जर्मिनेटर कापसाठी वरदान/जीवनदान !!

श्री. संदीपान बाबासाहेब जाधव,
मु.पो. मनुबाईजवळा, ता. गेवराई, जि. बीड.
मो. ९१६८११८८६१


मी एक सामान्य परंतु नवीन तंत्रज्ञान, नवीन प्रयोग आत्मसात करणारा शेतकरी आहे. मी नेहमी टरबूज, झेंडू, कापूस, खरबुज ही पिके घेतो. खरतर कापूस हे आमचे मुख्य नगदी पीक. मात्र मागच्या काही दिवसापासून या कापसावीरल नैसर्गिक संकटे वाढतच चालली आहेत. त्यामध्ये गुलाबी बोंड आळी, लाल्या, करपा इ. रोगांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्यामुळे कापसाचे सहज वाटणारे पीक दिवसेंदिवस क्लिष्ट होत चालले आहे.

चालू वर्षीच्या हंगामामध्ये मी झेंडू तसेच कापूस पीक घेतले. लागवड केल्यापासून सुरुवातीला कापसाचे चांगले पीक असल्यासारखे वाटले, परंतु नंतर काही दिवसांनी माझ्या कापसाची प्रचंड प्रमाणात मर चालू झाली व कापसाची उंची, वाढ थांबली. काय करावे सुचत नव्हते. मग मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी (अॅग्रो) प्रा. लि. कंपनीचे बीड जिल्हा प्रतिनिधी श्री. सतिश बुरंगे (मो. ८३०८८५१३८८) यांना फोन केला. त्यांचा आणि माझा अगोदरपासूनचाच परीचय असल्यामुळे मी त्यांना कापसावर होत असलेला प्रकार सांगितला व त्यांनी मला जर्मिनेटर एकरी १।। लि. ड्रेंचिंगमधून सोडण्यास सांगितले व ते स्वतः हिंदुस्थान अॅग्रो एजन्सी, गेवराई येथे आले आणि त्यांनी कापसावर पुन्हा कापसाचे पीक घेतल्यामुळे जमिनीतील बुरशी वाढत जाते व बुरशीच्या प्रादुर्भावाने पीक निस्तेज दिसून त्या पिकांना नवीन मुळ येत नसल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे सांगितले. मग मी ड्रीपमधून ३ लि. जर्मिनेटर २ एकर क्षेत्रात पंपाच्या साह्याने सोडले. सोडताना विश्वास बसत नव्हता की हे तर औषध साधे, कोणताही वास व रंग नसणारे दिसत आहे आणि बुरंगे साहेबांनी आपल्याला फसवले असे वाटले.

मात्र जर्मिनेटर सोडल्यापासून माझ्या कापसाची मर दुसऱ्या दिवशी बंद झाली व आठ दिवसामध्ये कापसाची उंची अपेक्षा वाढली. व्हेन्च्युरी नसल्यामुळे मी चार्जिंगच्या पंपाने जर्मिनेटरचे द्रावण सोडले. त्यामुळे ज्या ठिकाणी ठिबक लाईनला पंपाची नळी जोडली त्या लाईनला जर्मिनेटर पोहचले नाही तर त्या लाईनची मर झाली व इतर कापसाच्या तुलनेत त्या ओळीची उंची ही कमी दिसली आणि माझा गैरसमज दूर झाला व आता माझा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांवरील विश्वास प्रचंड वाढला आहे.

यानंतर मी माझ्या शेतीतील इतर पिकांवरही वापर करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करीन व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या कर्मचाऱ्याकडून अशीच सहकार्याची अपेक्षा करतो व धन्यवाद देतो.