अॅप्पल बोरचा दर्जा, उत्पन्न व दर चांगला, चव अॅप्प्लचीच नवीन अंजीराच्या जातीचे उत्पन्न व दर्जा अधिक

श्री. रमेश शिवलिंग दुधनी,(B.Sc.Agri.),
मु.पो. मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर.
मो. नं. ९४२२०६६३०९


अॅप्पल बोरची २ एकर मध्ये ४०० झाडे ऑक्टोबर २०१३ मध्ये खडकाळ जमिनीत १५' x १२' वर लावली आहेत. अॅप्पल बोरचे कलम कलकत्त्यावरून जागेवर येईपर्यंत त्यावेळी ११० रू. लागले. आता आपल्याकडे ७० - ७५ रू. ला रोपे मिळतात. लागवडीनंतर पहिले १ वर्ष नियमीत छाटणी करून झाडाला आकार देत गेलो. कॅनॉपी मेटेन केली आणि पहिला बहार येईल तसा घेत गेलो. साधारण ६ महिन्यात बहार सुरू झाला. तो ३ - ४ महिने चालला. नंतर जानेवारी २०१५ पासून पाणी बंद केले. आहे तशीच बाग सोडून देऊन १५ एप्रिलला छाटणी केली. प्रत्येक झाडास २ टोपली शेणखत आणि १०:२६:२६ ५०० ग्रॅम दिले. त्यानंतर पहिले हलके पाणी दिले. मोठे पाणी दिले तर अनावश्यक फुट (घुमारे) जादा निघतात. त्यासाठी सुरुवातीचे पहिले पाणी हलके द्यावे लागते. बहाराची फुट निघण्यासाठी प्रिझमची फवारणी घेतली. त्याने फुटवे भरपूर निघाले. शेवटी दाटी वाटते म्हणून खालचे फुटवे कमी करावे लागले. डावणीसाठी बाविस्टीन, कॅन्टॉप व भुरीसाठी वेटेबल सल्फर फवारले. पाने फुटल्यावर १२:६१ च्या २ फवारण्या घेतल्या. त्यानंतर थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोनच्या १५ दिवसाला अशा २ फवारण्या घेतल्या. त्यामुळे पानांची साईज वाढली. फळांचे सेटींग वाढून गळ थांबली.

नंतर थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनच्या दोन फवारण्या घेतल्या. त्याने फुगवण चांगली झाली. फळांना शाईनिंग वाढली. १५ नोव्हेंबर २०१५ ला तोडे चालू झाले. सुरुवातीला १० - १५ किलो माल रोज निघत होता. आता ६० - ७० किलो फळे निघत आहेत. आतापर्यंत ३ टन माल विकला आहे. स्वत: सोलापूर व लोकल मार्केटला विकतो. २५ - ३० रू./ किलोने जातो. तोच माल स्टॉलवर ६० रू. ला विकतात. सांगली - मिरजला ९० रू. ला जातो.

अजून ३ ते ३।। टन माल निघेल. जानेवारी २०१६ अखेरपर्यंत चालेल. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा पहिल्यांदाच वापर केला. साईज गेल्यावर्षी पेक्षा चांगली मिळाली. १ किलोत १८ ते २० फळे बसतात. साधारण ५० ते ६० ग्रॅमची फळे आहेत. आमच्या इकडे यंदा पाऊस कमी म्हणजे एकच झाला. झाडांना सध्या पाणी कमी पडत आहे त्यामानाने फुगवण व वजन चांगले मिळत आहे. पाणी कमी पडत असल्याने इतर पिकांचे पाणी कमी करून या अॅप्पल बोरला ठिबकने दिवसाला २।। ते ३ तास (८ लि. चे २ ड्रीपर) ४० - ५० लि. पाणी देत आहे.

