शेजाऱ्याला दीड एकरात ४० पिशवी आम्हाला मात्र १७५ पिशवी कांदा

श्री. सखाराम नाथा आभाळे,
मु. पो. अकलापुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर
मो. ९९७५००६६५१



बसवंत - ७८० कांद्याची लागवड १।। एकरमध्ये गेल्यावर्षी २० नोव्हेंबर २००९ ला केली होती. या कांद्याला नेहमीप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा दिली होती. जमीन मध्यम प्रतिची आहे. मात्र कांदा दीड - दोन महिन्याचा झाला तरी नुसते बांडच दिसत होते. वाढ मध्यम होती, परंतु कांदा अजिबात पोसला नव्हता, गाठी धरत नव्हता. पांढरीमुळीचे प्रमाण फारच कमी होते. त्यामुळे कांद्याची फुगवण होण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या नारायणगाव शाखेमध्ये जाऊन सल्ला विचारला असता त्यांनी सप्तामृत औषधांची शिफारस केली. त्याप्रमाणे सप्तामृत प्रत्येकी १ लि. ची ३०० लि. पाण्यातून फवारणी केली असता पतीला तेज आले, वाढ होऊ लागली. पांढरीमुळी सुटल्याने कांदा पोसण्यास मदत झाली. एवढ्या एका फवारणीवरच कांदा काढणीस आला. दीड एकरात १७५ पिशवी माल निघाला. तो आळेफाट्याला १०० रू./१० किलोप्रमाणे विकला. माझ्या शेजारच्या शेतकऱ्याचा तेवढ्याच क्षेत्रात कांदा होता आणि सुरूवातीची आपल्या प्लॉटची जी अवस्था होती तीच अवस्था त्या प्लॉटची झाली होती. मात्र त्यानंतर आम्ही डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या सप्तामृताची फवारणी केल्याने किमान १७५ पिशवी तरी उत्त्पन्न मिळाले. त्यांना मात्र दीड एकरात फक्त ४० पिशवीच उत्पन्न मिळाले.

या अनुभवावरून चालूवर्षी १ एकर कांदा लागवड केली आहे. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर चालू आहे. सध्या प्लॉट १ महिन्याचा होऊन पुर्णता निरोगी आहे.