टिश्युकल्चरच्या केळीला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा ४ थ्या दिवशी फरक

श्री. राम व्यंकटराव कोयले,
मु.पो. रावणगाव, ता. उदगीर, जि. लातूर,
मोबा. ९९७०९३९५५८


आम्ही १ एकरमध्ये १८ नोव्हेंबर २०१३ ला ग्रॅंड - ९ केळीच्या १३५० रोपांची लागवड केली आहे. जमीन मध्यम प्रतीची असून लागवड ५' x ६' वर आहे. लागवडीनंतर थंडीचे प्रमाण वाढल्याने झाडाची पाने पिवळी पडली व मधला कोंब (नळी) उमलत नव्हती. त्यामुळे केळीची वाढ पुर्णपणे खुंटली होती. याचवेळी माझे मित्र श्री. माधव बाबुराव म्हेत्रे (मोबा. ९७३०८५८८०४) यांनी देखील माझ्याबरोबर १८०० केळीची लागवड केली होती. त्यांच्याही प्लॉटवर हीच समस्या होती. या कालावधीत आमचे नातेवाईक श्री. राजकुमार तोगरे (मोब. ०८१०५०७३६२१) नेलवाड, ता. भालकी, जि. बीदर यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्यास सांगितले. सुरूवातीला आम्हाला या तंत्रज्ञानाबद्दल अनुभव नसल्याने धाडस होत नव्हते. म्हणून तोगरे यांनी स्वखर्चाने औषधे मागवून आम्हाला दिली. ते कर्नाटकमध्ये मिरची, हरभरा या पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतात. त्याचा त्यांना भरपूर फायदा झाला आहे. त्यांनी फरक पाहण्यासाठी प्रथम मित्राला व मला प्रत्येकी ७०० - ७०० रोपांनाच फक्त हे तंत्रज्ञान वापरण्यास सांगितले. त्यांचे सल्ल्यानुसार दोघांनी प्रिझम ४०० मिली + जर्मिनेटर ४०० मिली + २०० लि. पाणी असे द्रावण तयार करून ९ जानेवारी २०१४ ला ड्रेंचिंग केले आणि दुसऱ्या दिवशी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी २० मिली १५ लि. पंपाला घेऊन फवारणी केली. तर ४ थ्या दिवशीच दोन्ही प्लॉटमधील रोपांचा कोंब (नळी) उमलून नवीन पण निघाले. तेजदार कळी निघाली. आम्हाला अजून नवीन केळी लागवड करायची आहे. त्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा एवढा फरक आहे तर या तंत्रज्ञानाने विकसीत केलेलीच ग्रेंड - ९ केळी का घेऊ नये म्हणून आज (१६ जानेवारी २०१४) रोजी ११०० रोपे घेण्यासाठी आलो आहे.