अत्यंत दुष्काळी भागात उन्हाळ्यात सर्वांच्या भगव्याची बाग जळून खाक, आमची मात्र टवटवीत, खर्च ४५ हजार, निव्वळ नफा २ लाख

श्री. दिलीप नारायण आवळे (सर),
मु. पो. पांगरी, ता. माण, जि. सातारा - ४१५५०८,
मो. ९८२२११११३०


माझे शिक्षण इलेक्ट्रोनिक्स डिप्लोमा आहे. माण खटाव हे दोन्ही तालुके १००% दुष्काळी असतात. पाऊस पडला तर पडला नाही तर दुसऱ्या वर्षाच्या पावसाळ्याची वाट पहावी लागते. मला शेतीची आवड असल्यामुळे मी दहिवडी - फलटण रोडवर पांगरी हद्दीत २ एकर क्षेत्रावर डाळींब या पिकाची लागवड करावयाचे ठरविले, शेती विषयाची आवड होती मात्र अनुभव नव्हता. मी डॉ.बावसकर सरांचे डाळींब या पुस्तकाचे वाचन करून त्यानुसार आपण डाळींब लागवड करावयाचे निश्चित केले. माझी इंग्रजी माध्यमाची शाळा पांगारी येथे असल्यामुळे त्या इमारतीच्या उभारणीसाठी आम्ही बोअर घेतले होते. त्यामुळे आम्हाला पाण्याची सोय झाली होती. मे २०१० साली बोअर घेतले. ऊन रणरण करीत असताना आम्हास बोअर घेवून पाणी लागले होते.

मी मार्च २०११ साली डाळींब या पिकाची लागवड करावयाचे ठरविले. आमची शेती पुर्ण खडकाळ. त्याठिकाणी फक्त गवत उगवत असे. त्यामुळे डाळींब लागवडीसाठी मला घरातूनच विरोध होता. पण माझ्या इच्छाशक्तीवर मी उन्हाळा सुरू होण्यापूर्वी डाळींब लागवड करण्याचे ठरविले. जात कोणती निवडायची तर आमच्याकडे भगवा जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे मी भगवा जातीची लागवड ऊन रणरण करीत असताना व कडक उन्हाळा असताना मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून सेंद्रिय शेती करावयाचे ठरविले. माझ्या बरोबर ज्यांनी डाळींब लागवड केली होती. त्यांची उन्हाळ्यात रोपे जळून गेली पण माझे एकही रोप जळाले नाही. याचे श्रेय सर्व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीस देईन.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केला नसता तर माझीही अवस्था त्यांच्या बागांसारखीच झाली असती. कडक उन्हाळ्यात बागेचे चांगल्याप्रकारे व्यवस्थापन करून पाणी दिले. त्याचबरोबर सप्तामृत व कल्पतरू वापरले, त्यामुळे परिसरातील कोणाचीही बाग उन्हाळ्यात हिरवी दिसत नसताना माझी बाग हिरवीगार दिसत होती. मी पुण्यात राहत असल्यामुळे डॉ.बावसकर सरांच्या ऑफिसमध्ये सतत संपर्कात होतो. तेथील सर्वांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन केले. मी २०१२ साली जुनमध्ये बाग ताणावर सोडली. कोणत्याही प्रकारची रासायनिक खते न वापरता आपण बहार धरायचा असे ठरविले. जुनमध्ये बाग ताणावर सोडल्यानंतर इथ्रेल न फवारता पुर्ण पानगळ झाली. ५ पोती कल्पतरू खत, निंबोळी पेंड १० पोती, ३ ट्रॉली शेणखत झाडांना खत म्हणून वापरले. जुलैमध्ये झाडांना पाणी दिले, चांगल्याप्रकारे नियोजन केल्यामुळे काडीमध्ये अन्नद्रव्ये तयार झाली होती. बागेला पाने कमी व कळी जादा निघाली होती. मादी कळीचे प्रमाण ८०% होते. झाडांची उंची कमी असल्यामुळे आम्ही ५० ते ६० फळे धरायचे ठरविले. झाडावर कोणत्याही प्रकारचा रोग नव्हता. फळे चांगली पोसली गेली. ३०% सुपर किंग साईज फळे होती. ५०% किंग साईज फळे होती. हे सर्व सप्तामृत वापरत असल्यामुळे शक्य झाले. आमच्या भागात पाऊसमान कमी असल्यामुळे बागेस पाणी कमी पडू लागले. त्यामुळे आम्हाला अडचण निर्माण झाली. तरी सुद्धा ३.५ टन माल मिळाला. सरसकट बाग ७० रुपये किलोप्रमाणे बागेवरच दिली. मला पहिल्या बहारास २,४५,०००/- रू. मिळाले मला त्यासाठी खर्च फक्त ४५,०००/- रू. एवढा आला. म्हणजे २,००,०००/- रू. नफा मिळाला. याचे सर्व श्रेय मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीस देत आहे.