सर्वस्वी नियोजन शेवग्याचे व मुल्यवर्धनाचे!

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


कर्नाटक, केरळ, आंध्र, गुजरात येथील शेवगा जेव्हा मार्कटाला येतो तेव्हा महाराष्ट्रातील शेवग्याचे भाव घसरतात. एरवी ते मार्च नंतर घसरतात आणि उन्हाळ्यात शेवगा हा पाचक पेक्षा रेचक ठरतो त्यामुळे मागणी कमी होते. थंडीत पौष्टीक भाजी बद्धकोष्टता दुर करण्यासाठी शेवग्याचा उपयोग होतो त्यामुळे मागणी वाढते, मात्र या थंडीच्या काळात बहार कमी लागतो परिणामी पुरवठा कमी झाल्याने शेवाग्याचे भाव वाढतात. जेव्हा भाजीपाला पाण्याच्या दुर्भिक्षतेने कमी येतो व उन्हाने दर्जेदार माल येत नाही. तरीही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने प्रतिकूल परिस्थितीत दर्जेदार उत्पादन शेतकरी घेत आहेत. पण जेव्हा उन्हाळ्यात पाणी कमी होऊन अशी परिस्थिती होते तेव्हा भाज्यांचे भाव कडाडतात व ते ४० रू. पासून ६० - ८० रू./ किलो होतात, अशा वेळी लोक कडधान्याकडे वळतात. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी नसल्याने तसेच खरीपातील भाजीपाला सप्टेंबरनंतर येतो. म्हणून जून ते सप्टेंबर या काळात शेवग्याचे भाव बऱ्यापैकी वाढतात.

दिवसेंदिवस लोकसंख्या तर वाढतच आहे. तसेच वेगाने वाढणारे शहरीकरण आणि दुष्काळी परिस्थिती अधिक असल्याने लागवडीखालील क्षेत्र उन्हाळ्यातील घटण्यापेक्षा १०% वर पोहचले आहे व खेड्यातील मजूर, ऊस तोडणीचे मजूर हे रोजगारासाठी शहराकडे धाव घेतात व त्यामुळे प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत कमी होऊन खेडेगावातील शेतमजूर वर्ग हा दिवाळीनंतर ते मे - जून पर्यंत हा स्थलांतरीत होतो व जमिनीला विसावा मिळतो किंवा पैशाअभावी त्या पडीक राहतात. अशामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने भाज्यांचे भाव कडाडतात. तर शेवग्याच्या बाबतीत नियोजन करताना विविध प्रकारच्या छाटणी, लागवडीचे अंतर, वाणांचा तुलनात्मक अभ्यास करून यावर उपाय शोधणे गरजेचे आहे.

