व्हायरसने वाया गेलेला पपईचा बगीचा सुधारून २ लाख ७५ हजार रू. उत्पन्न

श्री. सुबोध छगन पाटील,
मु.पो. चहार्डी, ता. चोपडा, जि. जळगाव,
मोबा. ९९६०९६८३०९


२ वर्षापुर्वी जानेवारी महिन्यात संक्रांतीला तैवान ७८६ पपईची ३ एकरमध्ये लागवड केली होती. जमीन मध्यम काळी होती. लागवड ७ x ७ फुटावर केली. उन्हाळ्यात पाणी कमी असल्यामुळे सुरूवातीच्या काळात म्हणजे पाऊस पडेपर्यंत ठिबकने पाणी दिले. ते पाणी अपुर्ण पडल्यामुळे सुरूवातीचा बहार गळून गेला होता. नंतर पावसाळ्यात पाऊस जास्त झाल्याने व्हायरसचा प्रादुर्भाव झाला. यावर रासायनिक औषधांच्या (बुरशीनाशकांच्या) ३ फवारण्या आठवड्याच्या अंतराने केल्या. मात्र त्याने काहीच फरक पडला नाही. बाग पुर्ण वाया जाण्याच्या मार्गावर होती. नंतर आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीविषयी माहिती मिळाली. त्यानंतर जळगाव ऑफिसला जाऊन सर्व सप्तामृत औषधे आणली व त्याच्या आठवड्याच्या अंतराने २ फवारण्या केल्या. तर लगेच फरक जाणवला. आम्हाला अगोदर वाटत होते की, व्हायरसमुळे पुर्ण बाग वाया जाईल अशी पपईची अवस्था झाली होती. मात्र अशा परिस्थितीतून बाग सुधारून २ लाख ७५ हजार रुपयाचे उत्पन्न देऊन गेली. २ ते २.५ किलीची फळे मिळाली. प्रत्येक झाडावरून सरासरी ३० फळे मिळाली. व्यापाऱ्यांनी जागेवरून स्वत: पपई फळे तोडून नेली. त्यावेळी सुरूवातीस ९ रू. किलो भाव मिळाला. नंतर शेवटी उरलेल्या मालास ३ रू. किलोप्रमाणे भाव मिळाला. अशाप्रकारे पुर्ण वाया गेलेल्यां पपईपासून पावणेतीन लाखाचे उप्तादन मिळाले.

या अनुभवावरून चालू वर्षी ३ एकर पपई लावणार आहे. त्यासाठी सुरूवातीपासूनच आपले डॉ.बावसकर तंत्रज्ञाना वापरणार आहे. त्याकरिता आज (१२/१२/२०११) माहिती घेण्यासाठी व पपईच्या रोपांच्या तपासासाठी पुणे ऑफिसला आलो आहे.