संकटे ही संधी मानून वाट काढण्याचा प्रयत्न व्हावा !

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


सध्याची दुष्काळी परिस्थती ही आहे हे खरेच आहे. पण इस्राईल देशात तर फक्त चार इंचच पाऊस पडतो. तेथे व्यापारी शेती केली जाते. येथे बाराही महीने उष्णता. जमीन निकृष्ठ आहे. तेथे गवताचे पातेही नाही. येथे मुंबईच्या काही भागातील व कोकणातील काही लोक ४०० वर्षापूर्वी स्थायिक झाले आहेत. त्यांना त्या जमिनी फुकट कसण्यासाठी व राहण्यासाठी दिल्या आहेत. तेथे प्रचंड चिकाटीने, जिद्दीने, नुसत्या कॉगरवर शेडनेट किंवा पॉलिहाऊसमध्ये फुलपिके, ढोबळी, वेलावरच्य उंच १० ते १५ फुटापर्यंत वाढणाऱ्या टोमॅटोच्या जाती केल्या जातात.

इस्राईलमध्ये आम्ही गेलो असता तेथे निवडुंगाची शेती करत असल्याचेही पाहण्यात आले. लाल रंगाच्या निवडुंगाला फळे वर्षातून एकदाच येतात. निवडुंगाच्या फळापासून खोकल्याची औषधे बनविली जातात. याची पाने अर्धा ते एक सेमी जाड, ४ ते ६ इंच रुंदीची आणि देठाजवळ १ ते २ इंचाची असतात. विशिष्ट असे निसर्गाने स्वसंक्षणासाठी दिलेले काटे असतात. हा काटा विषारी असतो. तो टोचला तर त्या ठिकाणी जखम होते. अशा प्रकारच्या निवडुंगाला रामफंजा म्हणातात.

२ वर्षापूर्वी आम्ही चीनमध्ये शांघायला गेलो असताना तेथे पॉलिहाऊसमध्ये कॅनेडियन शास्त्रज्ञाने केलेली माती विना शेती (Hydropanics) पाहण्यात आली. त्याने १०' x २०' च्या हौदात पाण्याची थोडी पातळी ठेऊन तेथे चेरी टोमॅटोच्या बियांना मोड आणून त्यांना १ ते १।। इंचाची मुळे, सोटमुळे, उपउप (केशाकर्षक) मुळे जेव्हा तयार होतात तेव्हा या टँकच्या वर ताराच्या जाळीचे चाळणी सारखे एक झाकण करून त्या छिद्रांमधून ह्या टोमॅटोच्या रोपांची मुळे पाण्यात सोडली जातात. त्या टँकमध्ये (तलावात) पाण्यामध्ये १६ प्रकारचे अन्न घटकांचे मिश्रण सोडले जाते व त्या द्रवयुक्त खतामुळे ते झाड त्या पाण्यावर वाढते. प्रत्येक ३ फुटावर ते झाड दोऱ्याने बांधून वर चढवले जाते. त्याला नेहमी प्रमाणे फळे लागतात व ही चेरी टोमॅटोची फळे १०० रू. पासून १५० रू./किलो दराने विकली जातात, असे आपणासही करता येते.

भारतातील शेती उत्पादने निर्यात करण्यासाठी आखाती राष्ट्रांचा दौरा इंडियन चेंबर्स ऑफ फॉमर्स इंडस्ट्रिज, चर्चगेट, मुंबई यांनी (मार्च १९९६ मध्ये) आयोजित केला होतो. तेव्हा तेथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खजूर, काळी खजूर, तपकिरी गोड खजूर पहिले. ते अतिशय कमी पाण्यात वाळवंटात येतात. याला १००० ते १५०० रू. किलो मक्का, मदीना या शहरात भाव मिळतो, हे आम्ही पाहिले. मात्र तेव्हा हे ही लक्षात आले की, खजूर हे पीक नुसते वाळवंटात येते असे नसून त्याच्या विविध जाती पाणी असणाऱ्या भागातही येऊ शकतात.

इस्राईलसारख्या देशात ते १२ ही महिने दुष्काळ असतो. मात्र त्यांनी जि चिकाटी जोपासलेली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. यामध्ये नाविण्य काही नाही फक्त परिस्थितीवर मात करता आली पाहिजे. इच्छा आहे तेथे मार्ग आहे, हे सिद्ध करण्यासाठी हे मार्गदर्शक उदाहरण म्हणून घेता येईल. ओस्ट्रेलियन शास्त्रज्ञ जेपधा गेटस यांनी जळगाव (पहूर) येथील दिलीप व प्रल्हाद देशमुख यांच्या केली बागांना भेट दिली असतांना अति उष्णता व कमी पाण्यावर चांगली केळी उन्हाळ्यातही घेतली हे आम्ही ऑस्ट्रेलिया व इस्राईलमध्ये शक्य केले नाही, असे सांगितल्यावर आम्ही हे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने शक्य करू शकलो असे देशमुखांनी सांगितले यावर डॉ. जेपधा गेटस म्हणाले, आपण तर भारतात प्रति इस्राईल निर्माण केलेय. (संदर्भ - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, कृषी मार्गदर्शिका पान नं. ७६) येथील सरकार व माणसेही आलेल्या संकटांना होकारार्थी चिकाटीने, प्रमाणिक कष्टाने मत करतात. तीच गोष्ट जपानची आहे. इस्राईलपेक्षा जपानची परिस्थिती खडतर आहे. ज्यावेळेस ऑगस्ट १९४५ मध्ये घणघोर दुसरे महायुद्ध चालू होते. तेव्हा अमेरिकेने हल्ला चढवून जपानची हिरोशिमा व नागासाकी ही शहरे अणूबॉंम्ब टाकून उद्धस्त केली. अशा विदारक अवस्थेतून प्रयत्न, धैर्य, मनोकामना, प्रबळ इच्छाशक्ती याच्या जोरावर त्यांनी ही उद्धध्वस्त शहरे पुन्हा इतकी नाविण्यपूर्ण वसविली की तेथे असे काही घडलेच नाही असे आता जाणाऱ्या लोकांना वाटते. तेथे दरवर्षी नव्हे तर आठवड्याला भुकंपाला सामोरे जावे लागते. कधी कधी त्सुनामीचा कहर होतो. मग ती इंडोनेशिया, हाँगकाँग ची बेटे असो. येथे समुद्रामध्ये ज्या विविध हालचाली होतात त्याने वाऱ्याचा वेग वाढून टायकून, सायक्लॉन होतात. ती जपानमध्येही होतात. म्हणजे इस्राईलपेक्षा अतिशय कठीण परिस्थितीत जपान देश वावरतो. तेथील लोक जीवन आपल्याला कसे जगायचे हे दाखवून देतात. त्यांच्याकडून कठीणाईतून वाट काढून प्रगती कशी करायची हे साऱ्या जगाने शिकले पाहिजे. मग भारत व महाराष्ट्राच्या दुष्काळ हा खेचाखेची करून देशाला व राज्याला अधोगतीला किंवा नैराश्येत शेतकऱ्यांना व आम जनतेला हात न देता ना उमेद करणे हे लांच्छनास्पद आहे. येथे प्रयत्नातून मार्ग काढले पाहिजेत. असे प्रयत्न, असे शास्त्रज्ञ या देशात कमी नाहीत, परंतु झटपट श्रीमंत होण्याच्या नादात मानव मानवतेला विसरलेला आहे. दुष्काळी भागातील माणसाला मदत, योग्य मार्गदर्शन करून दिशा दाखवून आर्थिक, नैतिक आधार देण्यापेक्षा देशाला संकटाच्या खाईत खोलखोल लोटत आहेत.

