संशोधनाची वाटचाल - मिरची, झेंडू, कलिंगड व ऊस पिकांत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कर्नाटकात केली क्रांती

श्री. विलासराव यादवराव पाटील,
मु. नेलवाड, पो. तुगाव, ता. भालकी, जि. बिदर. (कर्नाटक)
मो. ०९७३१०५१३६३



४ - ५ वर्षापुर्वी आम्ही निर्मल मैना - १२ वाणाची मिरची उन्हाळ्यात १ एकरमध्ये लावली होती. जमीन भारी काळी आहे. त्यामध्ये १० ट्रेक्टर शेणखत लागवडीपुर्वी टाकले होते. लागवड ३' x ३' वर होती. पाणी पाटाने देत होतो.

माल चालू झाल्यानंतर २ - ३ वेळा माल मार्केटला गेल्यानंतर त्या झाडांची अचानक पानगळ सुरू होऊन फक्त काड्याच राहिल्या. झाडे वठू लागली. त्यावेळी भाव ३० ते ४० रू./ किलो होता. व्यापारी माल आणा म्हणून फोन करत होते. भाव चांगले असताना अचानक झाडे वाळल्याने खूप नाराज झालो होतो. निर्मल मैना - १२ या मिरचीचे भरपूर उत्पादन मिळविल्याची एका शेतकर्‍याची मुलाखत शेती मासिकात वाचल्यावर ही मिरची लावली होती. तेव्हा उत्पादन मिळविण्यासाठी सुरुवातीपासूनच भरपूर खर्च केला होतो. मात्र या मिरचीचे २ - ३ तोडे झाल्यावरच झाडे खराब झाल्यामुळे काय करावे हे सुचत नव्हते. त्या अवस्थेत डॉ. बावसकर सरांना फोन करून यावर उपाय विचारला असता सरांनी सांगितले, काही काळजी करू नका, या तंत्रज्ञानने प्लॉट पहिल्यापेक्षाही बहारदार होऊन खात्रीशीर उत्पादन मिळेल. यासाठी सप्तामृताच्या फवारण्या घ्या. तेव्हा सप्तामृत औषधांवर २५०० रू. खर्च केला. खर्च करताना उत्पन्न निघेल की नाही याबद्दल मला खात्री नव्हती, परंतु बाजारभाव चांगले असल्याने आणि अगोदरचा खर्च निघण्यासाठी हा प्रयोग केला.

पाटील एवढा माल तुम्ही रोज आणता, व्यापारी आहात का ?

आश्चर्य म्हणजे या तंत्रज्ञानाने मिरचीला पुन्हा फुट निघून महिन्यात मिरचीचे तोडे चालू झाले. झाडे एवढी बहरली की, दररोज १० ते १२ पोती (५० ते ६० किलो वजनाची) मिरची निघू लागली. आठवड्याभरात एक एकर क्षेत्राचा एक तोडा पुर्ण होऊ लागला.आठवड्याला ६० ते ७० पोती अशी १॥ महिना मिरची चालली. मात्र नंतर भाव कमी झाल्याने ८ ते १० रू. किलोपर्यंत भाव मिळाला. दररोजची १० ते १२ पोती मिरची पाहून हैद्राबाद मार्केटचे व्यापारी म्हणू लागले, "पाटील एवढा माल दररोज आणत आहात तुम्ही व्यापारी आहात काय ?" तेव्हा मी त्यांना सांगितले ही माझ्या शेतातील मी पिकविलेली एक एकरातील मिरची आहे.

आपले पॉलीहाऊस कोठे आहे ?

आम्ही ३ वर्षापुर्वी इंका ऑरेंज झेंडू १ एकर ५ गुंठ्यामध्ये लावला होता. त्याला मिरचीच्या अनुभवावरून सुरूवातीपासून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या १० दिवसाला फवारण्या घेत होतो. प्लॉट नजर लागेल असा अप्रतिम होता. मार्केटला फुले नेण्याच्या २ दिवस अगोदर क्रॉंपशाईनरची फवारणी घेत होतो. त्यामुळे फुलांना आकर्षक चकाकी येऊन अधिक काळ फुले टवटवीत ताजी राहत होती.

ही फुले दिवाळी ते तुळशीची लग्न या कालावधीत विकली. दिवाळीला (लक्ष्मीपुजन) जाळीची साधारण ६० पोती (२५ ते ३० किलो वजनाची) फुले निघतील असा माझा अंदाज होता. त्यासाठी भाड्याचा टेम्पो केला. मात्र झेंडूची फुले तोडल्यावर १५० पोती भरली. आता ऐनवेळी करणार काय? म्हणून टेम्पोत बसवून राहिलेली पोती टपावर बांधली. आमचा टेम्पो हैद्राबाद मार्केटला गेल्यावर व्यापार्‍यांची टेम्पोभोवती गर्दी केली आणि झेंडूची पोती खरेदी करण्यास चढाओढ सुरू झाली. ५० ते ६० रू. किलोचा भाव मिळू लागला. काही पोती उघडून ठेवली. तर किरकोळ व्यापार्‍यांनी ६० रू. भावाने हातोहात घेतली. रिकाम्या पोत्याचे २० रू. आणि जेवढे वजन भरले त्यानुसार पैसे घेत होतो. हैद्राबाद मार्केटच्या परिसरातील गावांत बरेचसे पॉलीहाऊस आहेत . तेथून फुले मार्केटला येतात. व्यापारी आपल्या झेंडूची क्वॉलिटी पाहून म्हणू लागले, आपले पॉलीहाऊस कुठे आहे. तेव्हा त्यांना मी सांगितले आमचे कोठेही पॉलीहाऊस नाही हा झेंडू ओपन प्लॉटमधील आहे. या झेंडूचे लक्ष्मीपुजन ते तुळशीची लग्न याकाळात १॥ लाख रू. झाले.