या पिकावर भरपूर संशोधन करण्याची गरज आहे. हे पीक आणि या पिकाच्या शिफारशीतील जाती ह्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. त्यामुळे जातवार शेवग्यासाठी लागणारी योग्य जमीन व त्याला मिळणारा प्रतिसाद, लागवडीतील अंतर, शेवग्याचे विविध भाग (Morphology) रचना व त्याची आंतरीक रचना (Histology), अनुवंशिक गुणवत्ता (Genetics) आणि त्याचा विविध हवामानात जमिनीस प्रतिसाद, नंतर अनुवंशिकतेत विकिरण (Irradiation) करून किंवा जी. एम. (G.M) जातीमध्ये रूपांतर करून विविध हवामानाच्या पट्ट्यामध्ये याचे प्रयोग कसे अत्यंत गरजेचे आहेत. यासाठीविविध हवामान, जमिनीवर प्रयोगात्मक प्रात्यक्षिके (Multi Locational Demonstrations) करणे गरजेचे आहे. आम्ही गेले २५ वर्षाहून अधिक काळ संशोधन करून शेंगा हा साऱ्या जगाचा कल्पवृक्ष आहे व त्याचे घरटी एक झाड लावले पाहिजे. असे जर असेल तर शहरातील फ्लॅट संस्कृती सोडून मंडल. आणि तालुक्याच्या शहरात जिथे परस आहे तिथे या प्रयोगाची मुहुर्तमेढ करून प्रसार करून निरिक्षणे टिपणे हे आयुर्वेदिक वैद्यांनी करणे गरजेचे आहे. कारण याने २०० ते २५० रोगावर प्रतिबंध होऊन सार्वजनिक आरोग्यात याचा मोठा उपयोग होतो. पाणी आणि वातावरण (पर्यावरण) शुद्धीकरणात याचा मोठा नैसर्गिक आधार राहील. कॅन्सर हदयविकार डायबेटीस, मणक्याचे, हाडांचे विकार अशा अनेक दुर्धर आजारात याचा उपयोग होतो, असे वैद्यकशास्त्र सांगते. भारतपेक्षा परदेशात याच्यावर अधिक कळकळीने संशोधन केले जात आहे. खरे म्हणजे हा विषय एवढा उपयोगी आणि उपकारक आहे की, जागतीक आरोग्य संघटना (WHO) व संयुक्त राष्ट्र संघटनेने (UNO) साऱ्या जगातल्या प्रत्येक देशाने यासाठी स्वतंत्र खाते आणि संशोधन केंद्र निर्माण करायला हवे. यामध्ये जागतीक आरोग्य खाते, देशातील आणी राज्यवार आरोग्य खाते आणी वैद्यक शास्त्र (Medical Science) यांनी जर लक्ष घातले तर या शास्त्राचे योगदान औषध शास्त्र (Pharmacology) निर्मिती यात फार मोठे ठरेल व एरवी जगाचा अब्जावधी रुपये आलेल्या रोगावर उपाय करण्यावर खर्च करण्यापेक्षा थोडास खर्च शेवग्याच्या अंग व उपांगावर केल्यास सुदृढ शरीर आरोग्य व निरोगी मानारोग्य निर्माण करून शाश्वत आणि विकासावर उरलेला पैसा खर्च करता येईल. हे भारताला पटले तर आयुर्वेदाचा आधार घेऊन यावर सखोल संशोधन केले तर भारत जसा योगविद्येचा गुरु झाला तसे आयुर्वेद जगाचा मार्गदर्शक ठरेल. म्हणून विविध खात्यांनी एकत्र येऊन यापासून शेवग्याचे विविध अंगांचा शरीराच्या सुदृढ आरोग्यासाठी उपयोगात आणून तसे प्रयोग करून औषध निर्मितीचा आधार घेऊन जर याचा अभ्यासक्रमात समावेश करून तरुण पिढी प्रशिक्षित केली तर शेवग्याच्या मुल्यवर्धनाचे विविध पदार्थ (Nutraceuticles, Nutramul) हे निर्माण करता येऊन याचे कारखाने काढून शेवग्याचे प्रचंड मुल्यवर्धन करून तरुणांना व सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार आणि कारखानदारी उभारता येईल. या संदर्भामध्ये आम्ही काही जागतीक संदर्भ शेवग्याच्या पुस्तकात (सुधारित ६ वी आवृत्तीत) समाविष्ट केले आहेत. त्याचा संदर्भ व सविस्तर संशोधनासाठी उपयोग करून अनेक प्रकारचे शोध लावता येतील. तेव्हा उद्योजकता, संस्कृतविषयाची आवड असणारे तज्ञ, वैद्यक शास्त्रातील अभ्यासू आणि औषध शास्त्रातील संशोधन डॉक्टर, उद्योजक, कारखानदार यांनी या गोष्टीवर लक्ष केंद्रीत केले तर १० वर्षाच्या संशोधनातून जागतीक आरोग्य संघटनेला भारताकडे या संदर्भातील आदर्श म्हणून पाहण्याची संधी मिळेल आणि अधिक लागवड झाली व मालाचे भाव पडले अशी स्थिती उद्भवणार नाही. ऑनलाईन मार्केटींग प्रचलीत होईल. उत्पादकता वर्षभर व्यवस्थित उपलब्ध होईल. निरोगी आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक उपचार याला अथांग समुद्रासारखे व विराट आकाशासारखे जागतीक मार्केट उपलब्ध आहे. (संदर्भ :'सिद्धीविनायक' शेवग्याने बी.पी.(रक्तदाब) च्या ३ गोळ्या घेणारा मी १ गोळीवर आलो - श्री. तानाजी जाधव, मु.पो. तुरोरी, जि. उस्मानाबाद. मो. ९९७०५५५८७६) तेव्हा नैराश्याच्या गर्तेत न जाता नवीन बहूउपयोगी मुल्यवर्धन शिकण्याच्या सुत्राचा अवलंब करणे हे कारखाने, शिक्षणाचे, आरोग्याचे, देशाच्या समृद्धीचे, शाश्वत प्रगतीचे आर्थिक सुकाणू निट चालविण्यासाठी हे गरजेचे आहे.