आम्ही राजस्थानसारख्या वाळवंटात यशस्वी प्रयोग केले आहेत. श्री. रोमीयो शिवबगस व्यास,
मु. कोंडल, ता. फलोदी, जि. जोधपूर. (राजस्थान)

मोबा. ०९६६०१७९७२० यांनी अनउपजावू अर्धा एकरातून १३ ते १४ क्विंटल कापसाचे उत्पादन घेतले आहे. (संदर्भ : कृषी - मार्गदर्शिका, पान नं. ६७) तसेच नागौर (राजस्थान) च्या वाळवंटात घनश्याम गौड मो. ०८२९०३४७३३५ यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भगवा डाळिंबाचा अभिनव प्रयोग यशस्वी केला आहे. (संदर्भ - कृषी विज्ञान, डिसेंबर २०१४, पान नं. १२) असेच पुणे जिल्ह्यातील संतवाडी आळे (ता. जुन्नर) येथील जगन्नाथ पाडेकर मो. ९७६६४५७०१६ यांनी

फपुट्याच्या मातीत कांदा, डाळींबासारखे पीक डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी करून निर्यात होते. याच्या उत्पन्नातून ते मजुराचा मालक झल्याने आम्हास सांगिलते, (संदर्भ - कृषी विज्ञान, ऑगस्ट २०१३, पान नं. ९) तसेच अनेक लोकांचा ऊस पाण्याअभावी जळला, पण २ महिने पाण्याची व्यवस्था नसताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केला त्यांचा ऊस नुसता हिरवा न राहता टनेज, उतारा दोन्हीही वाढल्याचे डॉ. पंकज शिंदे, सांगवी, ता. बारामती, जि. पुणे मो. ९८२२१९५१३५ (संदर्भ, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे ऊस पुस्तक, पान नं. ८९) तसेच श्री. प्रसन्न तबीब, उस्मानाबाद. मो. ९५२७७१८१३४, (संदर्भ - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे ऊस पुस्तक पान नं . ९०) यांनी सांगितले.

तेव्हा बडीशेप, गवारगम, मेथी, शेपू पाथरी भाजी (तण), एरंडी अशी जी कमी पाण्यावर येणारी पिके आहेत ती अशा परिस्थितीत घ्यावीत. मेथी, शेपू अशी पिके १८ ते २१ दिवसांत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने काढली आहेत. पिसर्वे ता. पुरंदर (पुणे) येथील विवेक कोलते. मो. ९६६५९२५०३७ यांनी कमी पाण्यावर ५ एकरात अक्षय्यतृतीयेच्या ८ दिवस अगोदर व अक्षय्यतृतीयेनंतर ८ दिवस तसेच पितृपंधरवड्याच्या ८ दिवस अगोदर व पितृपंधरवड्यानंतर ८ दिवस धना टाकून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कोथिंबीरीचे उत्पादन घेऊन ५ लाख रुपये मिळविले आहेत. (संदर्भ - कृषी विज्ञान मे २०१२, पान नं. १६) जालना, मराठवाडा, सोलापूरच्या कमी पाण्याच्या भागात चिंच, कवठ, बांबू, जांभूळ, सिताफळ, रामफळ अशी फळ झाडे लावावीत. बरबडा हे एक द्विदलवर्गीय तण चुनखडीयुक्त, हलक्या, तांबूस ते मध्यम करड्या रंगाच्या जमिनीमध्ये प्रचंड प्रमाणात आपोआप येते तेव्हा शेतकऱ्यांनी याचा हिरवळीचे खत म्हणून वापर करावा. त्याने जैविक नत्रात वाढ होईल व उपयुक्त रायझोबीयम बॅक्टेरियाच्या प्रमाणात प्रचंड वाढ होईल. दुष्काळामध्ये याच्या पानांची भाजी धरणावरचे कामगार खातात असे ऐकिवात आहे. तसेच भोकर, लिंबू, कवठ, बांबू ही काटक पिके आहेत. बांबूला तर वर्षानुवर्षे पाऊस नसला तरी चालते. तो फक्त आर्द्र हवेवर व पहाटेच्या गारव्यावर वाढतो. पाडव्याला नवीन बांबू गुढी उभारण्यासाठी काढल्यावर याला जुनमध्ये कोंब फुटतो. तेव्हा तो दिवसाला १ ते १।। फूट वाढतो. बोहरी लोक बांबूच्या कोंबाचे लोणचे करून खातात. ते ५०० रू किलो दराने विकले जाते.

