दुष्काळातील जनावरांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे योगदान

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


सर्वसाधारणपणे भात काढणीस आल्यानंतर भाताचे काड हे पुर्णता वाळते. पारंपारिक पद्धतीमध्ये काढणी योग्य भाताची हीच ओळख समजली जाते. मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी संशोधन केंद्रावरील इंद्रायणी भात पिकाला सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्याने भाताचे उत्पादन व दर्जात तर वाढ झालीच शिवाय भात काढणी केली तरी त्याचे काड शेवटपर्यंत अर्धे हिरवे राहिले. अशा काडामध्ये सिलीकाचे प्रमाण अधिक तसेच कर्बोदके, प्रथिने, स्निग्धांश निर्माण होत असल्याने दुष्काळी भागात जनावरांना चाऱ्याची भीषण समस्या निर्माण होऊन चाऱ्याअभावी गावोगाव छावण्या उभारण्याची वेळ येते. अशा ठिकाणी असे भाताचे काड उत्तम चारा म्हणून उपयोगात येते. या चाऱ्यापासून जन्वारांना अधिक पौष्टिक घटक मिळत असल्याने दुभत्या जनावरांचे दुधाचे प्रमाण व दुधाची गुणवत्ता सुधारतो. तर औत कामाच्या जनावरांना कमी चाऱ्यामध्ये जादा एनर्जी (ताकद) मिळत असल्याने तो अधिक लाभदायक ठरतो. अशाप्रकारे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दर्जेदार भात उत्पादन, चारा उत्पादन व जनावरांचे कमी चाऱ्यात अधिक पोषक घटकांमुळे आरोग्य सुधारून त्यांना बळकटी येते. असा तिहेरी फायदा होतो. संदर्भासाठी आलेल्या भाताचा फोटो कव्हरवर दिला आहे.