दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी हा रामबाण उपाय !

श्री. शरद माणिक पवार,
मु.पो. मणेराजुरी, ता. तासगाव, जि. सांगली


माझी २ एकर बाग असून १ एकर साधी सोनाका ४ वर्षाची ८' x ४' वर लावलेली आणि १ एकर सुपर सोनाका १ वर्षाची ९' x ५' वर लावलेली द्राक्ष बाग आहे. जमीन माध्यम प्रतीची आहे.

गेली ४ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरतो. एप्रिल व ऑक्टोबर छाटणीमध्ये सातत्याने वापर करीत असल्याने द्राक्ष बागेत येणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका होते. मी एप्रिल छाटणी घेतो त्यावेळी कोणत्याही परिस्थितीत वातावरणामध्ये बाग छाटल्यानंतर जर्मिनेटर ५०० मिली + प्रिझम ५०० मिली + किटकनाशक + १०० लि. पाणी असे साध्या पंपाने ओलांड्याच्या दोन्ही बाजूस सकाळी ६ ते ७ वा. च्या दरम्यान फवारणी घेतो. त्यामुळे जाड ओलांडे तसेच काही लांब ओलांडे असूनसुद्धा ओलांडयातून एकसारखी व जोमदार फुट निघते. पाणी कमी असून सुद्धा बाग फुटण्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही.

नंतर ३० दिवसानंतर थ्राईवर ३०० मिली + क्रॉपशाईनर ५०० मिली + किटकनाशक + बुरशीनाशक + १०० लि. पाणी याप्रमाणात (सबकेन शेंडा मारल्यानंतर ) फवारणी घेतो. त्यामुळे सबकेन चांगले फुटते. पाने जाड व रुंद होतात. शेंडा चांगल्या पद्धतीने वाढतो. द्राक्षाची काडी लांबडी न पडता काडी तयार होण्यास मदत होते.

त्यानंतर ३० दिवसांनी थ्राईवर ४०० मिली + क्रॉपशाईनर ५०० मिली + किटकनाशक + बुरशीनाशक + १०० लि. पाणी यांची फवारणी घेतल्याने काडीची पक्वता जलद व पुर्ण मिळून काडीचे डोळे शेंगदाण्याहून मोठे होऊन कोचीदार बनतात. तसेच ऑक्टोबर छाटणीपर्यंत पाने हिरवीगार व निरोगी राहतात व पानगळ होत नसल्याने आपणास आवश्यक त्यावेळी फळ छाटणी घेता येते. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे द्राक्ष वेलीमध्ये गर्भधारण होण्यामध्ये कोणतेही संजीवक किंवा हार्मोन्स व्हिटॅमिन किंवा कोणतीही इतर पोषक औषधे न मारताही फक्त डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे तंत्रज्ञान वापरून १००% वेलीमध्ये गर्भधारणा होते. याचा मला ४ वर्षापासून अनुभव येत आहे.

ऑक्टोबर छाटणी - दरवर्षीप्रमाणे ऑक्टोबर छाटणीला पेस्टमध्ये जर्मिनेटर वारपले. बाग चांगली फुटली, परंतु मला काही कंपनीच्या लोकांनी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी न वापरता इतर औषधांचा सल्ला दिला. इच्छा नसताना सुद्धा सरांची औषधे न वापरता दुसऱ्या कंपनीची औषधे एक बदल म्हणून वापरली. मात्र त्याचा असा परिणाम झाला की, छाटणीनंतर १५ - २० दिवसांनी बागेत डावण्या मोठ्या प्रमाणात आला आणि माझी पुर्ण बाग रोगाला बळी पडली. त्यामुळे १ वर्षाचे पीक वाया जाईल अशी भिती निर्माण झाली. त्यावेळी लगेच डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी श्री. विलास पाटील (मो. ९८२२६१६९५१) यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसार डबल छाटणी घेतली. सुरुवातीला पुढील (शेंड्याकडील) ५ डोळ्यावर पेस्ट लावली होती. मग तेथून कटींग करून (छाटून) खालील राहिलेल्या ३ - ४ डोळ्यांना पेस्ट लावली. झाडांचे स्टोअरेज कमी झालेले असताना सुद्धा पेस्टमध्ये जर्मिनेटर व प्रिझम वारपले असता बाग पहिल्यासारखी जोमदार फुटली व पुर्वीच्या अनुभवानुसार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे पुन्हा वापरण्यास सुरुवात केली.

डबल छाटलेल्या बागेलाही एका काडीला २ ते ३ घड मिळत राहिले. त्यामुळे गर्भधारणेला (एप्रिल छाटणीमध्ये) कोणतीही औषधे न वापरताही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांमुळे फळधारणा (गर्भधारणा) निश्चित मिळते. तसेच हार्मोनी हे औषध इतर औषंधासोबत ५ - ६ दिवसांच्या अंतराने ४ ते ५ वेळा फवारले असता डावणीवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळू शकते. थ्राईवरचा वापर केल्याने पान जाड व रुंद होऊन रोग प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते, द्राक्ष घड जोमदार व अणकुचीदार बनतात व घडाचा पोत सुधारून घडाच्या आकारमानात चांगली वाढ होते. तसेच क्रॉपशाईनरच्या वापराने पानांवर तेलकट असे नौसर्गिक आवरण तयार होते. पानांना चकाकी येते. त्यामुळे इतर येणाऱ्या रोगास अटकाव चांगल्या पद्धतीने होतो. माल तयार होण्याच्या अवस्थेमध्ये मालास शायनिंग, लस्टर व किपींग क्वॉलिटी मिळते. मणीसेंटींग नंतर राईपनर या औषधाचा वापर केल्यानंतर थंडीमध्ये माल (घडांची संख्या) जास्त असताना सुद्धा द्राक्ष मण्यांस कलर अतिशय चांगल्या पद्धतीने येतो. फुगवणीमध्ये साखरेचे प्रमाण वाढून वजनामध्ये १० - १५% वाढ होते. आस माझा अनुभव आहे.

तरी सर्व शेतकरी बांधवांनी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या द्राक्ष बागा निरोगी व उत्पादनक्षम ठेवून त्यापासून उत्कृष्ट दर्जेदार माल तयार होतो, याचा अनुभव घ्यावा.