कीड व रोगग्रस्त टोमॅटो प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या एका फवारणीने दुरुस्त होऊन १० गुंठ्यात ३५ हजार रू. उत्पन्न

श्री. संतोष गणपत लबडे,
मु. पो. नारकरवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे - ४१२४०६.
मो. ९९७५८७१६३८


माझा टोमॅटोचा १० गुंठे प्लॉट होता. उन्हाळी (एप्रिल २०१० ची लागवड) बाग असल्यामुळे झाडांवर रोगांचे प्रमाण तसेच किडीचे प्रमाण खुप होते. अनेक प्रकारचे रासायनिक औषधे वापरूनही रोग व किडी आटोक्यात आल्या नाहीत. त्यानंतर मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतीनिधी श्री. मंडलिक एस. के. हे भेटले. मी त्यांना माझा प्लॉट दाखवला. त्यानंतर मी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन, हार्मोनी आणि कोराजन यांची फवारणी केल्यानंतर प्लॉट १० दिवसात हिरवा झाला.

या आगोदर झाडाला पाने अजिबात नव्हती. मी प्लॉट सोडून देण्याच्या तयारीत होतो.

परंतु वरील औषधांच्या फवारण्या घेतल्याने प्लॉट सुधारून १० गुंठे टोमॅटोपासून ३५ हजारांचे उत्पन्न निघाले.

तसेच आता नवीन टोमॅटोची लागवड केली आहे. तसेच कांद्याची ही लागवड केली आहे. त्याला प्रथमपासूनच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरत आहे.