सव्वा एकर भगवा १।। वर्षात २५० क्रेट, ४ लाख, सापळा झेंडू पिकाचे २० हजार

श्री. ज्ञानेश्वर प्रकाश पगार,
मु.पो. शिवसगाव (लौकी), ता.येवला, जि.नाशिक.
मो. नं. ९४०३४३९१४६/७७०९०१४५१२



डिसेंबर २०१३ मध्ये मध्यम प्रतिच्या सव्वा एकर क्षेत्रामध्ये भगवा डाळींबाची लागवड केली आहे. लागवड १३ x १० वर असून ठिबक केले आहे. या डाळींबाला सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्यामुळे झाडांची नोरीगी जोमदार वाढ झाली. अवघ्या १५ महिन्यातच बहार धरण्यायोग्य झाडे सशक्त तयार झाल्यामुळे मध्यम प्रतिच्या जमिनीत १ महिनाभर ताण देऊन १७ एप्रिल २०१५ रोजी बहारासाठीचे पहिले पाणी दिले. तत्पुर्वी छाटणी करून प्रत्यके झाडास १ पाटी शेणखत, २५० ग्रॅम निंबोळी पेंड आणि कल्पतरू सेंद्रिय खत २५० ग्रॅम, तसेच सुपर फॉस्फेट १०० ते १५० ग्रॅम याप्रमाणे खताचा डोस दिला होता.

पहिले पाणी दिल्यानंतर लगेच बोर्डो मिश्रणाची फवारणी केली आणि जर्मिनेटर एकरी १ लि. प्रमाणे ठिबकमधून सोडले. त्यानंतर पत्ती दिसल्यावर थ्राईवर, क्रॉपशाईनर आणि हार्मोनीची फवारणी केली. त्यामुळे पाने रुंद, हिरवीगार तयार होऊन बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यानंतर १५ दिवसांनी दुसरी आळवणी एकरी जर्मिनेटर १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे केली. त्यानंतर पहिल्या फवारणीनंतर १२ ते १३ दिवसांनी दुसरी फवारणी (नविन पालवी पिवळसर, तांबूस रंगाची असताना) - प्रिझम १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + हार्मोनी ३०० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे केली. त्यानंतर ६ फवारण्या पुढीलप्रमाणे केल्या.

तिसरी फवारणी वरील फवारणीनंतर १० दिवसांनी (२२ ते २४ वा दिवस - चौकी तयार होत असताना) - थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम +हार्मोनी ५०० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे केली. त्यामुळे मादीकळीचे प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर चौथी फवारणी वरील फवारणीनंतर १५ दिवसांनी (३५ ते ४० वा दिवस - कळी निघतेवेळेस) - थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + हार्मोनी ३०० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे केली. त्यामुळे वातावरण खराब असून देखील फुलगळ आटोक्यात होती.

नंतर तिसरी आळवणी फुल साईज सेटिंग (५० वा दिवस) - एकरी जर्मिनेटर १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे ड्रीपमधून केली. नंतर गाठ सेटिंग अवस्था - लिंबू आकाराची फळे असताना थाईवर १ लि. + क्रॉपशाईनर १।। लि. + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ५०० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे पाचवी फवारणी केली. त्यामुळे फळांच्या आकारात वाढ झाली. रोग किडीचा प्रादुर्भाव झाला नाही.

नंतर १५ ते २० दिवसांनी थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १।। लि. + राईपनर ७५० मिली + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ५०० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे सहावी आणि नंतर ९० ते १०० दिवसांचा प्लॉट असताना थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १।। लि. + राईपनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ५०० मिली + २०० लि. पाणी याप्रमाणे सातवी फवारणी केली.

यापद्धतीने नियमित डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या तसेच गरजेनुसार मध्ये किटकनाशकाची फवारणी करीत होतो. त्यामुळे कोणत्याही रोगकिडीचा पादुर्भाव झाला नाही. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या नियमित फवारण्यांमुळे फळांचे पोषण ३०० ते ३५० ग्रॅम पर्यंत झाले, शिवाय कलर अप्रतिम आला. साल बाहेरून लालभडक व चकचकीत दिसत होती. त्यामुळे नाशिक मार्केटला १८०० ते २००० रू./क्रेट भावाने डाळींब विकले. म्हणजे ९० ते १०० रू. किलो भाव मिळाला. पहिल्याच वर्षाची बाग असूनही ३० ते ४० फळे प्रत्येक झाडावर धरली. २५० ग्रॅम ते ३०० - ३५० ग्रॅम अशा आकाराची फळे घेतली. फळांना आकर्षक चमक असल्याने आम्हास भाव इतरांपेक्षा जास्त मिळत होता.

एकूण २५० क्रेट डाळींब उत्पादन मिळून दसऱ्याच्या अगोदर बाग खाली झाली. या डाळींबाच्या पहिल्याच बहारापासून ४ लाख रू. उत्पन्न मिळाल्याने मी ब आमचे कुटुंब पूर्ण समाधानी आहोत.

या डाळींबाता प्रत्येक झाडाजवळ २ - २ झेंडूची रोपे लावली होती. त्याला देखील डाळींबाबरोबर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या करत असल्याने झेंडूचा फुटवा वाढून झाडे डेरेदार तयार झाली होती. फुलकळी भरपूर लागून फुलांनी झाडे डवरली होती. हा झेंडू ऐन दसऱ्याला चालू झाल्याने ८० ते १०० रू किलो भावाने झेंडू विकला. त्याचे १५००० रू. झाले. नंतर दिवाळीत बाजार कमी होते. सुरूवातीला ६० रू. ने विकला व नंतर भाव कमी कमी होत शेवटी २० रू. किलो पर्यंत भाव मिळाला. तरी दिवाळीत ५ हजार रू. असे एकूण २० हजार रू. झेंडूचे झाले. शिवाय झेंडूमुळे बागेत सुत्रकृमीचा प्रादुर्भाव झाला नाही.

डाळींबाच्या अनुभवातून थॉमसनचा पहिल्याच वर्षी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बाग धरला

याचबरोबर आम्ही ८ ऑगस्ट २०१४ ला २.५ एकर मध्ये थॉमसन द्राक्षबाग ८.५ x ५ फुटावर लावली आहे. तिलाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरात आहे. याबागेचे वर्षातच पहिले पीक घेतले आहे. ६ ऑक्टोबर २०१५ ला फळ छाटणी केली. सध्या (१८ डिसेंबर २०१५) ७३ दिवसात वेलीवर २० ते २५ घड असून १६ ते १८ एम.एम. फुगवण झाली आहे. काढणीस अजून ४५ ते ५० दिवसांचा अवधी असून २० एम. एम. तर सहजच फुगवण मिळेल. आपली टेक्नॉंलॉजी रेसिड्यू फ्री असल्याने निर्यातीच्या दृष्टीने हे उत्पादन घेत असताना आम्हाला त्याचा चांगला फायदा होत आहे. निर्यातीसाठी नोंद देखील केली आहे.