वेळापत्रकाप्रमाणे सप्तामृत फवारणीने 'सिद्धीविनयक' शेवग्याच्या प्रत्येक झाडास १५० ते २०० शेंगा

श्री. संगमेश्वर प्रल्हाद साखरे,
मु.पो. काटगाव, ता. तुळजापूर, जि . उस्मानाबाद,
मोबा. ९७६३०३५०७१



माझ्याकडे कारगाव येथे ४॥ एकर जमीन तांबुसयुक्त मध्यम स्वरूपाची आहे. २ वर्षापुर्वी शिवाजीनगर कृषी प्रदर्शनात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी स्टोलवरून कृषी विज्ञानाचा अंक, शेवगा, डाळींब, द्राक्ष केळी अशी पाच पुस्तके घेऊन गेलो. त्याचे वाचन केले आणि मे २००९ मध्ये पुणे ऑफिसवरून सविस्तर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाची माहिती घेऊन एक एकर शेवगा लागवड करण्याचे निश्चत केले. त्यासाठी शेवगा १०० बियांची ८ पाकिटे, साप्तामृत प्रत्येकी एक लिटर आणि कल्पतरू १० किलोची बॅग घेऊन गेलो. जून २००९ मध्ये शेवगा रोपे (नर्सरी) तयार करताना बियाणे ४० मिली जर्मिनेटर आणि अर्धा लिटर पाणी यामध्ये भिजवून सावलीमध्ये वाळवून ४'' x ६'' चे पॉलिथीन पिशवीमध्ये निचरायुक्त मातीत कल्पतरू सेंद्रिय खत १ चहाचा चमचाभर मिसळून पिशव्या भरून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये बियाणे आडवे मातीआड केले. नंतर झारीने पाणी दिले आठवड्यामध्ये उगवण चांगली झाली. नंतर लागवड करतेवेळी ७०० रोपे लागवडी योग्य तयार झाली. त्यावेळी जर्मिनेटर १०० लिटर पाण्यासाठी २५० मिलीचे द्रावण करून आळवणी केले. सरांची सांगितल्याप्रमाणे दर तीन आठवड्याला सप्तामृतची फवारणी करत होतो.

झाडांना १५० ते २०० शेंगा लागल्या होत्या. सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारची शेंग माझे प्लॉटमधून निघत आहे. त्याची विक्री गावी स्वत: चे घरीच २ शेंगाला दर ५ रुपयेप्रमाणे होत असे.

आमच्या २ शेंगास ५ रू. प्रमाणे घरून विक्री इतरांना ४ ते ५ शेंगास ५ रू.

गावामध्ये दुसऱ्या शेंगा पाच रुपयेसाठी ४ ते ५ शेंगा घालतात. परंतु मला 'सिद्धीविनायक' शेवगा शेंगा घेण्यासाठी गिऱ्हाईक घरी येऊन दोन शेंगाना पाच रुपये देऊन घेऊन जातात. गावामध्ये दहा हजार लोकसंख्या असल्यामुळे गावात दररोज भाजी बाजार भरतो. वरील उत्पादन तयार करण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ची औषधे ८ वेळा येऊन स्वत: घेऊन गेलो व वेळोवेळी फवारणी केली . आज रोजी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर घेण्यासाठी आलो आहे.

जानेवारी २०१० मध्ये कांदा १८५० रू. क्विंटल

तीन वर्षापुर्वी जून २००९ मध्ये एन - ५३ कांदा ५०० ग्रॅमची २ पाकिटे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमधूनच घेऊन गेलो होतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे कांद्यासाठी तीन फवारण्या झाल्या होत्या. जात पाऊस असूनही ५० किलोच्या ३३ पिशवी कांदा उत्पादन मिळाले सिद्धेशवर मार्केट, सोलापूरला श्री. ढगे यांचे गाळ्यावर जानेवारी २०१० मध्ये विक्री केली. १८५० रू./ क्विंटलप्रमाणे विक्री झाल्यामुळे मला २५ हजार पाचशे अकरा रू. मिळाले. इतरांना मात्र दीड ते दोन एकरमध्ये सात ते आठ हजार रुपये मिळाले. हवामान खूपच खराब असल्यामुळे उत्पादनात सर्वत्र लाक्षणिक घट आली. मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आम्हाला चांगले उत्पादन मिळाले व पैसेही झाले.