७ एकर फडदडपासून ६५ क्विंटल 'ए' ग्रेड कापूस, दर ६४०० रू./क्विं., उत्पन्न ४ लाख रू.

श्री. विलास घोंडोबाजी शेंडे, मु. घाटसावली, पो. दारोडा , ता. हिंगणघाट, जि. वर्धा.
मोबा. ९७६४२७०८४१


मी गेल्या सात वर्षापासून शेती व्यवसाय करत आहे. गेल्यावर्षी १६ जून २०१० ला बुलेट कंपनीचा कापसाचा जाकपॉट वाण, अंकुरचा जॉय, कृषीधनचा १४४ या तीन वाणांची लागवड केली होती. जमीन मध्यम प्रतीची असून पाणी पाटाने देत होतो. लागवड ४ x १॥ फुटावर होती. नेहमीप्रमाणे या कपाशीस रासायनिक खते औषधे वापरून उत्पादन घेतले. झाडावर १०० च्या जवळपास बोंडे होती. याची वेचणी नोव्हेंबर अखेरपर्यंत पुर्ण झाली. एकरी १० क्विंटलचा उतारा मिळाला.

फडदड उत्तम भाव ६४०० रुपये क्विंटल

नंतर डिसेंबर २०१० मध्ये कामानिमित्त पुण्याला आलो असता मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कापसाचे स्पेशल पुस्तक आणि कृषी विज्ञान मासिक घेतले आणी त्यातील माहिती वाचली. नंतर मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची सर्व सप्तामृत औषधे कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथून मागवून घेतली आणि त्याच दरम्यान या कपाशीच्या खोडव्यासाठी (फडदड) वापर केला. नोव्हेंबर - डिसेंबर दरम्यान पुर्णपणे झाडांच्या काड्या झाल्या होत्या. अशा परिस्थितीत जर्मिनेटर, थाईवर व प्रिझमची फवारणी केली असता संपूर्ण जुना प्लॉट नवीन फुट होऊन हिरवागार झाला. जानेवारीमध्ये या झाडांना फुलकळी लागून ८० - ९० बोंडे लागली. या अवस्थेत राईपनर, न्युट्राटोनची फवारणी घेतली असता बोंडाचा आकार वाढून कापसाची प्रत एक नंबरची निघाली. याची वेचणी एप्रिलमध्ये संपली. कापसाची प्रत अतिशय चांगली मिळाल्याने हिंगणघाट मार्केटला ६४०० रू. क्विंटलला भाव मिळाला.

यापूर्वी आम्हाला फडदड (खोडवा) पिकापासून एवढे उत्पन्न कधीच मिळाले नव्हते. शिवाय यावेळेस या फडदडीच्या कापसाची प्रत लागणीच्या कापसाच्या तोडीची होती. सात एकरात फडदडपासून ६५ क्विंटल उत्पन्न मिळाले. त्याचे ४ लाख रू. मिळाले.

या अनुभवावरून चालू वर्षी कपाशी लागवडीपासूनच डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरणार आहे. रान तयार असून जूनच्या ७ तारखेपर्यंत ५ एकरमध्ये ४ x १॥ फुटावर अंकुर ३०३४, ५६४२ आणि २१६ या वाणांची लागवड करणार आहे. ९३० रू. ला बियाचे पाकिट (४५० ग्रॅम) मिळाले. एकरी पावणेदोन पाकिटे बी लागते.