डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे १२ एकर कापसाच्या अधिक उत्पन्नाची अपेक्षा व आशा !

श्री. राजेंद्र गणेशराव निंगाटे, मु.पो. येसुर्णा, ता. अचलपूर, जि. अमरावती.
मो. ९९२२८५९२८०


कापसाची उगवण ४ - ५ दिवसात

माझी एकूण १८ एकर शेती असून त्यापैकी १२ एकरमध्ये कापूस आणि ६ एकरमध्ये तूर व सोयाबीन आहे. या पिकांच्या निविष्ठा नेण्यासाठी मी दत्तकृपा इरिगेशन वर गेलो असता येथे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी यांच्या प्रतिनिधींची भेट झाली. त्यांनी मला माहिती दिली व कापूस या पिकाचे पुस्तक पण दिले. तसेच कापूस, तूर, सोयाबीन या पिकांकरीता हे तंत्रज्ञान वापरायला सांगितले. ७/६/२०१६ ला मी कापूस लावायचे ठरविले. साहेबांच्या सांगण्यानुसार मी जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केली आणि एकाच दिवशी संपुर्ण लागवड केली. त्याच दिवशी संध्याकाळी ठिबकद्वारे पाणी दिले. तेथून ४ - ५ दिवसांनी कापूस उगवूण आल्याचे दिसून आले. नंतर मर होऊ म्हणून जर्मिनेटर आणि प्रिझम एकरी १ लि. ठिबकद्वारे सोडले. त्याचा ४ - ५ दिवसात चांगला फरक जाणवून आला. मर झाली नाही. पांढऱ्या मुळीचा जारवा वाढला. पानांची फुट वाढली.

कापसाची वाढ अतिशय चांगली होती. जर्मिनेटर १० ते १२ दिवसांनी देणे चालूच होते. तेथून २२ दिवसांनी डी.ए.पी. एकरी १ बॅग व कल्पतरू सेंद्रिय खत १ बॅग असा पहिला खताचा डोस देऊन पाणी सोडले. तेथून ७ - ८ दिवसांनी मावा, तुडतुडे दिसल्यावर प्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार इमिडाक्लोरो + हार्मोनी + थ्राईवर + प्रिझम यांची फवारणी केली. त्याने वरील किडींचे नियत्रंण होऊन फुटवा व फाद्यांची वाढ जोमाने सुरू झाली. तेथून लगेच पाणी (पाऊस) थांबल्यावर दुसरा खताचा डोस १०:२६:२६ एकरी १ बॅग दिला. तेव्हा कपाशी पात्यावर होती. पुन्हा पाऊस सुरू झाला तो ८ ते १० दिवस सतत सुरू होता. नंतर पाऊस थांबल्यानंतर साहेबांची भेट झाली व प्लॉट पाहिल्यावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अतिशय दिसू लागला. त्यानंतर त्यांनी स्प्रे लिहून दिले. कॉटन थ्राईवर + क्रॉपशाईनर + प्रिझम + पेगासस + सिलीकॉन + सुक्ष्म अन्नद्रव्य हा स्प्रे करायला लावला व तेथून ८ दिवसांनी तिसरा खताचा डोस युरीया एकरी १ बॅग, पोटॅश एकरी २५ किलो असा डॉस द्यायला लावला व आम्ही त्याप्रमाणे दिला. त्याचा फुलपात्या व फांद्या निघण्यासाठी खुप फायदा झाला. पात्या असताना सतत पाऊस चालू होता. पण गळ इतरांच्या तुलनेत अतिशय कमी होती. तेथून बोंडे पकडण्यास सुरुवात झाल्यावर मी पंचामृताचा स्प्रे केला. त्यामुळे झाडांवर माल असताना पाने लाल होणे किंवा गळून पडणे, पाने कोकडने, वाळून जाणे, असा कुठल्याही प्रकारचा रोग नव्हता.

५ सप्टेंबरला मी कापूस वेचण्यास सुरुवात केली व पहिला वेचा माझा ३० क्विंटलचा निघाला त्यानंतर जर्मिनेटरची ड्रेंचिंग केल्यावर पाणी सोडले, त्याने फूट निघाली. तेथून काही दिवसांनी थोड्या प्रमाणात पाने पांढरी होणे, पिवळट दिसणे सुरू झाले. त्यावर सरांनी हार्मोनी + कॉटन थ्राईवर + बोरॉन याचा स्प्रे करण्यास सांगितले त्याप्रमाणे केला. ५ ते ६ दिवसांनी पुन्हा दुसरा वेचा सुरू झाला. पराटीची परिस्थिती इतरांपेक्षा अतिशय चांगली आहे. दरवर्षी मला ७० ते ८० क्विंटल कापूस होतो पण यावर्षी खोडवा जर घेतला तर १३० ते १४० क्विंटल कापूस होईल असा मला अंदाज आहे व पराटी हिरवीगार व फुटीवर आहे व माल सुद्धा धरून आहे. त्यामुळे मला १४० क्विंटलची अपेक्षा आहे. आपले प्रतिनिधी २५ तारखेला (नोव्हेंबर) भेट देऊन गेले. त्यांना सुद्धा प्लॉट पाहून समाधान वाटले.

कापसाबरोबर मी सोयाबीनवर सुद्धा २ स्प्रे घेतले. तेवढ्यावर सोयाबीन एवढे चांगले आले की, मला पुन्हा स्प्रे सुद्धा करावा लागला नाही. साहेबांच्या सांगण्यानुसार मिसाईल + थ्राईवर + प्रिझम + हार्मोनी फवारले. तूर आता शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. तेव्हा त्यांची भरण (पोषण) चांगली होण्याकरिता राईपनर + न्युट्राटोन + मीसाईल याचा वापर करणार आहे.

इतर निविष्टांपेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या खर्च कमी व फायदा मात्र चांगला

यावर्षी माझ्या शेतीचे अतिशय कमी खर्चात व्यवस्थित नियोजन झाले व त्याचा रिझल्ट चांगला आला. दरवर्षी कृषी केंद्राचे माझ्यावर १ ते १।। लाख रु बील होते. पण यावर्षी फक्त ६० ते ७० हजार रु मला दुसऱ्या वेचणीपर्यंतचा पुर्ण खर्च आला आहे. म्हणून पुढेही याचप्रमाणे मी दरवर्षी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीनुसार शेती करणार आहे. तसेच नवनवीन माहितीकरीता 'कृषी विज्ञान' मासिकाची वर्गणी भरली आहे.