अर्धा एकरात टोमॅटोपासून १ लाख नफा

श्री. सोमनाथ बजरंग शिंदे,
मु. पो. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे,
मो. ९९७५५९६४३५


मी ४ ते ५ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर टोमॅटो, बटाटा, फ्लॉवर, कोबी या पिकांना करित आहे. मागील वर्षी मी एप्रिल मध्ये टोमॅटोची लागवड केली. सर्वप्रथम टोमॅटोचे बियाणे जर्मिनेटरचे द्रावणामध्ये भिजवुन लावल्यामुळे उगवण १००% झाली. नंतर मी लागवडीला कल्पतरुचा वापर केला. नंतर जर्मिनेटर + थ्राईवर + क्रॉंपशाईनरच्या वेळोवेळी फवारण्या केल्या. त्यामुळे पिकांवर कोणत्याही रोगाचा किंवा किडीचा जास्त प्रादुर्भाव जाणवला नाही. तसेच प्रिझममुळे भरपुर फुटवा निघाला. नंतर फळे लागल्यानंतर मी फुगवणीसाठी राईपनर + न्युट्राटोनची फवारणी घेतली असता फळांच्या आकारामध्ये वाढ होऊन चांगल्या प्रतीचा माल निघाला. त्यामुळे बाजारभाव सुद्धा चांगला मिळाला. अर्धा एकर क्षेत्रामध्ये ४५० ते ५०० कॅरेट माल निघाला व खर्च वजा जाता १ लाख रुपये उतपन्न मिळाले. त्यामुळे मी चायनीज भाजीपाला पिके करत असताना त्यावरही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर करीत आहे. तसेच बटाटा, कोबी, फ्लॉवर अशा वेगवेगळ्या पिकांवर मी या औषधांचा वापर करून चांगले उत्पन्न मिळविले आहे.