एका पोस्टमनने 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीचा बिनतारी - अंत:प्रेरणेन मित्रांना दिला संदेश !

श्री. भारत ज्ञानदेव कोळी, (पोस्टमन)
मु. पो. सालसे, ता. करमाळा, जि. सोलापूर.
मोबा. ९०११७३०७६५



ज्वाला मिरचीचे बी करमाळ्यावरून घेतले होते. बियाला जर्मिनेटर वापरले नाही. मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ७ - ८ वर्षापासून माहिती आहे. मात्र जर्मिनेटर माझ्याकडे शिल्लक नसल्याने वापरले नाही.

रोपे जून २०१२ ला ३ गुंठ्यामध्ये पोयटायुक्त मातीत ४' x ३' वर लावली. लागवडीनंतर दीड महिन्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पंचामृतची पहिली फवारणी केली. फुटवा भरपूर झाला. फुले भरपूर लागली. फलधारणाही चांगली झाली. रोग - किडींचा प्रादुर्भाव झाला नाही. १० :२६:२६ खत १५ किलो १ महिन्याचा प्लॉट असताना टाकले होते. याशिवाय कोणतेच खत वापरले नाही. त्यानंतर १॥ महिन्याने म्हणजे तोडे - चालू झाल्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पंचामृतची दुसरी फवारणी केली. एवढ्यावर २ ॥ महिन्यात मिरच्या चालू झाल्या. १ महिना हिरव्या मिरच्या विकल्या. ८ - १० दिवसाला तोड करीत होतो. हिरव्या मिरच्याचे ४ - ५ तोडे केले. तोड्याला २० - २५ किलो मिरची निघत होती. करमाळा मार्केटला २० रू. /किलो भाव मिळत होता. नंतर तोडा न करता मिरची लाल होऊ दिली. तिचे तोडे करून वाळवली तर ७५ - ८० किलो वाळलेली मिरची मिळाली. त्यातील काही घरी मसाल्यासाठी ठेवली, तर बाकीची गावातील गिऱ्हाईकांना १०० रू/ किलो दराने विकली.

आज मोरिंगा शेवग्याची २० पाकिटे आम्हा ३ शेतकऱ्यांसाठी घेऊन जात आहे. एक जणाला १० पाकिट ८' x ८' वर लावायची आहेत. दुसरा ६ पाकिटे ८ x ६' वर लावणार आहे आणि मी ४ पाकिट ८' x ८' वर लावणार आहे. तिघेही कापसामध्ये हा शेवगा लावणार आहोत. श्री. बागल यांचा बावडा. ता. इंदापूर (पुणे) येथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा 'सिद्धीविनायक' शेवगा प्लॉट मी ३ वर्षापुर्वी पाहिला, त्याला शेंगा भरपूर ७०० ते ८०० पर्यंत झाडावर लागलेल्या पाहून त्यापासून आम्हाला हा शेवगा लागवडीची प्रेरणा मिळाली.

यावर्षी 'सिद्धीविनायक' शेवगा व कापसाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी सुरूवातीपासून वापरणार आहे.