त्यावर ८० रू. किलोने शेवग्याची ३० - ३० किलोची पोती विकली. दीड टन शेवगा एका दिवसात विकला. १ लाख २० हजार रू. कॅश विनाखर्चात २ तासात हातात मिळाले होते. त्यावेळी खूप आनंद झाला.

सरांच्या पुस्तकाने एवढा फायदा झाला. अजून तर औषधे वापरायची आहेत.

शेवग्यावर आतापर्यंत ट्रेसर हे एकच औषध डाऊ कंपनीचे फवारले. त्याने काळ्या आळीच बंदोबस्त झटपट होतो. २०० लि. पाण्यात ७५ मिली औषध वापरले की, शेवगा चांगला येतो शेवग्याला १ फुटावर नेटाफेमची इनलाईन ड्रीप आहे. व्हेंच्युरी बसविली आहे. पी - अॅग्रो कंपनीची ०:५२ :३४, १२:६१:० कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम नायट्रेट १ दिवसाड ३ किलो खते २०० लि. पाण्यातून सोडतो.

महिन्याला १८ हजार रू. असे ९ महिन्याला १ लाख ६२ हजार रू.ची खते वापरतो.

फॉल्कन कंपनीच्या १० व १२ फुट लांबीच्या २ कात्र्या नेल्या आहेत. त्याने शेंगा काढतो. रोज १ ते १।। टन माल कोल्हापूरला जातो. १५ ते ९० रू. भाव मिळाला आहे. कोल्हापूरला इतर खर्च कमी येतो. शिवाय भावही चांगला मिळतो.

सरांच्या मार्गदर्शनाने शेवग्यावर व्यवहारी पीएच. डी. करायचीय !

मला पुस्तकी पी.एच.डी. करायची नसून सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टीकल शेवग्यावर पी.एच.डी. करायची आहे. माझे वय ६० वर्षे आहे. ३ वर्षात आतापर्यंत ७ एकर शेवगा लावला आहे. लागवडीतील अंतर १२ x ६ फूट आहे. एकूण ४००० झाडे आहेत. १५ किलो अॅव्हरेज प्रत्येक झाडापासून मिळाले आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने २५ किलो अॅव्हरेज काढायचे आहे.