डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे ५ वर्षात प्रथमच द्राक्षबाग एकसारखा बहरला

श्री. आण्णासाहेब मुरलीधर वाघ, मु. पो. रानवड, ता. निफाड, जि. नाशिक


आम्ही ५ वर्षापासून द्राक्ष शेती करीत आहे. माझ्याकडे २ एकर सोनाका जातीची द्राक्ष बाग आहे. जमीन मध्यम प्रतीची असून लागवड ९' x ५' वर आहे. ऑक्टोबर २०११ मध्ये पिंपळगाव येथील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. ईश्वर शिंदे यांची भेट झाली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ऑक्टोबर छाटणी केल्यानंतर ३० लि. पेस्टला १ लि. जर्मिनेटर घेतले, परिणामी माझी बाग ५ वर्षात प्रथमच चालूवर्षी एकसारखी फुटली. नंतर पोंगा अवस्थेत असताना जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि.ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. परिणामी घडांची साईज मोठी झाली. गोळी घड जिरले नाहीत. शेंडा, पानांचा जाडी व रुंदी वाढली.

क्रॉंपशाईनर व राईपनरमुळे लगेच कलर

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटर, राईपनर, न्युट्राटोनचा डीपमध्ये वापर केला. परिणामी घडांची लांबी, फुगवण चांगली मिळाली. विशेष महत्त्वाचे म्हणजे चालू वर्षी मोठ्या प्रमाणावर दिर्घकाळ थंडी होती. त्यामुळे माझ्या प्लॉटला कलर येत नव्हता. माल घेण्यासाठी आलेला व्यापारी बाग बधून जात, पण मालास कलर नसल्यामुळे माल घेत नसे. २०रू. किलोने सुद्धा माल घेत नव्हते. तेव्हा आपल्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. त्यांनी प्लॉटची पाहणी करून मला क्रॉंपशाईनर, राईपनर प्रत्येकी १ लि. २०० पाणी याप्रमाणे २ स्प्रे ६ दिवसांच्या अंतराने करण्यास सांगितले. या फवारण्य केल्यानंतर मालास कलर आला. माझा विश्वास बसत नव्हता, एवढा कलर आला होता. कलर आल्यामुळे ३० रू. नी तो माल व्यापाऱ्यांनी घेतला. खरच डॉ. बावसकर सरांची टेक्नॉंलॉजी माझ्यासाठी वरदानच ठरली. त्याबद्दल सरांना धन्यवाद देतो.