वेगळ्या वेळी लावलेल्या १० एकर पपईचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी उत्पन्न

श्री. पुंडलिक दौलत भडांगे,
मु. पो. पहुर , ता. जामनेर, जि. जळगाव.
मो. ९४२१६३८३६०


गेली १० वर्षापासून (२००१) तैवान ७८६ पपईची लागवड करतो आहे. दरवर्षी ८ ते १० एकर असते. लागवड फेब्रुवारी - मार्चच्या दरम्यान करतो. पाणी कमी असल्याने ही लागवड परवडते. त्याचबरोबर मे जून मधील वादळात आपली पपई लहान असल्यामुळे वादळापासून संरक्षण होते. त्याबरोबर पपईला ३ - ४ थ्या महिन्यात फुले लागून फळे लागण्यास सुरुवात होते. याकाळात पुर्ण फळाच्या पोसण्याच्या बहारात पाऊस असल्याने या ४ महिन्यात फळांचे चांगले पोषण होऊन उत्पादनात वाढ होते.

सप्टेंबरच्या लागवडीची फळे उन्हाळ्यात आल्याने त्याची वाढ कमी होते. भाव थोडा जादा मिळतो. मात्र वजन कमी मिळते. त्याचबरोबर सप्टेंबरच्या लागवडीचा माल जून पासून चालू होतो. या काळात आर्दतेमुळे बी कमी निघते. तेच फेब्रुवारी लागवडीतील माल १५ नोव्हेंबर ते एप्रिल अखेरपर्यंत चालतो. या काळात उन्हाळ्यामुळे (उष्णतेमुळे) फळात बियाचा प्रमाण वाढते, त्यामुळे वजन वाढते. एरवी जी एक गाडी १५ टनाची भरत असेल तर ही गाडी १८ टन भरते.

सप्टेंबरच्या लागवडीची पपई फळे शेवटपर्यंत गोल येतात. हीच लागवड फेब्रुवारी - मार्चमध्ये केली तर ३३ % गोल आणि ६७% लांबट फळे येतात व वजन जादा मिळते. त्याचबरोबर लांबट फळांना गोडी चांगली असते. चवीला चांगली असल्याने मागणी व बाजारभावही या लांबट फळांना जादा मिळतो.

सप्टेंबरच्या लागवडीतील पपई ही सुरुवातीला उशीराच्या पडणाऱ्या पावसात सापडते नंतर हिवाळा व माल पोसताना उन्हाळा असतो. हा संकरीत वाण असल्याने त्याला ८ व्या महिन्यात रोगाचा प्रादुर्भाव जाणवतो. शेंडा खराब होतो. फळांवर रिंग स्पॉट येतो. पाने पिवळी झाल्याने व गळून पडल्याने फळे पोसण्याची क्रिया थांबते. पीक धोक्यात येते.

मालास जम्मू, दिल्ली गोरखपूर, युपी, एमपीत मागणी

हीच लागवड मार्चची असेल तर फक्त उन्हाळा ३ महिने मिळतो. नंतर पावसाळा ४ महिने मिळतो. त्यामध्ये फुले फळांची पुर्ण वाढ होऊन जातो. पावसाळी वातावरण फळे पोसण्यास पोषक असते. पुढे हिवाळा असला तरी या काळात फक्त फळांचे तोडे चालू असतात. विशेष म्हणजे या काळातील (हिवाळ्यातील) फळांना बाहेरच्या राज्यात उदा. जम्मू, मदरडेअरी (दिल्ली), गोरखपुर, लखनौ (U.P.) मध्यप्रदेश या राज्यात मागणी मोठ्या प्रमाणात असते.

पपईच्या बियाला प्रथम जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून बी टाकतो. त्यामुळे उगवण ८५ ते ९० % होते. रोपे २ महिन्यात लागवडीस येतात. जमीन मध्यम काळी आहे. पाणी ठिबकने देतो. लागवड ८' x ८' वर असते. लागवडीला हजारी (दीड एकरला) सुपर फॉस्फेट ४ बॅगा, पोटॅश २ बॅगा देतो. त्यापुर्वी सऱ्या पाडण्याच्या अगोदर शेणखत एकरी ४ ट्रोली पुर्ण रानात फैलावून (पसरवून) देतो. त्यामुळे पाऊस झाल्यानंतर पपईच्या मुळ्या पुर्ण रानात पसरतात.

न्युट्राटोनमुळे प्लॉट व्हायरसमुक्त

लागवडीनंतर थ्राईवर, क्रॉंपशाईनर आणि बुरशीनाशक फवारतो. या काळात पाऊस असला तरी बुरशीचा प्रादुर्भाव टळतो. फवारणी दर महिन्याला घेतो. व्हायरसचा प्रादुर्भाव जाणवू लागताच न्युट्राटोन ची फवारणी घेतो. त्यामुळे प्लॉट व्हायरस मुक्त राहतो. पुढे फळे पोसण्यासाठी हजारी डी ए पी ४ बॅगा, पोटॅश २ बॅगा देतो. नंतर लगेच १ महिन्याने १०:२६:२६ ४ बॅगा देतो. यामध्ये सुक्ष्मअन्नद्रव्याचा वापर करतो. त्यामुळे फळांत सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता राहत नाही. फळांचे पोषण चांगले मिळते.

१५ नोव्हेंबरला तोडा चालू झाल्यानंतर दर १५ दिवसाला तोडा करतो. एप्रिल पर्यंत ९० ते १०० टनापर्यंत उत्पादन घेतो. माल बाहेरील राज्यातील व्यापारी शेतातून स्वत: मालाची तोडणी करून स्वत: पॅकिंग करून ४ ते ४।। रू. किलो भावाने नेतात. त्यामुळे हजारी (दीड एकरामध्ये) ३ लाख ७५ हजार ते ४ लाखापर्यंत उत्पन्न मिळते.

चालूवर्षी फेब्रुवारी अखेरीची १० एकर लागवड करायची आहे. त्यासाठी तसेच पपईची स्वत: ची नर्सरी असल्याने तैवान ७८६ पपईचे ४ किलो (४०० पाकिटे) बी घेण्यास आलो आहे.

१५ गुंठ्यात २ लाख पपईची रोपे

१५ गुंठे नर्सरीत (शेडनेट) दरवर्षी २ लाख रोपे तयार करतो. जर्मिनेटरच्या बीजप्रक्रियेने उगवण ९० % पर्यंत मिळून नंतर जर्मिनेटरची फवारणी केल्याने रोपांची वाढ लवकर होते २ महिन्याची १ फुट उंचीची झाल्यानंतर विक्री करतो. ८ रू. प्रति रोप भावाने १०० किमी अंतरापर्यंत पोहोच देतो.