अॅप्पल बोरमध्ये प्रमुख २ समस्या आढळल्या. १ महणजे या पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो, त्यासाठी फेरोमेन ट्रॅप २ - ३ वेळा लावले. तसेच निमार्क फवारले. तेव्हा फळमाशी काही प्रमाणात आटोक्यात आली. यावर खर्च बऱ्यापैकी होत असून १०० % संरक्षण होईल याबाबत साशंकता असते. २ री समस्या म्हणजे याच्या फांद्या मृदु असल्याने फळांच्या वजनाने फांद्या मुख्य फांदीपासूनच तुटतात. त्यामुळे शेंड्याकडील भागात लागलेली लहान - लहान फळे वाळून जाऊन उत्पादनात घट येऊन मोठे नुकसान होते. यासाठी या पिकाला आधार देण्यावर मोठा खर्च करावा लागतो.

बाकी या पिकाच्या बाबतीत याला काटे नसल्याने मजुर साध्या बोरापेक्षा सहज मिळतात. त्यामुळे मजुराची समस्या राहत नाही.

माझ्याकडे २००६ मध्ये लावलेले दिनकर जातीचे ३ एकर अंजीर आहे. याचबरोबर दिआना जातीची ५० - ६० झाडे आहेत. कोनाड्रियाची १० झाडे आहेत.

अॅप्पल बोरला फवारून उरलेली सत्पामृत औषधे यातील दिआना जातीच्या अंजीरावर फवारत असे, तर यावर्षी त्यामध्ये मोठा फरक जाणवला. एरवी एका किलोत २२ ते २४ अंजीर बसत होते तेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने फळांची साईज वाढून एका किलोच्या बॉक्समध्ये फक्त १५ फळे बसत आहेत. या जातीला आपल्याकडे सोलापूर - पुणे मार्केटच्या तुलनेत हैद्राबादला मोठ्या प्रमाणात मागणी असते. सोलापूरला ४० - ५० रू. किलो भाव द्यायचा म्हटले तरी ग्राहक नापसंती दर्शविते. मात्र हेच फळ हैद्राबादला १२० रू. किलो दराने जाते.

आपल्या भागात दिनकर वाण चालतो. दिनकर वाणाच्या तुलनेत दिआनाची १ महिनाआधी छाटणी करावी लागते. याची ऑगस्टमध्ये छाटणी करतो. साधारण १४० - १४५ दिवसात फळ काढणीस येते. सध्या फळे चालू झाली असून एका किलोत फक्त १५ नग बसत आहेत. फळांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे आकार वजन वाढीबरोबरच आकर्षक चमकही आहे.

आम्ही दिनकरची छाटणी सप्टेंबरमध्ये करतो. त्याची महाशिवरात्रीला फळे चालू होतात. आमच्याकडे उष्णता जास्त असल्याने गोडी चांगली मिळते. महशिवरात्रीला चालू झालेली फळे जुनपर्यंत (मृगाचा पाऊस पडेपर्यंत) उत्पादन घेतो. या काळात नैसर्गिकरित्या वातावरण अनुकूल असते. फक्त पाणी व्यवस्था बऱ्यापैकी लागते. इतर खर्च कमी येतो व अनुकूल वातावरणाने चांगले उत्पादन व दर्जा मिळून पैसे होतात. पूस झाल्यानंतर अंजीरास मागणी कमी होते. तेव्हा माल चालू असला तरी आम्ही काढणी बंद करतो. तसेच या पावसाच्या काळात फळांवर चिलटांचा त्रास वाढतो.

आता चालूवर्षी या अॅप्पल बोरच्या अनुभवातून अंजीराच्या चालू बहाराला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे. त्याचबरोबर एप्रिल २०१४ मध्ये ३ एकरमध्ये भगवा डाळींब लावले आहे. त्याचा पहिला बहार चालूवर्षी घेत आहे. त्यासाठीदेखील डॉ.बावसकर सरांचे मार्गदर्शन घेऊन तंत्रज्ञानाचा अवलंब करणार आहे.