४ एकरातून ५४ क्विंटल कापूस तर फरदडपासून अजून ८ ते १० क्विंटल अपेक्षीत

श्री. सुद्धोधन मेश्राम, मु.पो. मलातपूर ता. धामणगाव, जि. अमरावती - ४४४७०९,
मो. ९८९०७२४३४१


मी १ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरात आहे. मागील वर्षी सोयाबीन कपाशीवर हे वापरले होते पण मागील वर्षी झालेल्या कमी पावसामुळे मला संपुर्ण शेतीला पाणी पुरवणे कठीण झाले. यावर्षी सुरुवातीला वेधशाळेने सांगितल्यानुसार जास्त पाऊस असल्याने मी १२ एकरमध्ये सोयाबीन, तूर आणि कपाशी लागवडीचे नियोजन केले. मी कपाशी अजित १५५ ची २ एकर आणि बायरच्या फस्टक्लास बी.टी. कापसाची २ एकर २७ जून २०१६ रोजी लागवड केली. २।। फुट २ तासामध्ये अंतर ठेवून २ - २ फुटावर कपाशीची लागवड केली. त्यामध्ये प्रत्येक सातवे तास हे तुरीचे होते. तसेच ४ एकर माडे (सलग) सोयाबीन पेरले आणि ४ एकरमध्ये तूर व सोयाबीन एकत्र २६ जून २०१६ रोजी पेरले होते. तुरीचे बी जर्मिनेटर ५० मिली + १ लि. पाणी या द्रावणात ४ तास भिजवले. नंतर सावलीत सुकवून त्याची लागवड केली. सोयाबीनचे बियाला जर्मिनेटर कालवून घेतले. कपाशीला मात्र पंपामध्ये जर्मिनेटर कालवून घेतले. कपाशीला मात्र पंपामध्ये जर्मिनेटरचे द्रावण तयार करून नोझल खोलून ड्रेंचिंग केले. मी जेव्हा लागवड केली तेव्हा २ जोरदार पाऊस झाले होते. त्यामुळे जमिनीत भरपूर प्रमाणात ओल होती. पेरणीच्या अगोदर तणनाशक वापरले होते. पाऊस योग्यप्रमाणात झाला असल्याने आणि जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केल्यामुळे पेरणी केलेले सर्व बियाणे व्यवस्थित ९५ ते ९८% उगवले. नंतर उगवण झल्यावर १० दिवसांनी मी सोयाबीन व तुरीवर १५ लिटरच्या पंपास जर्मिनेटर ५० मिली + थ्राईवर ५० मिली + हार्मोनी २० मिली + किटकनाशक (प्रोफेक्स सुपर) घेऊन फवारले. तसेच कापशीकरीता जर्मिनेटर ५० मिली + कॉटन थ्राईवर ५० मिली + हार्मोनी २० मिली + किटकनाशक असे प्रति पंपास घेऊन फवारले. त्यामुळे सोयाबीन, तूर व कपाशीचे झपाट्याने वाढ होऊ लागली. त्यानंतर ५ - ६ दिवसांनी कपाशी व तुरीला डी.ए.पी. २५ किलो + कल्पतरू २५ किलो/ एकरी दिले. सोयाबीनला बी पेरतेवेळीस डी.ए.पी. एकरी १ बॅग दिले होते. सोयाबीन आणि त्यामधील तुरीवर जर्मिनेटर ६० मिली + थ्राईवर ६० मिली + हार्मोनी ३० मिली / पंप याप्रमाणे फवारणी केली आणि कपाशीवर जर्मिनेटर ६० मिली + कॉटन थ्राईवर ६० मिली + हार्मोनी ३० मिली/पंप अशी फवारणी केली. या दोन्ही फवारणीमध्ये किटकनाशकाचा वापर केला. त्यामुळे कुठल्याही प्रकारची किड व बुरशीजन्य रोग पिकांवर दिसले नाहीत. सोयाबीन १।। फुट उंच आणि त्यामधील तूर २ फूट तर कपाशी ही १ फुटाच्या वर होती. त्यानंतर तिसरी फवारणी आम्ही पीक ६० दिवसांचे असताना केली. यामध्ये सोयाबीनसाठी प्रति पंपास थ्राईवर ६० मिली + क्रॉपशाईनर ६० मिली + राईपनर ६० मिली + न्युट्राटोन ६० मिल + कोरोजन वापरले. सोयाबीनला ही शेवटचीच फवारणी केली. सोयाबीनला १ डवऱ्याचा फेरही दिला होता. या अवस्थेत पाऊस येत नसल्याने ४ एकरला वर पाणी दिले. तर उरलेल्या ४ एकर सोयाबीन व तुरीला पाणी उपलब्ध नसल्याने देऊ शकलो नाही. शेवटी पोळ्यानंतर ४ ते ५ दिवसांनी पावसाने हजेरी लावली आणि थोडक्यात कोरडवाहू शेती देखील तरली. २६ ऑक्टोबर २०१६ ला सोयाबीन काढले असता मला एका पाण्याच्या पाळीवर ४ एकरमध्ये ३७ पोते सोयाबीन झाले. मार्केटमध्ये भाव कमी असल्यामुळे मी सोयाबीन सरकारी गोडाऊनमध्ये साठवून ठेवले आहे. कापसाचे ४ एकरात ५४ क्विंटल उत्पादन मिळाले असून फरदडपासून १५ ते २० दिवसात अजून ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळेल.