डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने नारळाची फळे, गर, दर्जा अधिक मोठा

श्री. प्रभाकर कुलकर्णी
बँक ऑफ इंडीया सोसा, तावरे कॉलनी , पर्वती, पुणे - ०९
फोन नं. (०२०) २४२२८१२१


आमचे छोटेसे किचन गार्डन आहे. त्यामध्ये सिंगापूरी नारळाची १० वर्षाची २ झाडे आणि जास्वंद, गुलाब, पांढरी तगर अशी फुलझाडे आहेत. नारळाला ४ थ्या वर्षापासून फळे लागण्यास सुरुवात झाली. झाडावर एकावेळी ११० ते १२० फळे लागत आहेत. मात्र ही फळे खूप छोटी राहून खोबरे ही पातळ भरत होते. तसेच फुलझाडेही फारशी बहरत नव्हती. फुटवा कमी होता.

मागील महिन्यात मार्केटमध्ये आलो तेव्हा आपल्या ऑफिसमधून माहिती घेऊन कल्पतरू सेंद्रिय खताची १० किलोची बॅग घेऊन गेलो होतो, ते खत नारळाला १ -१ किलो आणि फुल झाडांना ५० ते १०० ग्रॅम या प्रमाणात दिले. नारळाला खत दिल्यानंतर सल्ल्यानुसार पाणी जादा दिले. त्याने आज रोजी महिन्याभरात नारळाची फळे पहिल्यांदाच एवढी मोठी झाली आहेत. नारळ फळे काढून पाहिली असता खोबरे जाड भरलेले पाहण्यात आले. फुल झाडे देखील चांगली बहरली आहेत.

या अनुभवावरून आज पुन्हा कल्पतरू १० किलोची बॅग घेऊन जात आहे.