२० गुंठ्यात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने १० ते १२ टन कांदा उत्पादन अपेक्षीत

श्री. जगन्नाथ सुदाम पाडेकर,
मु. संतवाडी, पो. आळे, ता. जुन्नर. जि. पुणे.
मोबा. ९७६६४५७०१६



मी २००४ सालापासून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर कांदा, फरशी, टोमॅटो, चारा पिके यावर करीत आहे. जमीन पांढरी शेडवट फफुट्यासारख्या मातीची आहे. अशा जमिनीतूनदेखील मी या तंत्रज्ञानामुळे व कल्पतरू सेंद्रिय खताच्या वापराने सर्वच पिकांचे विक्रमी उत्पादन घेतो. हवामान प्रतिकुल असले तरी हे तंत्रज्ञान आम्हाला नेहमी साथ देते. टोमॅटोचे उत्पादन १५ गुंठ्यात ६०० क्रेट असे काढले आहे. कांदा १८ गुंठ्यात ११.५ टन काढला आहे.

चालू वर्षी नेहमीप्रमाणे कांद्याचे बी जर्मिनेटर ५० मिली आणि प्रोटेक्टंट २० ग्रॅम / १लि. पाणी या द्रावणामध्ये १ किलो बी याप्रमाणे ३ ते ४ तास भिजवून नंतर सावलीत सुकवून फोकले. तर उगवण अतिशय चांगली, एकसारखी झाली. नंतर रोपांवर उगवणीनंतर १५ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५० मिली आणि प्रोटेक्टंट २५ ग्रॅम प्रति पंप याप्रमाणे फवारणी केली. एवढ्यावर कांदा रोपाची निरोगी वाढ होऊन रोप लागवड योग्य तयार झाले.

महिन्याभरात रोपे लागवडीला आल्यानंतर लागवडीच्यावेळी रोपे व मुळ्या जर्मिनेटर ५० मिली + प्रोटेक्टंट २० ग्रॅम / १० लि. पाणी या द्रावणामध्ये बुडवून २० गुंठे हलक्या प्रतिच्या (पांढरट, फफुट्याच्या) जमिनीत लागवड केली. त्यामुळे लागण १०० % यशस्वी झाली. महिन्याच्या आत दीड महिन्याची लागवड असल्यासारखी रोपांची वाढ झाली. नंतर खुरपणीच्यावेळी २० गुंठे क्षेत्रासाठी कल्पतरू सेंद्रिय खताच्या २ बॅगा टाकल्या. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन, पांढऱ्या मुळ्यांचा जारवा वाढला. कांद्याची वाढ ही जोमाने सुरू होती.

लागवडीनंतर १५ दिवसांचा प्लॉट असताना जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ५० मिली आणि प्रोटेक्टंट २० ग्रॅम प्रति पंपास घेऊन फवारणी केली होती. त्यामुळे कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. पुढे प्लॉट दीड महिन्याचा असताना आणि २ - २। महिन्याचा प्लॉट असताना थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५० मिलीच्या दोन फवारण्या केल्या. तेवढ्यावर कांद्याची पात गुडध्याएवढी झाली. कोणात्याही रोगाचा प्रादुर्भाव नाही. पात हिरवीगार, शेंडे सरळ उभे होते. माना जाड होत्या. कांदा ३॥ महिन्याचा असताना राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी ५० मिली प्रति पंपास घेऊन फवारणी केली. तेवढ्यावर कांद्याचे पोषण ३०० ते ३५० ग्रॅमचा एक कांदा तयार झाला.

यातील कांदा उपटून पातीसह मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रदर्शनामध्ये (११ ते १४ जानेवारी २०१२) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्टॉंलवर ठेवण्यास आला होता. तर तो तेथे प्रदर्शन पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे आकर्षण ठरत होता. कांदा पाहणारे लगेच तंत्रज्ञानाविषयी चौकशी करीत होते. अजून कांद्याच्या माना जाड आहेत. पात हिरवीगार आहे. त्यामुळे अजून कांद्याचे पोषण होईल. यावेळीदेखील या २० गुंठ्यामध्ये १० -१२ टन उत्पादन निघेल असा प्लॉट आहे.

चारा गवतासाठीही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी प्रभावी

आम्ही दुग्धोत्पादनासाठी गाई पाळल्या आहेत. तर त्यांच्या चाऱ्यासाठी हत्तीगवत (बिन्नी गवत) मेथी घास लावलेला आहे. या चारापिकांनादेखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटर, थ्राईवरच्या फवारण्या केल्या, तर हत्ती गवताची वाढ १० ते ११ फुटापर्यंत झाली. पाने हिरवीगार रसरशीत आणि रुंद झाली. मेथी घासावरही असाच अनुभव येतो. मेथी घासाची उंची ३ ते ३॥' एवढी मिळाली. काडी पाने रसरशीत तयार झाली. क्रॉंपशाईनरमुळे मेथीघास शेंड्यापासून बुडख्यापर्यंत हिरवागार तयार झाला. विशेष म्हणजे या टेक्नॉंलॉजीने उत्पादीत केलेले हे घासगवत गाईंना द्यायला लागल्यापासून ५ गाई पुर्वी ५० ते ५५ लि. दूध देणाऱ्या ८५ ते ९० लि. दूध देऊ लागल्या.