गारपिटीने अनेक गोष्टी कळल्या, वळल्या, उमगल्या आणि तशी सुधारणापण केली

श्री. राजेंद्र रामभाऊ पालकर,
जायकवाडी वसाहत रोड, हरि ओम प्रोव्हिजन्स वडीगोद्री, ता. अंबड, जि. जालना,
मोबा. ९४२१६४८१४१ /८३०८५७५३४१


आमची एकून आठ एकर जमीन आहे. त्यापैकी २ एकरमध्ये राहण्याचे घर, जनावरांचा गोठा, विहीर आहे. या २ एकराच्या बाजूने २७० मोसंबीची झाडे, १० आंब्याची, १० जांभळाची, १० चिकूची, १० पेरू, १० सीताफळ, २० नारळ, २ बेल, २ उंबर, घरासमोर लिंबू आणि कंपाऊंडला १०० - १५० सागाची झाडे लावली आहेत. उर्वरीत सहा एकरमध्ये गेल्यावर्षी शेवगा लागवड केली आहे.

कोईमतूर -२ वाणाची आणि 'सिद्धीविनायक' शेवग्याची रोपे एकाचवेळी तयार केली. १६ - १७ मे २०१२ ला पिशवीत बी लावले. घरचाच गांडूळखत प्रकल्प असल्याने पिशव्यामध्ये २०० - २५० ग्रॅम माती आणि १०० - १५० ग्रॅम गांडूळ खत मिसळून पिशव्या भरल्या. बी लागवडीनंतर झारीने पाणी दिले. १ महिन्यात रोपे तयार झाली. नंतर २४ आणि २५ जून २०१२ रोजी ८ ' x ८' वर फुल्या करून ठिबकवर एकूण ३॥ एकर शेवगा लावला. त्यापैकी २।। एकर कोईमतूर आणि १ एकर 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा होता.

नंतर भाचीचे लग्न असल्याने आठवड्याचा काळ लोटला. त्यानंतर ३ जुलै २०१२ ला २।। एकरमध्ये उर्वरीत रोपे लावली. त्यापैकी १ एकर कोईमतूर तर १॥ एकर 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा होता. याची लागवड सकाळी केल्यानंतर अचानक दुपारी गारांचा पाऊस झाला, त्यामुळे त्या दिवशी लावलेल्या रोपांचे शेंडे मोडले. आठवड्यापुर्वी लावलेली ३॥ एकरातील रोपे सशक्त झाली होती. तसेच तेथे गारांच्या पावसाची तिव्रता कमी असल्याने त्या रोपांचे शेंडे मोडले नाहीत. त्याची वाढ जोमाने होत होती. शेंडा वाढ अधिक होती. वाढ चांगली असल्याने चांगले वाटत होते.

मात्र २॥ एकर गारपीटीने खराब झालेली रोपे त्यानंतर १ - १॥ महिना झाला तरी वाढत नव्हती. मुलगा म्हणू लागला हा प्लॉट मोडून टाकू. आम्हालाही काही सुचत नव्हते. पहिल्या ३॥ एकर प्लॉटची वाढ मात्र जोमाने सुरू होती. पाने हिरवीगार असल्याने यावर हिरव्या अळीचा प्रादुर्भाव झाला. गावातील दुकानातून यासाठी किटकनाशक आणून फवारले. त्याने आळी गेली नाही. नंतर नुवान फवारले, त्याने पानगळ झाली. त्या कालावधीत नाशिकला कामानिमित्त गेलो होतो. मार्केटयार्डला गाडी पार्क केली, तेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे ऑफिस दिसले, तेथून माहिती व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे औषध घेऊन गेलो.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने गारांनी झोडपलेला 'सिद्धीविनायक' शेवग्याचा प्लॉट चांगला फुटला

त्याची फवारणी दोन्ही प्लॉटवर केली. तर गारांनी झोडपलेला २॥ एकराचा प्लॉटदेखील चांगला वाढू लागला. अगोदर शेंडे मोडल्याने त्याला फुटवे जादा निघाले. यातील २।। एकर जमिनीत १॥ फुटावर मुरूम आहे. तर ३॥ एकरमध्ये ३॥ फुटाच्या खाली मुरूम आहे.

शेवगा कोणत्याही वाणाचा असो त्याला छाटणी फार महत्त्वाची असते हे आम्ही अनुभवले. कारण सुरुवातीला आम्हाला छाटणीबद्दल माहिती नव्हते. सुरुवातीला लावलेल्या ३॥ एकराचा प्लॉट जोमाने वाढत होता. त्याचे शेंडे न खुडल्याने नुसती शेंडा वाढ झाली. त्याला शेंगा लागल्या नाहीत.

नंतर लावलेल्या २।। एकर क्षेत्रावरील शेवग्याची छाटणी (शेंडा खुडणे) गारांच्या पावसाने झाल्याने त्याला डिसेंबरपासून शेंगा मिळू लागल्या. सुरुवातीला थोड्या प्रमाणात मिळू लागल्या. नंतर २ दिवसाड ७० ते १०० किलो कधी - कधी २॥ क्विंटलपर्यंत शेंगा निघत होत्या. जवळच्याच बाजारामध्ये शेंगांची विक्री करीत असे. बाजारभाव कमी १० ते १५ रू./किलो मिळाला. क्वचित ४० - ५० रू. भाव मिळाला. कुठल्याही पिकाची पैशात गणती केली नाही. उत्पादन महत्त्वाचे असते. भावाचे सांगता येत नाही.

२।। एकरात गारांच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात (३०%) तुट पडून देखील ७५ क्विंटल उत्पादन मिळाले. याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ५ - ६ फवारण्या केल्या. बाकी ३॥ एकराला शेंगा न लागल्याने पुन्हा फवारणी केली नाही. घरचेच गांडूळखत असल्याने सुरुवातीला सर्व ६ एकराला ४० ते ५० किलोच्या २०० बॅगा खत टाकले. बाकी काहीच वापरले नाही.

मार्चनंतर पाणी कमी झाल्याने जवळपास ५० क्विंटल शेंगा निघाल्या असत्या, त्या वाया गेल्या. सध्या ३॥ एकराची ज्यांची सुरुवातीला छाटणी न झाल्याने त्यांची शेंडेवाढे अवास्तव झाली. त्यामुळे त्यांना माल काहीच मिळाचा नाही. त्याची छाटणी करवतीने १ ते १।। फुटावरून केली. त्याचे नवीन फुटवे ३ ते ४ फूट झाले आहेत आणि ज्या २॥ एकर क्षेत्रातील शेवग्याचा माल चालू होता तो संपल्यावर छाटला आहे. त्याचे डोळे फूट लागले आहेत.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची शिल्लक औषधे थोड्या कपाशीवर फवारली, तर इतर कपाशीत व या कपाशीत एकाच फवारणीत फरक जाणवला. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फवारलेली कपाशीची वाढ इतर कपाशीपेक्षा ६ ते ७ इंच जादा होती. शिवाय ही कपाशी लाल पडली नाही. बोंडं आकर्षक होती. वेचणी एकाचवेळी केल्याने उत्पादनातील फरक काढता आला नाही. मात्र निश्चितच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उत्पादन वाढते हे एका फवारणीत जाणवले. म्हणून चालूवर्षी शेवगा व कपाशीला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी सुरूवातीपासून वापरणार आहे.