रेशीम तुतीच्या रोपांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी रामबाण !

श्री. प्रविण गोविंदराव निकम, (केंद्र प्रमुख),
रेशीम फार्म, आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग,
मोबा. ९४२१९७३९९९


आम्ही गेल्या ३ वर्षापासून रेशीम फार्म आंबोली येथील तुतीच्या नर्सरीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर, थ्राईवर आणि क्रॉपशाईनर वापरतो.

जर्मिनेटरमुळे तुतीच्या काड्यांचे स्प्राऊटिंग लवकर

प्रथम जर्मिनेटर १ लि. चे १०० लि. पाण्यामध्ये द्रावण तयार करून त्यामध्ये काड्या ५ ते १० मिनिटे बुडवून लावतो. तर १५ दिवसात ९५ ते १००% पर्यंत स्प्राऊटींग होते. एरवी त्यासाठी २१ ते २५ दिवस लागून काड्या फुटण्याचे व जगण्याचे प्रमाण कमी राहते.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने रेशीम तुतीच्या रोपांची उंची ४ ते ४।। महिन्यात २।। ते ३ फुट

स्प्राऊटींग झाल्यानंतर दर महिन्याला याप्रमाणे जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५०० मिली १०० ते १५० लि. पाण्यातून फवारतो. त्यामुळे नर्सरीची वाढ जोमाने होऊन पानांना तेज येते. या पद्धतीने ४ ते ४.५ महिन्यात २।। ते ३ फुट उंचीची लागवडीयोग्य रोपे तयार होतात. रोपांना पांढऱ्यामुळीचा जारवा अधिक फुटला जातो. त्यामुळे पुनर्लागवडीत रोपांची मर होत नाही. एरवी रोपे तयार होण्यास ५ ते ५.५ महिने लागतात. आंबोली भागात जून ते सप्टेंबर महिन्यात अधिक पाऊस होत असल्यामुळे रोपे जगत नाहीत. म्हणून जानेवारी - फेब्रुवारीमध्ये रोपे तयार करतो. ही रोपे आम्ही शासनाच्या योजनेमार्फत शेतकऱ्यांकडून एकरी १००० रू. भरून घेऊन ५५०० रोपे देतो. डॉ. बावसकर तंत्रज्ञान आम्ही कृषीविज्ञान केंद्र, कोल्हापूर येथून घेतो.