कडक उन्हाळ्यात टोमॅटोची लागवड यशस्वी

श्री. संजय शंकर शिंदे,
मु.पो. भोसे, ता. कोरेगाव, जि. सातारा.
मोबा. ९९२२१५४८४६


२।। वर्षापुर्वी विजेता टोमॅटोची ४ पाकिटे बियाणे जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून टाकले असता कडक उन्हाळा असूनही उगवण ८०% हून अधिक झाली. या रोपांची महिन्याच्या आत गुढी पाडव्याला १ एकरमध्ये लागवड केली. लागवडीनंतर २० दिवसांनी झाडांना मातीची भर लावून पाणी दिल्यावर काफशावर सप्तामृत औषधांची पहिली फवारणी केली. अशा पद्धतीने १५ दिवसांच्या अंतराने मे अखेरपर्यंत तीन फवारण्या केल्या. त्यामुळे उन्हाळ्यातही झाडांची जोमदार वाढ झाली. फुट अधिक निघाली. मध्यम काळ्या जमिनीत लागवड ३' x `१॥' वर होती, तरी जेमतेम सरीतून जाता येईल एवढीच जागा राहिली. मातीची तीन वेळा भर लावून झाडे वरंब्यावर घेतली होती. त्यामुळे पाण्याशी संपर्क येत नसे. फुटवा भरपूर नीघाल्याने एका तारेवर तीन वेळा सुतळीने फांद्या बांधाव्या लागल्या. झाडे तीन फुटापर्यंत उंच होती. फुटवा अधिक असल्याने फळांचे उन्हापासून संरक्षण झाले. या अवस्थेत सप्तामृत फवारल्याने मालाचे पोषण झाले.

चौथ्या दिवशीच्या तोड्याला ७० ते १०० क्रेट माल

लागवडीनंतर तोडे दोन महिन्यांनी चालू झाले. अडीच महिन्याचा प्लॉट झाला तेव्हा ४ थ्या दिवशीच्या तोड्याला ७० ते १०० कॅरेट माल निघत होता. हा माल १० जून २००९ ला चालू झाला तो जुलै अखेरपर्यंत चालू होता. एरवी या अवस्थेत पावसामुळे फळांवर डाग पडतात. फळे तडकतात. मात्र डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरल्याने फळे न तडकता. डाग न पडता त्यांचे चांगले पोषण होऊन फळांना चमक अधिक आली. ३५० रू. कॅरेटला भाव मिळत असे.

खर्च वजा जाता ९० हजार एकरी नफा

आम्ही टोमॅटो तोडून रानातच ढिग करून ठेवतो. तेथे व्यापारी स्वत: येऊन मालाची प्रतवारी करून त्यांच्याच कॅरेट (क्रेट) मध्ये माल भरून रोख पैसे देऊन माल नेतात.

या प्लॉटला एकराला ३० हजार रू. खर्च झाला. त्यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांवर ४ हजार रू. खर्च केला. इतर खर्च शेणखत व रासायनिक खतावर तसेच तारा, सुतळी मशागत असा इतर कामावर झाला. एकरी ४ ट्रॉली शेणखत लागवडीपुर्वी वापरले होते. एक एकरात खर्च वजा जाता ९० हजार रू. नफा मिळाला.

खोडव्यापासून ३० ते ४० हजार रू.

विशेष म्हणजे या औषधांचा वापर केल्याने उन्हाळी टोमॅटोचा खरीपात यशस्वीरित्या खोडवा घेता येतो. जुलैनंतर माल कमी झाल्यावर सप्तामृत फवारल्याने नवीन फूट निघते. या फुटीला फळे लागून १ - १।। महिन्यात तोडणीस येतात. हा माल सप्टेंबरमध्ये चालू झाल्यानंतर ४ थ्या दिवशीच्या तोड्याला ४० - ५० कॅरेट निघत होता. माल दिवाळीपर्यंत चालला. त्याचे कमी खर्चात ३० - ४० हजार रू. झाले.

हलक्या जमिनीतील 'सिद्धीविनायक' शेवगा लागवड यशस्वी

१५ गुंठे हलक्या प्रतिचे रान आहे. त्यात वरील अनुभवावरून 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याची २ पाकिटे बी नेऊन लागवड केली आहे. प्रथम जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून पिशवीत रोपे तयार केली. लागवड १० ' x १०' वर असून सध्या झाडांचा फुटवा, फांद्यांची वाढ डेरेदार असून बहार लागला आहे. फुलकळी गळू नये म्हणून मागील आठवड्यात सप्तामृताची फवारणी घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक झाडावर ४० पासून १५० पर्यंत लहान - मोठ्या शेंगा लागल्या आहेत.