२० गुंठे कोथिंबीर ८ ते १० हजार पेंड्या १।। महिन्यात ५६ हजार

श्री. प्रकाश शंकरराव अतिग्रे,
मु. पो. वडणगे, ता. करवीर, जि . कोल्हापूर,
मोबा. ९५०३७९५७७४



यावर्षी १४ मार्च २०१२ रोजी कोथिंबीर ६० गुंठे केली होती. माझ्या प्लॉटलगतच काही कोथिंबीरीचे प्लॉट होते. आम्ही धना करतेवेळी जर्मिनेटरची प्रक्रिया केली होती. त्याच्यामुळे उगवण चांगली होऊन कोथिंबीर हिरवीगार होते. शेजारील प्लॉटमध्ये कोथिंबीर ही उन्हामुळे करपून मर रोगाने वाया गेली. त्यामुळे शेतकरी माझ्या कोथिंबीरीचे प्लॉट पाहण्यास येत होते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्यामुले कोथिंबीरीची पाने हिरवीगार हतो. देठाची जाडी मोठी होती. त्यामुळे कोथिंबीरीच्या पेंड्या कमी काड्यात होत होत्या. सध्या २० गुंठे प्लॉटमधील कोथिंबीरीची काढणी केली तर ८ ते १० हजार पेंड्या मिळाल्या. त्याला अॅव्हरेज दर ७ रू. / गड्डी मिळाला. याचे एकूण उत्पन्न ५६ हजार रुपये दिड महिन्यात २० गुंठ्यात मिळाले.

सध्या चालू प्लॉट ४० गुंठे आहे. तो पण अतिशय चांगला आहे. त्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी(अॅग्रो) प्रा. लि. कोल्हापूर या शाखेवरून वेळच्यावेळी श्री. विलास चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार सप्तामृत औषधांचा वापर करतो.

चालू लागण व खोडव्यास जर्मिनेटरच्या आळवणीने पांढऱ्या मुळीची संख्या अधिक

ऊस या पिकावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करत आहे. सध्या लागण १० गुंठे आणि खोडवा ३० गुंठे आहे. त्याला जर्मिनेटरची आळवणी केल्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या भरपूर वाढली असून फुटवा जोमाने निघाला आहे.