२० गुंठ्यातून ११० क्रेट टोमॅटो नफा ७५ हजार

श्री. सुधाकरराव ठाकरे,
मु.पो. सिंदीरेल्वे, ता. सेलू, जि. वर्धा.
मो. ९६८९११८६२०


मी 'कृषी विज्ञान' मासिकाचा नियमित वाचक असून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर मागील २ वर्षापासून करत आहे. मी कृषी विज्ञानमधील वेगवेगळ्या पिकांविषयीचे अनुभव वाचून प्रभावीत झालो. पण मी या अगोदर पारंपारिक पद्धतीने सोयाबीन, कापूस, तूर ही पिके घेत होतो. तसेच टोमॅटो सुद्धा लावत होतो. पण टोमॅटोची लागवड व्यवस्थित साध्य होत नव्हती. कधी मर होऊन तर कधी बुरशी रोगाने प्लॉट वाया जात होते. पीक आलेच तर कळी लागत नसे, त्यामुळे उत्पादनात घट येत असे. त्यामुळे निराश झालो होतो.

' कृषी विज्ञान' मासिकामध्ये मी एका शेतकऱ्याची टोमॅटो पिकाविषयीची मुलाखत वाचली. त्यामध्ये त्यांनी केलेल्या फवारणीप्रमाणे आपणही एकदा डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरून पाहावे असे ठरवले. आणि तेथून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा प्रत्येक्ष वापर सुरू केला, टोमॅटोची लागवड करण्याआगोदर मी २० गुंठे शेतामध्ये आर्धी बॅग कल्पतरू खत टाकले. त्यानंतर सरी काढून त्यावर रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून काढून त्या सरीवर लावली. लागवडीचे अंतर ५' x १।।' ठेवले. जर्मिनेटर च्या प्रक्रियेमुळे मर झाली नाही. रोपे लागवडीनंतर १५ दिवसांनी मी जर्मिनेटर ५० मिली + थ्राईवर ५० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली + प्रोटेक्टंट ४० ग्रॅम + प्रिझम ४० मिली + हार्मोनी ३० मिली + स्प्लेंडर २० मिली याप्रमाणे १५ लि. पाण्याला (पंपास) घेऊन फवारणी केली. त्यामुळे पिकाची झपाट्याने वाढ होऊन झाड एकदम निरोगी, सुद्दढ दिसू लागले. पुढे ही वेळापत्रकाप्रमाणे १५ - १५ दिवसाच्या अंतराने ३ फवारण्या केल्या. अशा एकूण ४ फवारण्यावर फळे काढणीस चालू झाली. वरील फवारण्यांमुळे पिकाची वाढ होऊन फुलकळी व माल भरपूर प्रमाणात लागला होतो. टोमॅटो मार्केटला नेल्यावर तेथे आलेल्या मालापेक्षा आपले टोमॅटो एकदम फ्रेश दिसत होते. त्यामुळे बाजारभाव इतरांपेक्षा जास्त मिळत होते. अर्धा एकरात मला ११० क्रेट माल निघाला. त्यापासून खर्च वजा जाता ७५ हजार रु. निव्वळ नफा मिळाला.