खोडवा उसाचे व्यवस्थापन

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


महाराष्ट्र राज्यात दरवर्षी ऊस खोडव्याचे क्षेत्र साधारणपणे ४० ते ४५% असते. मात्र ज्या वर्षी पाण्याची उपलब्धता कमी असते त्यावेळी ऊस क्षेत्र कमी खोडव्याचे क्षेत्र कमी होऊन खोडव्याचे क्षेत्र वाढते. खोडवा उसास पुर्वमशागतीची आवश्यकता नसल्याचे वेळ, पैसा व श्रम वाचविणे शक्य होते. खोडवा पिकाची योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास लागवडीपेक्षा जास्त उत्पादन खोडवा उसापासून मिळते. बेणे व बेणे प्रक्रिया खर्चात बचत करता येते. खोडवा उसासाठी मुळे तयार असतात, त्यामुळे उसाचे फुटवे लवकर फुटतात. वाढ झपाट्याने होते व पक्वता लवकर येते. वरील सर्व फायदे असतानासुद्धा केवळ खोडवा पिकाकडे पहावयाच्या उदासीनतेमुळे फार मोठे नुकसान आपण करून घेत असतो. खोडवा उसाची वेळेवर आंतरमशागत, योग्य खते, औषधे, पाणी व्यवस्थापन याबाबत बहुतांशी शेतकरी अजिबात लक्ष देत नाहीत व त्याचा परिणाम खोडवा उसाचे उत्पादन कमी येण्यावर होतो. खोदाव्यापासून किफायतशीर उत्पादन मिळविण्यासाठी खोडवा पिकाचे काळजीपुर्वक व्यवस्थापन करणे गरजेसे आहे.

उसाचा खोडवा ठेवण्याचे फायदे

१) पूर्वमशागतीची आवश्यकता नसल्याने वेळेची पैशाची व श्रमाची बचत होते.

२) बेणे व बेणे प्रक्रिया खर्चात बचत होते.

३) खोडव्याच्या मुलांची वाढ झाल्यामुळे उसाची वाढ झपाट्याने होते.

४) उगवणीचा कालावधी लागत नाही.

५) लागवडीपेक्षा खोडव्यात लवकर पक्वता येते.

खोडव्याचे उत्पादन कमी येण्याची कारणे:

उसात नांग्या पडणे, हेक्टरी उसाची संख्या कमी असणे, रोग व किडींचा प्रादुर्भाव, दुर्लक्षित आंतरशागत, सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, उसाची तोड जमिनीलगत नसल्यामुळे आणि फेब्रुवारी नंतर तोडण्याच्या उसाचा खोडवा घेतल्यास उसाचे उत्पादन कमी येते. त्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवावा. कीड, रोग व तण विरहीत लागवडीच्या उसाचे आडसाली हंगामात कमीत कमी १५० मे. टन, पूर्व हंगामात १२५ मे. टन व सुरू हंगामामध्ये १०० मे. टन प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. पुर्व हंगामी उसाच्या खोडव्याचे सरू व आडसाली उसाच्या खोडव्यापेक्षा जास्त उत्पादन मिळते.

खोडवा पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी घ्यावयाची काळजी.

१) ज्या लागवडीची उसाची सुरूवातीपासूनची उगवण, वाढ चांगली व नोरीगी झालेली आहे तसेच फेब्रुवारी महिनाअखेर ऊस तुटून गेलेला आहे, अशाच उसाचा खोडवा घेणे योग्य आहे.

२) ऊस तुटून गेल्यानंतर ज्या ठिकाणी जमिनीलगत ऊस तोडणी झालेली नाही, अशा ठिकाणाचे बुडखे धारदार कोयत्याच्या सहाच्याने जमिनीलगत तोडून घ्यावेत. त्यामुळे जमिनीलगतच्याच डोळ्यातून जोमदार फुटवे वाढतात.

