पावसाने पिवळे पडून सडलेले आले निरोगी व अति उत्तम उत्पन्न !

श्री. भाऊराव आसाराम कुमठे, (कृषी आरोग्य समिती सभासद, जि. प. सदस्य), मु. पो. शिरसवाडी, ता. जि. जालना,
मोबा. ९८६०४३२०२२


आम्ही गेल्यावर्षी जून २०१० मध्ये माहिम जातीच्या आल्याची अर्ध्या एकरामध्ये लागवड केली होती. जमीनी भारी काळी असून विहीरीचे पाणी इनलाईन ड्रीपने देत असे, हे आले २ महिन्याचे झाल्यानंतर गेल्यावर्षी सतत मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने पोटरीबरोबरचे आले रानात सतत पाणी साचून राहिल्याने पिवळे पडून सडू लागले. यामध्ये परिसरातील लोकांचे असेच नुकसान झाले. पिवळेपणाचे व सडण्याचे प्रमाण पुढे पुढे एवढे वाढले की पुर्ण प्लॉट उपटून टाकण्याच्या अवस्थेचा झाला.

याच काळात जालना येथे कृषी प्रदर्शनात (ऑक्टोबर २०१०) भेट देत असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्टॉंलवरून आल्याचे पुस्तक घेतले. तेथेच थोडे वाचल्यानंतर हे काहीतरी वेगळे तंत्रज्ञान असल्याचे जाणवले, म्हणून स्टॉंलवरील प्रतिनिधींकडून आल्याची परिस्थिती सांगून संपूर्ण मार्गदर्शन घेतले. त्यांनी अशा अवस्थेतील प्लॉटदेखील सुधारून खात्रीशीर उत्पादन घेऊ शकतो, याची खात्री दिली.

पावसाने पिवळा, सडलेले प्लॉट १५ दिवसात संपूर्ण निरोगी

मला लहानपणासूनच काहीतरी वेगळे करण्यात रस असल्याने मी या उपटून टाकण्याच्या अवस्थेतील प्लॉटला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरण्याचे ठरविले, प्रतिनिधी श्री. सुरळकर यांनी मला जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रिझम, न्युट्राटोन ही औषधे प्रदर्शनामधून देऊन त्याची फवारणी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे लागलीच फवारणी केली असता आठवड्यात फरक जाणवू लागून १५ दिवसांमध्ये पुर्ण प्लॉट हिरवागार झाला. आल्याची सडदेखील जागेवर थांबली. त्यानंतर सुरुवातीला घेतले त्याच औषधांतील उरलेल्या औषधाची दुसरी फवारणी केली. त्याने वाढ जोमाने होऊ लागली.

गावातील सडलेले आले रासायनिक औषधाच्या २ - ३ फवारण्यानेही नादुरुस्त, मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या काही फवारणीने बहरले.

गावातील आले लागवड केलेले शेतकरी प्लॉट पाहून आश्चर्य चकित होत. आम्ही गावातील ८ - १० जणांनी ग्रुपमध्ये ३० - ३५ एकर क्षेत्रावर आल्याची लागवड केलेली आहे. त्यांनी आल्याचा प्लॉट सुधारल्यानंतर डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली. याकरिता आम्ही एस. टी. पार्सलने सप्तामृत मागवून घेऊन पुढे दर १५ दिवसांनी ३ फवारण्या केल्या. अशा आम्ही एकूण ५ फवारण्या तर गावातील काहींनी २३ फवारण्या करून सडणारे आले नुसते वाचविले नाही तर आज रोजी (१२ जून २०११) आल्याची पाने हिरवीगार असून १ ते १। किलोचे गड्डे तयार झाले आहेत.

आम्ही या आल्याची मार्च - एप्रिलला काढणी करणार होतो. मात्र बाजारभाव फारच कमी होते, म्हणून प्लॉट तसाच ठेवला आहे. आता प्लॉटमध्ये कुठेही सड अजिबात नाही. आमच्या ग्रुप मधील शेतकऱ्यांचे ही प्लॉट वाचले, त्यामुळे ते ही हे तंत्रज्ञान पुढे आले. कापूस, तूर, सोयाबीन, मूग या पिकांना वापरणार आहेत. त्याकरिता आम्ही जालना जिल्ह्याची डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची एजन्सी घेण्यासाठी खास आज आलो आहे.

आमची एकूण २२ एकर जमीन असून चालूवर्षी त्यामध्ये १४ -१५ एकर कपाशी, २ - ३ एकर मूग, २ एकर तूर आणि अर्ध्या एकरमध्ये वरील आले प्लॉट आहे…