शेवगा परवडत नाही असे सहसा होत नाही. कारण थोड्या काळात ४ ते ५ महिन्यात तो कुठल्याही पिकापेक्षा (फळपिके, भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य, तेलबिया यापेक्षा) दुप्पट पैसे मिळवून देतो आणि समजा लागवडीमुळे जर मदी आली तर त्यात जी आंतरपिके घेतली जातात ती आंतरपिके मुख्यपीक होऊन सहाय्यभूत ठरतात व शेवगा हा बोनस पीक होते असे अनेक प्रयोगात सिद्ध झाले आहे.

कृषी न्यायालये स्वतंत्र असावेत

शेवगा हे पीक तसे पाहिले तर साऱ्या देशाला नवीन आहे. तेव्हा याची लागवड करण्यापुर्वी प्रथम प्रायोगिक तत्वावर १० ते ५० बिया बांधाने अथवा शेतात लावून त्याचा वर्षभर अभ्यास करून त्यानंतरच व्यापारी तत्वावर लागवड तिही अर्धा ते १ एकराच करावी. म्हणजे उत्पादनातील संभाव्य धोके टळून खात्रीशीर उत्पादन मिळाल्यामुळे बियाणास दोष देण्याची वेळ येणार नाही. कारण शेवग्याचे उत्पादन हे जमीन, हवामान, पाणी अशा प्रकारच्या १८ गोष्टींवर अवलंबून असते. यातील एक जरी चूक झाली तरी त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे बी - बियाणे किंवा कृषी क्षेत्रातील न्यायनिवाडे करताना जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, ट्रायब्युनल तसेच ग्राहक मंचचे न्यायाधिश हे कृषी पदवीधरच असावेत, असे भारताच्या संविधानाने अधोरेखीत करून संसदेत विधेयक मंजुर करून तसे शेती शिक्षणासाठी निराळे कायदे निर्माण करून न्याय क्षेत्रातील भ्रष्टाचाराला तिलांजली देऊन शेतकऱ्यांना, बी - बियाण्यांच्या कंपन्यांना आणि निविष्ठा व सेवा विकणाऱ्यांना यथायोग्य न्याय व यथोचित संरक्षण मिळेल. धरणग्रस्त, शेतीतील तंटे बखेडे न्यायनिवाडे हेही हाताळता येतील. न्यायाधीशाची प्रथम पदवी कृषी अथवा पदव्युत्तर कृषी व नंतर कायद्याची पदवी दुसरी वा तिसरी म्हणजे या प्रश्नाने जर्जर झालेल्या पिढ्यानपिढ्या न्याय न मिळाल्याने त्यांच्यावर झालेल्या अमानुष्य अन्यायाला योग्य नाय वेळत मिळल्याने त्यांना सुखाचे दिवस येतील. जसा कृषी क्षेतासाठी स्वतंत्र देशाचे, राज्याचे, जिल्ह्याचे स्वतंत्र 'कार्यक्षम'? अंदाजपत्रक असले म्हणजे कृती आराखडा व प्रत्यक्ष झालेल्या कृतीचे 'अती दक्षतेचे व ऑडिटरचे रडार' वापरून होणाऱ्या प्रगतीचा अभ्यास करून संबंधीताच्या कामाचा आढावा घेऊन तिमाही बैठका घेतल्या म्हणजे संभाव्य धोके टळून आदर्शवत राज्यकारभार चालविल्याने रामाला रामराज्याची आठवण होईल व सारे देशाचे सेवक माझ्या 'हनुमानासारखे' आहेत असे त्याला वाटेल.

गेल्या १० वर्षात व विशेषत: गेल्या ४ वर्षात हवामानात प्रचंड बदल होत असून त्याचा परिणाम साऱ्या जगभर दिसत आहे. यावर ऑस्ट्रेलिया, हॉलंड, इस्त्राईल या देशात संशोधन चालू आहे. परंतु हे संशोधन विकसीत व अविकसीत देशात होणे गरजेचे आहे.

शेवग्यात फुल, फळ निर्मितीत याचे ठोक ताळे हवामानातील बदलामुळे निर्माण होणारी विकृती यावर उपाय, यावरील संशोधन शिफारशीसाठी करणे गरजेचे आहे. हे आम्ही व डॉ. एच.पी.सिंग Deputy Director General (Hort) ICAR यांनी 'Moringa : A Crop Of Future' हा सविस्तर इंग्रजी लेख कोईमतूर येथील शेवग्यावरील एका परिसंवादासाठी विचारमंथन (Think Tank) लिहिला तो आम्ही इच्छुकांसाठी नवीन शेवगा पुस्तकाच्या सुधारित सहाव्या आवृत्तीत छापला आहे. यावर बऱ्यापैकी कोईमतूर संशोधन झाले आहे.