३) ऊस तुटून गेल्यानंतर बुडखे छाटून घेतल्यानंतर पाचट गोळा करून त्याचे कंपोस्ट तयार करावे.

४) ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांनी नांगराच्या सहाय्याने वरंब्याच्या दोन्ही बगला फोडून जमीन भुसभुशीत करावी.

५) बगला फोडून घेतल्यानंतर खतांचा पहिला डोस व पाणी द्यावे.

६) ऊस खोडवा पीक एक ते दीड महिन्याचे झाल्यानंतर खुरपणी करून तणांचा बंदोबस्त करावा.

७) दीड ते दोन महिन्याचे पीक झाल्यानंतर खताचा दुसरा हप्ता द्यावा व हलकी बांधणी करून घ्यावी.

८) साडेतीन ते चार महिन्यांनी खताचाशेवटचा हप्ता देवून मोठी बांधणी करून घ्यावी.

९) खोडवा पिकात ऊस पाचटाचे खत तयार केल्यास पाचट असलेल्या सरीमध्ये तणाचे प्रमाण अत्यल्प असल्याने खुरपणीच्या खर्चात बचत होते.

निरोगी, अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञान पुढीलप्रमाणे वापरावे :

१) पहिली फवारणी : (ऊस तुटून गेल्यावर २१ ते ३० दिवसांनी) : फुटवे चांगले निघण्यासाठी जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + १०० लि. पाणी.

२) दुसरी फवारणी : (३० ते ४५ दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + राईपनर १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो + १५० ते २०० लि. पाणी.

३) तिसरी फवारणी : (२ ते २॥ महिन्यांनी ) : थ्राईवर १ लि. + राईपनर १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो + १५० ते २०० लि. पाणी.

अति उष्णता वा अति पावसात क्रॉंपशाईनर १ लि वरील फवारणीत मिसळून फवारणी घ्यावी. फुटवे उशिरा निघत असतील व निडवा किंवा त्यानंतरचे खोडवे घेताना प्रिझमचा वापर करावा. मार्च ते जून काळात खोडकिडा व शेंडेअळी हमखास पडते. म्हणून सुरूवातीपासूनच सर्व फवारण्यात प्रोटेक्टंट वापरावे.

उसाच्या नेहमीच्या उद्भवणार्‍या समस्या व त्यावर उपाय :

जमीन पांढरी (शेडवट) व फुट पिवळी निघत असल्यास वरील फवारण्यामध्ये प्रिझम ५०० मिली वापरावे.

* अति पावसाने उसाची पाने पिवळी पडतात. पाने फाटतात, पाने कडेने सडू लागतात, अशावेळी किंवा काही वेळेस पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिक असल्यास ऐन उन्हाळ्यात पाण्याची पाळी १ महिन्याहून अधिक उशिरा द्यावी लागत असल्यास 'क्रॉंपशाईनर' सल्ल्याने वरील फवारणीत घ्यावे. अन्यथा वापरण्याची गरज नाही. राईपनरमुळे उसाची पेरे, टनेज व गोडी वाढते असा अनुभव आहे.

* ऊस लागवड अथवा ऊस तोडणी जर फेब्रुवारी मार्चमध्ये झाली तर ऐन उन्हाळ्यात फुटणाऱ्या कोंबावर शेंडे अळी, खोड किडीची प्रादुर्भाव होतो. उन्हाळ्यात या किडीला जगण्यासाठी इतर पिके नसल्याने ही कीड ऊस पिकाकडे वळते आणि हे पीक फस्त करते.

याकरिता पहिल्या दोन्ही फवारणीमध्ये प्रोटेक्टंटचा वापर हमखास करावा. कारण प्रतिबंधक उपाय हा कधीही फायदेशीर ठरतो डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधून परिस्थतीनुसार बदल करावा.

