वेळापत्रकाप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर म्हणजे हमखास यश

श्री. तुकाराम जाधव,
मु.पो. पिंपळगाव खांब, ता. जि. नाशिक



आम्ही २ एकर कांदा लावला होता. रोप घरीच तयार केले होते. बीजप्रक्रियेच्या वेळेस जर्मिनेटर वापरल्यामुळे १००% उगवण झाली होती. तसेच पुनर्लागवडीच्यावेळी जर्मिनेटर २५० मिली + प्रोटेक्टंट ५० ग्रॅम + १० लि. पाणी या द्रावणात रोपे बुडवून लावली होती. त्यामुळे मर झाली नाही. शिवाय नेहमीपेक्षा रोपे लवकर वाढीस आली. कांदा लागवडीच्यावेळी कल्पतरू खत एकरी ४ बॅगा आणि १८:४६:० च्या दोन बॅगा दिल्यामुळे रोपांची वाढ जोमाने झाली. १५ ते २० दिवसाचा कांदा असताना जर्मिनेटर ६० मिली + थ्राईवर ६० मिली + क्रॉपशाईनर ६० मिली + प्रिझम ६० मिली + हार्मोनी १५ मिली + स्प्लेंडर १५ मिली/पंपास घेऊन फवारणी केल्यामुळे कांद्यावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. थ्रीप्सचा प्रादुर्भाव आटोक्यात होता. पातीला चांगली काळोखी आली. कांदा लवकर वाढीस लागला. त्यानंतर दिड मोहिन्याच कांदा असताना दुसरी फवारणी थ्राईवर ६० मिली + क्रॉपशाईनर ६० मिली + हार्मोनी २० मिली + स्प्लेंडर २० मिली/पंपास घेऊन फवारणी केली. त्यानंतर ६० दिवसांचा कांदा असताना शेवटची तिसरी फवारणी थ्राईवर ५० मिली + क्रॉपशाईनर ७० मिली + राईपनर ७० मिली + न्युट्राटोन ७० मिली + हार्मोनी २० मिली/पंप याप्रमाणे फवारणी केल्यामुळे कांद्याची फुगवण जबरदस्त झाली. कांदा एकसारखा पोसला. सर्व कांदा डबल पत्तीचा मिळून पत्तीला आकर्षक चमक आली.