५ गुंठे स्ट्रॉबेरीपासून ३ महिन्यात हातविक्रीने ६० ते ७० हजार

श्री.अशोक नाना नाईकवडी, मु.पो. येलुर (गावठाण), ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर,
मोबा. ९६२३७९२०५०


गेल्या वर्षीपासून मी स्ट्रॉबेरी पिकासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे. चालू वर्षी दि. १८ ओक्टोबर २०१४ रोजी ५ गुंठे क्षेत्रावरती स्वीटचार्ली व व्ह्निटर्ड जातीची स्ट्रॉबेरी लावली आहे.

सुरूवातीला २ फुटी सरी सोडून जमीन भुसभूशीत केली व त्यामध्ये ५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत + शेणखत टाकले. नंतर १ फुटावरती रोपे लावून दुसऱ्या दिवशी जर्मिनेटर ८० मिली + २० ग्रॅम बाविस्टीनची आळवणी केली. ही आळवणी प्रत्येक १५ दिवसांनी करत आहे. तर लागणीनंतर ८ दिवसांनी संपुर्ण (सप्तामृत) जर्मिनेटर + थ्राईवर + क्रॉपशाईनर + प्रोटेक्टंट + प्रिझम + न्युट्राटोन प्रत्येकी ५० मिली + १५ लि. पाणी याप्रमाणे फवारणी करीत आहे.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरत असल्याने स्ट्रॉबेरी ची फळे चांगली, गडद रंग व रसबरीत मिळतात. त्यामुळे दरही चांगला मिळतो. ५ गुंठ्यामध्ये हात विक्री केल्याने ३ महिन्यांमध्ये स्ट्रॉबेरीपासून ६० ते ७० हजार रू. उत्पन्न या तंत्रज्ञानामुळे मिळाले. खरच मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा अभारी आहे.