कारखानदारी करताना संशोधन, विकास आणि मुलभूत संशोधन हे यशस्वी कारखानदारीचा मुळ पाया असतो. विज्ञानाच्या कानशीवर घासून तरुण पिढी परिसासारखे होतील. तेव्हा जसे अती प्रगत राष्ट्राची व्याख्या कमीत कमी जनता (३% ते ८%) शेतीवर अवलंबून राहणारी व ८५% जनता विविध क्षेत्रावर अवलंबून असते. या ८५% जनतेची अन्नाची गरज ते पुर्ण करतात. असे घडले तरच त्याला प्रगत राष्ट्र म्हटले जाते आणि नेहमीप्रमाणे एखादा कृषी क्षेत्रातील लेख लिहिताना त्याची सुरुवात करताना तसेच सतत भाषणातही सांगितले जाते की, भारताची ७०% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. तसेच अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे व तो अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे होणार नाही. तरच भारत हे प्रगत राष्ट्र होईल.

अडाणी शेतकऱ्याने निर्माण केली शेवग्यापासून उपयुक्त आरोग्यदायी औषधे व केली विक्री

वैद्यक शास्त्र हे जेव्हा शोध लावतील तेव्हा लावतील, परंतु आमच्या परिसंवादात शहादा (नंदुरबार) तेथील एका अडाणी शेतकऱ्याने सोबत लेखनिक आणून त्याने नोटस लिहून शेवगा लावला आणि मिक्सरमध्ये त्या शेवग्याच्या शेंगांच्या बियांची व मगजाची पावडर व तेल वेगळे करून ती पावडर अस्थीरोग /Qrthritis (हाडाचे विकार) आणि अॅसिडीटी Acidity (आम्लता) यावर प्रयोगात्मक २ ते ४ ग्रॅमची पुडी २० रू. प्रमाणे लोकांना दिली, त्याचा रिझल्ट आल्यावर तो शेतकरी आमच्याकडे आल्यावर त्याचे आम्ही अभिनंदन केले आणि त्याच्या विनंतीनुसार नाशिकच्या कृषी प्रदर्शनात आमच्या स्टॉलवर थोडी जागा दिली. तर ३ दिवसांच्या प्रदर्शनात या शेवग्याच्या बियांची पावडर विकून ८ हजार रू. मिळवले. हा जो प्रयोग आहे हा एवढा अफलातून प्रतिकुल परिस्थितीत यशस्वी होतो. तर थोडे सामान्यज्ञान, जेव्हा प्रमाणिक श्रम करण्याची तयारी, जिद्द, धोका पत्करण्याची तयारी आणि दांडगे निरिक्षण करण्याची प्रवृत्ती जर झाली तर या सर्व गोष्टींवर मात होऊन एक शेवगा उत्पादक शेतकरी काय घडवू शकतो (सिद्धीविनायक शेवगा पुस्तक चौथी आवृत्ती, पान नं. १४) हे उदाहरण म्हणून दिले आहे. पण तशीच गोष्ट कारली, दुधी, कोहळा, गजर, टोमॅटो, आयुर्वेदीक वनस्पतींची आहे. म्हणून हे सारे नुसत्या भारताच्याच समृद्धीसाठी नव्हे तर जगाच्या आरोग्यासाठी संशोधनाचे सुवर्ण पान ठरावे.

मागे शिरूर भागात सुधारित शेवग्याने काविळ होते. अशी अफवा पसरल्याने सुधारीत शेवगा शेंगा कोणी घेत नसल्यामुळे तो बाजारात उकीरड्यावर फेकला व गावरान शेवग्यास मागणी असते असे सांगितले. पीक काढून टाकावे लागल्याने एका शेतकऱ्याने सांगितले. तेव्हा खरे आहे त्यावर विश्वास न ठेवता शेतकरी आंधश्रद्धेचे बळी ठरतात. गेल्या २० - २५ वर्षात अशी १% ते २% च उदाहरणे घडली, पण ते क्षम्य नाही. मात्र जसे वाईट गोष्टीचा प्रसार होण्यास वेळ लागत नाही. तशा चांगल्या गोष्टी रूचायला व स्विकारायला अधिक वेळ लागतो. म्हणजे "जसे मैल्याचा वास मैलावरून येतो आणि उत्तराचा वास मनगटावर फाया लावल्यावर नाकाजवळ नेल्यानंतर येतो," असा सिद्धांत आहे. म्हणून शाश्वत विकास हा प्रयत्नांतरी परमेश्वरासारखा आहे आणि जलद विकास हा अविचारी, पायाजवळ पाहणाऱ्यांची विनाशाकडे नेणारी वाट आहे.