हळदीला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरल्याने पीक नवीन असूनही उत्पादन व भाव चांगला

श्री. मंगेश भास्कररावजी डिवरे, मु.पो. गोधनी, ता. नागपूर, जीं. नागपूर- ४४११११.
मो. ९८२३०९३३६४


मी गेल्या २ वर्षापासून हळद या पिकाची लागवड करीत आहे. मी सध्या मु.पो. गोधनी, ता. जि. नागपूर येथे राहत असून मी पारडसिंगा, ता.काटोल, जि.नागपूर येथील श्री. रमाकांतजी बोबडे यांचे १ एकर शेत ठेक्याने (खंडाने) घेऊन त्यात गेल्या वर्षी हळद या पिकाची लागवड करून समाधानकारक उत्पादन घेतले.

माझ्यासाठी हळद पीक उत्पादन ही एक प्रकारची कसोटीची होती. कारण पारडसिंग या विभागात फक्त ४ ते ५ शेतकरीच हळद या पिकाचे उत्पादन घेत असत. त्यात मी हळद पीक घेणे म्हणजे एक नवीन प्रकारचा वेगळाच अनुभव होता. अशा परिस्थितीतही मी त्या भागात हाल घेण्याचे धाडस केले.

शेत तयार करताना प्रथम शेणखत टाकून शेताची मशागत केली आणि शेत हळद लागवडीस तयार करून घेतले आणि १५ ते २०१६ रोजी एक एकरमध्ये सेलम जातीची हळद लावली. हळद बेण्याची लागवड झाल्यानंतर मी थोडया प्रमाणात रासायनिक खताचाही वापर केला. त्यानंतर पिकावर येणाऱ्या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर रासायनिक औषधांचा वापर केला. पीक स्थिती ही जेमतेम होती.

अशा परिस्थितीत मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी (अॅग्रो) प्रा.लि. कंपनीचे प्रतिनिधी अंकुश वराडे (मो. ९८५०७८९०२३) यांनी सप्तामृत औषधांची माहिती दिली आणि त्यांचे फायदे समजावून सांगितले मग मी त्याप्रमाणे जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर व प्रिझम यांची फवारणी केली. त्यावेळेस मला चांगल्या परिणामाची अनुभूती आली. म्हणून पुढेही हळद वाढीसाठी प्रतिनिधींच्या मार्गदर्शनानुसार थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझमच्या फवारण्या केल्या. त्याने पिकाची प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे पीक एकदम तजेलदार दिसत होते. नेहमीचे हळद पीक घेणारे जे ४ -५ शेतकरी होते. त्यांच्या प्लॉटसारखा किंबहूना त्याहूनही सरस दिसत होता.

गड्डे लागतेवेळी पुन्हा प्रतिनिधींशी संपर्क साधून माहिती घेतली. त्याप्रमाणे थ्राईवर, क्रॉपशाईनर सोबत राईपनर, न्युट्राटोनच्या फवारण्या घेतल्या. त्यामुळे गड्डे वजनदार, निरोगी मिळाल्याचा अनुभव आला.

या १ एकरातून जवळपास १७ - १८ क्विंटल हळदीचे उत्पादन मिळाले. त्यावेळी पैशांची गरज होती म्हणून त्यातील ९ - १० क्विंटल हळद लगेच विकली. त्याला ४,००० रु./ क्विंटल भाव मिळाला. त्याचे ३५,००० रु. झाले होते आणि बाकीची हळद तशीच पॉलीश न करता साठवून ठेवली. एरवी पॉलीश करून हळद साठविली तर तिला कीड व बुरशी लागते. त्यामुळे माती लागलेली तशीच हळद आम्ही साठविली. त्याची १५ ऑगस्ट २०१७ नंतर विक्री केली. यावेळी भाव वाढलेले होते. ही हळद ६,००० रू. क्विंटल भावाने गेली. त्यावेळी पॉलीश केलेल्या हळदीला ७ ते ७,५०० रु. भाव होता. मात्र पॉलीश न करता आम्हाला ६,००० रु. हा चांगला भाव मिळाला. तर ही ८ क्विंटल हळद विकून ४८ हजार रु. झाले. ही हळद आम्ही दुसऱ्याचे १ एकर क्षेत्र ९ हजार रु. ठेक्याने घेऊन लावली होती. मात्र त्या शेत मालकाने आमचे हळदीचे उत्पादन पाहून यावर्षी त्यांनी आम्हाला ठेक्याने शेत न देता स्वतः हळद लावायचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्हाला ते क्षेत्र ठेक्याने मिळाले नाही. आमचे क्षेत्र कमी असून जमीन चिकट मातीची आहे. त्यामुळे यावर्षी अर्धाच एकर हळद लागवड केली आहे. या हळदीला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी चा सुरुवातीपासूनच वापर करत आहे.