* ऊस हे काटक पीक असल्याने त्याला क्रॉंपशाईनर वापरण्याची गरज नसते. मात्र खोडवा फुटीच्या वेळी पाणी कमी - अधिक झाल्यास खोडवा फूट पिवळी पडते. तेव्हा 'क्रॉंपशाईनर' हे जर्मिनेटर, थ्राईवर, प्रोटेक्टंट सोबत वापरावे. दुसऱ्या फवारणीत फुटवे कमी असले तर थ्राईवर, प्रोटेक्टंटसोबत 'जर्मिनेटर' वापरावे, अन्यथा जर्मिनेटर वापरू नये.

* हवामान खराब असल्यास म्हणजे ऊस ८ ते १० महिन्याचा असताना तापमान ऑक्टोबर किंवा मार्च - एप्रिल या काळात वाढल्याने उसाच्या जुन्या जातीमध्ये तुरे आल्याचे आढळते. तेव्हा राईपनर वापरू नये, मात्र तापमान अनुकूल थंड असल्यास 'राईपनर' सर्व जातींमध्ये आवश्य वापरावे. त्याने उसाच्या जाडीत, पेऱ्याच्या लांबीत वाढ होऊन पक्वता, उसाचा उतारा, साखरेचा, गुळाचा उतारा, दर्जा वाढण्यास मदत होते.

* रासायनिक खतांचा तुटवडा असल्यास वरील दोन्ही फवारण्या केल्यानंतर बाळ बांधणीच्या वेळी थ्राईवर १ लि., राईपनर ७५० मिली, प्रोटेक्टंट १ किलोची २०० लि . पाण्यातून एक आणि त्यानंतर १५ ते २० दिवसांनी दुसरी फवारणी अशा एकूण ४ फवारण्या कराव्यात.

* डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरलेला ऊस हा ३ महिन्यात ५॥ महिन्याचा, तर ५ महिन्यात महिन्याचा आणि १२ महिन्यात १६ ते १८ महिन्याचा असल्याने परिसरातील लोकांना वाटते असा अनुभव आहे. एवढी जबरदस्त वाढ, काळोखी, पेऱ्याच्या संख्येत, लांबीत, जाडीत वाढ. वजन उतारा, साखर गोडी प्रकर्षाने जाणवते. (संदर्भ : डॉ. पंकजराव दादासो शिंदे, मु. पो. सांगावी, ता. बारामती, जि. पुणे. मोबा. ९८२२१९५१३५)

ऊस पक्वता व तोडणी : खोडवा १२ ते १३ महिन्यात पक्व होतो. उसाची तोडणी पक्वता चाचणी घेवून केल्यास जास्त साखर व उत्पादन मिळते. पक्व झाल्याची लक्षणे पुढीलप्रमाणे :

१) उसावर टिचकी मारल्यास धातुसारखा आवाज येतो

२) उसाच्या कांड्यावरील डोळे फुगलेले दिसतात.

३) उसाची बहुतांशी पाने पिवळी पडू लागतात.

ऊस तोडणी करताना खालील बाबी प्रामुख्याने विचारात घेणे आवश्यक :

१) ऊस तोडणी पूर्वी १० ते १५ दिवस पाणी तोडणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे साखरेची घनता उसामध्ये वाढते व सरासरी साखर उतारा वाढतो.

२) उसाची तोडणी जमिनीलगत करावी.

३ ) उसाच्या शेंड्याकडील भागात साखरेचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे वाढ्याबरोबर २ ते ३ कांडी ठेवणे आवश्यक आहे.

४) उसाची लवकर व सुलभ वाहतूक करण्यासाठी प्रत्येक शेतकर्याने आपला ऊस वाहून नेला जाईल असा रस्ता ठेवणे आवश्यक आहे.

५) ऊस तोडून झाल्यानंतर पाचटामध्ये चांगले ऊस असल्यास ते गोळा करून वाहनामध्ये भरून घ्यावेत. त्याचबरोबर वाळलेले, रोगट ऊस देऊ नये.