चीन मध्ये जेथे पाणथळ जागा आहे तेथे तुती लावून तेथे रेशीम किड्यांपासून तयार होणाऱ्या कोषावर चायनीज सिल्क तयार करून ती वस्त्रे जगभर विकली जातात. असा अवलंब आपल्याकडे केला पाहिजे.

स्वित्झलँड असे राष्ट्र आहे की, त्याच्या डोंगराळ भाग व दुष्काळी परिस्थितीचा बाऊ न करता त्यांची अतिशय खुबीने पर्यटनाचा व्यवसाय जगप्रसिद्ध केला आणि तेथे कुठलेही पीक न येता तेथे घड्याळाचे घरोघरी उद्योग काढले आहेत. तेथील घड्याळे जगप्रसिद्ध असून जगभर निर्यात करतात. पर्यटनाच्या विविध संधी ते उपलब्ध करून ते जगभरच्या लोकांना आकर्षिक करतात.

भारताला तर कोकण भागात लाभलेला समुद्र ही निसर्गाची देणगी आहे. आपण नेहमी कोकणचा कॅलिफोर्निया करू असे सतत सभा भाषणातून सांगत असतो पण आम्ही कॅलिफोर्नियाचा भरपूर वैराण डोंगराळ भागही पाहिलाय, अन परवा कॅलिफोर्नियामध्ये प्रचंड भिषण महादुष्काळ सतत पडतोय असे वाचण्यात आले तेथे शेकडो कोटींचे नुकसान झालेय. गेले तीन - चार वर्षापासून हे होतय. म्हणून तेथे पर्याय शोधला जातो आणि त्यावर अमेरिकन लोक मात करतात. तशी अमेरिकेची आर्थिक परिस्थिती आता फार नाजूकच आहे. त्यामानाने आपली परिस्थिती चांगली आहे. तेव्हा भारतासारखी जैव विविधता नैसर्गिक संपत्ती. भौगोलिक ओळख (Geographical Identification) आपल्याला सहजरित्या निर्माण करता येईल. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सांगली जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत संवेदनशील अशा द्राक्ष पिकापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी जागतिक दर्जाचा १ नंबर ठरलेल्या द्राक्षाचे बेदाण्यात रूपांतर करून म्हणजे नुसते देशांतर्गत किंवा निर्यात योग्य द्राक्ष उत्पादन करून तेथे न थांबता त्याचे बेदाण्यात मुल्यवर्धन करून ते साऱ्या जगाला मार्गदर्शक ठरले आहे. असे काम डाळींब व शेवग्यात करणे गरजेचे आहे. विशेष करून भारताला लाभलेल्या १०० ते १५० आयुर्वेदीक वनस्पती यातील बहुतांश वनस्पती ह्या महाबळेश्वर, सातापुडा, विंध्य, वेस्टर्न घाट या भागात व देशाच्या विविध कानाकोपऱ्यात आहेत. आयुर्वेदीक शास्त्रज्ञांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

जीवनातील कुठलाही आधार नसताना. वडिलांचे छत्र नसताना पेपर विकून आपले स्वत:चे शिक्षण करून डॉ. अब्दुल कलाम यांनी केलेल्या संशोधनातून 'मिसाईल मॅन' म्हणून जगाच्या नकाशावर नावलौकिक मिळवला. अशी मुले आपण आजही पाहतो. त्यांनी जे धाडस केले आहे. जीवनामध्ये संकटालाच संधी मानून त्याचे यशामध्ये रूपांतर केले आहे. अशा सुज्ञ माणसांनी देशाला विकासाकडे नेले पाहिजे म्हणजे १० वर्षात नव्हे तर ५ वर्षात साऱ्या जगात भारत शक्तिशाली व बलवान होईल. थोडक्यात परिस्थितीवर मात करून संकटाचे रूपांतर संधीत करणे गरजेचे आहे.