डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने शेणखत न वापरताही उत्कृष्ट आले, हार्मोनीमुळे आले 'लागत' नाही

श्री. विठ्ठल बाबुराव सुतार, मु.पो. किन्हई, ता. कोरेगाव, जि. सातारा.
मोबा. ९८६०४७२८७२


१ जून २०१४ रोजी एक एकर क्षेत्रावर गादी वाफ्यावर आले लागवड केली. प्रथम बेणे प्रक्रिया करताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, पुणे यांचे जर्मिनेटर १ लि. + बाविस्टीन २५० ग्रॅम + १५० लि. पाणी या प्रमाणात मिश्रण तयार करून यामध्ये बेणे भिजवून लागण केली.

उगवणीनंतर एक महिन्यांनी जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ५०० मिली + राईपनर २५० मिली + न्युट्राटोन २५० मिली + क्रॉपशाईनर ५०० मिली + हार्मोनी २५० मिली + १५० लि. पाणी या प्रमाणात पहिली फवारणी केली. फवारणी केल्यामुळे आल्याची वाढ व फुटावा चांगला, निरोगी होऊन प्लॉटवर काळोखी आली. फवारणीनंतर २० दिवसांनी वरीलप्रमाणे सर्व औषधांनी ड्रीपमधून आळवणी केली. आळवणी नंतर एका रोपापासून कमीत - कमी २० ते २५ फुटवे आलेले दिसून आले. मुख्य म्हणजे आले पिकाकरिता शेणखत अजिबात न वापरता आल्याची लागण यशस्वी झाली. आळवणीनंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, पुणे यांच्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व फवारण्या केल्या असता शेवटपर्यंत एकसारखी काळोखी व आले लागण्याचा जो प्रादुर्भाव असतो तो हार्मोनी या औषधामुळे अजिबात झाला नाही.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, पुणे यांचे वेळोवेळी मार्गदर्शनामुळे आणि तंत्रज्ञानाचा वापरामुळे एका एकरमध्ये कमीत - कमी ६५ - ७० गाड्या आले निघेल अशी अपेक्षा आहे. हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा यशस्वी प्रयोग किन्हई गावामध्ये प्रथमच दिसून आला.

रासायनिक खत व किटकनाशक, बुरशीनाशक अत्यल्प प्रमाणात वापरले आहे. या भागामध्ये प्रथमच उत्तम प्रत व अधिक उत्पादनाची हमी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे दिसून येते. शेजारील गावातील शेतकरी आले प्लॉट कुतूहलाने बघण्यासाठी येतात.