डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी म्हणजे अमृतच गेल्या १० - १२ वर्षापासून सतत वापर व उत्तम अनुभव

श्री. भगवानराव माणिकराव निर्वळ,
मु.पो. रुठी, ता. मानवत, जि. परभणी.
मो. ९७६३६७७८१७



मी २००१ ला किसान कृषी प्रदर्शन (पुणे) पहाण्यास गेलो होतो. तेथे प्रदर्शन बघत असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा स्टॉल दिसला व त्या बद्दल पूर्ण माहिती घेतली. तेथून कृषी विज्ञान मासिक टरबुज आणि इतर विशेषांक खरेदी केले आणि निर्णय घेतला आपल्या शेतीस रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय खते आणि औषधे वापरायची. त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी हेड ऑफिसला संपर्क साधला व टरबुज लागवडीच्या अगोदर बिजप्रक्रिया करण्यासाठी जर्मिनेटर औषधे मागविले. त्यानंतर बीज प्रक्रिया केली तर १००% उगवण शक्ती झाली आणि पानांचा फुटवा पण चांगला निघाला. त्यानंतर १० - १२ दिवसांनी औषधे एस. टी. पार्सलने मागवून पहिली फवारणी जर्मिनेटर २०० मिली, प्रिझम २५० मिली, थ्राईवर २०० मिली, क्रॉपशाईनर २०० मिली, हार्मोनी १५० मिली, १०० लि. पाणी याप्रमाणात घेऊन फवारणी केली. त्यामुळे वेलांची लांबी सुद्धा चांगली दिसून येवू लागली. नंतर थोड्या प्रमाणात पांढरी माशी, तुडतुडे दिसून येत होते तेव्हा कॉनफिडॉंर आणि त्या सोबत प्रिझम ३५० मिली, क्रॉपशाईनर ३०० मिली, थ्राईवर ३०० मिली, न्युट्राटोन ३०० मिली, हार्मोनी २५० मिली आणि प्रोटेक्टंट -पी २५० ग्रॅम प्रति १५० लि. पाण्यात मिसळून फवारणी केली. त्यामुळे प्लॉट निरोगी, खूप चांगला टवटवीत दिसू लागला आणि फलधारणा सुद्धा चांगली होऊ लागली. या पद्धतीने सविस्तर चार फवारण्या घेतल्या. माझा प्लॉट हा गावातील शेतकऱ्यांच्या प्लॉटपेक्षा एक नंबर दिसत होता आणि एका फळाचे वजन १६ ते १९ किलो एवढे निघले. त्याच बरोबर त्यावरती चमक, गोडी आणि गराला लाल भडक रंग आला. एकही टरबुज आतुन पांढरे दिसत नव्हते. त्यामुळे मार्केट भावापेक्षा दीड पट भावाने विक्री झाली.

मी शेतकरी बंधुंना सांगु इच्छीतो डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रोडक्ट हे शेतकऱ्यांस आणि जमिनीस अमृतच आहे. मला जेव्हा पहिला रिझल्ट मिळाला तेव्हापासून आजपर्यंत साधारण १० ते १२ वर्षे झाले मी हेच प्रोडक्ट वापरतो आणि माझ्याकडे नर्सरी आहे. त्यासाठी सुद्धा फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचेच प्रोडक्ट वापरतो.