इतरांपेक्षा आमचे कलिंगड उत्तम !

आम्ही २॥ एकरमध्ये मधुबाला कलिंगड पहिल्यांदाच लावले होते. आमच्या गावातील एक शेतकरी बाराही महिने कलिंगड लावतो. मी कलिंगड लागवडीपुर्वी माहिती घेण्यासाठी या शेतकर्‍याकडे गेलो. त्यांनी सांगितले, "या पिकाला व्हायरसचा प्रादुर्भाव होतो, तुम्हाला हे पीक साधणार नाही, तेव्हा कलिंगड लावू नका." तरीही मी कलिंगड घेण्याचे ठरवून लागवड २॥ एकरात केली. त्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी सुरूवातीपासून वापरले. गावातील इतरांचे प्लॉट त्यावेळी खराब हवामानाने गेले. काहींचे आले तेव्हा आमची आणि त्यांची फळे मार्केटला गेल्यावर तेथे कलिंगडाचे ढीग लावले जातात. तेथे व्यापारी फळ आतून कसे आहे यासाठी ढिगातील कोणतेही कलिंगड काढायला लावून फोडून दाखवायला सांगतात. त्यानुसार भाव ठरतो. तर गावातील आमच्या ३ शेतकर्‍यांचे कलिंगड मार्केटला आले होता. व्यापार्‍याने एका शेतकर्‍यास फळ फोडायला लावले, जे फळ फोडले ते आतून पांढरेच निघत. दुसरा जो शेतकरी होता तो बाराही महिने कलिंगड करणारा होता, तर त्याची फळे आतून लाल निघाली, मात्र फळे आकाराने लहान - मोठी व वेडीवाकडी होती. त्यामुळे त्यांना भाव कमी मिळत होता.

आमच्या ढिगामध्ये फळे एकसारखी होती. व्यापार्‍याने सांगितलेले कोणतेही फळ फोडले तरी ते लालभडकच व गोड, रवाळ गराचे निघत होते. त्यामुळे भावही जादा मिळाला. बाराही महिने कलिंगड लावणारा शेतकरी आमच्या मालाजवळ येउन म्हणाला, "पाटील माल खुप चांगला पिकविला, आम्ही बाराही महिने कलिंगडाची लागवड करत असून चांगल्याच्या घरी बिलींदर जन्माला यावीत अशी आमची फळे आहेत."

आमच्या भागात १८०५ उसाची लागवड केली जात आहे. मात्र चालू वर्षी सर्वांनाच एकरी ४० टनापेक्षा कमी उत्पादन मिळाले. आमच्या घरी लग्नाची लगबग होती, त्यामुळे ऊस शेतीकडे फारसे लक्ष देऊ शकलो नाही. लागवडीच्यावेळी फक्त जर्मिनेटर वापरले होते. त्यामुळे उगवण चांगली झाली, मात्र ऊस २- ३ महिन्याचा असताना उसच्यावर तण गेले होते. त्यामुळे उत्पादनात घट येणे सहाजिकच होते. आम्हाला २। एकरात ९० टन उतार मिळाला. तेव्हा आज (४ फेब्रुवारी २०१३) उसाचे उत्पादन वाढीसाठी सरांचा सल्ला घेण्यास आलो आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे एकरी १५ ते २० टन उत्पादन जरी वाढले तरी आम्ही समाधानी आहोत. कारण आमच्याकडे लागण व खोडव्याचा असा एकून १० एकर ऊस आहे. म्हंजे १० एकरातून २०० टन जरी उत्पादन जादा मिळाले, तरी त्याचे ६ लाख रू.होतील. मग या तंत्रज्ञानावर १॥ - २ लाख रू. खर्च करण्यास काय हरकत आहे असा आमचा विचार आहे. यंदा पाण्याची टंचाई सर्वत्र जाणवत आहे. आम्हाला मात्र सुदैवाने भरपूर पाणी आहे. तेव्हा उसाला भाव ३ हजार रू. टन हमखासच राहणार आहे.

मी अनेक शेतकर्‍यांना डॉ.बावसकर तंत्रज्ञानाविषयी माहिती देऊन वापरण्यास सांगतो. जर्मिनेटरबद्दल माझे स्वत:चे औषध असल्यासारखी खात्री देतो. फरक नाही पडला तर मी खर्च देतो एवढी हमी घेतो. एवढे जबरदस्त रिझल्ट आम्ही या तंत्रज्ञानाचे अनुभवले आहेत.