पोपट - पक्षी, माकडे व उंदरांवर नाविण्यपूर्ण उपाय !

श्री. विलास पितांबर पवार,
मु. पो. काळखेडे, ता. जि. धुळे - ४२४००१,
मोबा- ९६५७३११७११



मी बी. ए. शिक्षण घेतले असून मिटकॉन येथे नोकरी करीत होतो. त्यानंतर २ वर्षापुर्वी नोकरी सोडून गावाकडील शेती आधुनिकतेने करू लागतो. यामध्ये प्रथम १ एकर मुरमाड हलक्या जमिनीत जून २०११ मध्ये भगवा डाळींबाची १२' x १०' वर लागवड केली. इनलाईन ड्रीप आहे. या डाळींबाला शेणखत वापरले आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे गरजेप्रमाणे स्प्रे घेतले.

सध्या झाडे ६ फूट उंच असून ४ ते ६ फुटाचा घेर आहे. या झाडांचा पहिलाच बहार धरण्यासाठी नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये ताण दिला. मात्र डिसेंबरमध्ये एकदा आणि जानेवारीत एकदा मोठा अवकाळी पाऊस झाल्याने पानगळ होत नाही. छाटणी केली तरी हत्ती सोट (Water Shoots) भरपूर येत आहेत. पाने हिरवी आहेत. यासाठी सरांचा सल्ला घेण्यास आज (११ फेब्रुवारी २०१४) आलो आहे. सरांनी सांगितले 'डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने' १४ जानेवारीला हमखास कळी निघते. मात्र अवकाळी पावसाने प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्याने बागेला ताण बसला नाही. थंडी असल्याने हवेत गारवा, पाऊस झाल्याने जमिनीत गारवा यामुळे जमीन कडक झाली आहे. त्यामुळे पांढरीमुळी मुकी झाली आहे. त्यासाठी नेहमीच्या प्रमाणापेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रमाण वाढवून घ्यावे लागेल. त्यासाठी प्रथम प्रत्येक झाडांना आता कल्पतरू २ किलो देऊन जर्मिनेटर १।। लि. आणि प्रिझम १।। लि. चे २०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग करा आणि जर्मिनेटर १।। लि. + प्रिझम १।। लि. + थ्राईवर १।। लि. + क्रॉंपशाईनर २ लि. + प्रोटेक्टंट १ किलो + स्प्लेंडर ३०० मिली + हार्मोनी ६०० मिलीची २०० लि. पाण्यातून फवारणी करा. अशी वैशिष्ट्यपूर्ण प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास देशातील शेतकऱ्यांनी याप्रमाणे अवलंब करावा, म्हणजे अतिपावसाने, अति थंडीच्या लाटेमुळे इच्छा नसताना झाडांना वांझ फुट निघत आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने एरवी १४ जानेवारी ला निघणारी कळी अशा प्रतिकूल परिस्थितीत वरील प्रमाणातील औषधांच्या वापराने १७ मार्चपर्यंत हमखास निघेल. "कळी निघाल्यानंतर 'डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दुष्काळावर मात करणारे डाळींब ' पुस्तकात दिलेल्या फवारण्या पुढे नियमित करणार आहे.

आमची दुसरी समस्या म्हणजे गेल्यावर्षी बहार न धरता काही प्रमाणात फळे लागली होती. मात्र आमच्या संपुर्ण गावात कापूस पीक घेतले जाते. तेथे फक्त माझी व माझ्या मित्राची अशी दोघांचीच डाळींब बाग आहे. त्यामुळे फळे सेट झाल्यानंतर पोपटांचा मोठा त्रास होतो. पोपटांनी अशी फळे खाऊन जवळपास ७०% फळांचे नुकसान होतेय. पोपटांचे थवेच्या थवे आहेत. बागेच्या कडेने कडूनिंबाची झाडे आहेत, त्यावर येवून बसतात.

यावर साधा उपाय म्हणून सरांनी सांगितले, "आपल्याकडे ज्या जुन्या ऑडीओ टेप असतात त्या बागेमध्ये तिरप्या वाऱ्याच्या आडव्या दिशेने बांधाव्यात म्हणजे त्याचा वाऱ्याच्या झोताने विशिष्ट आवाज येतो व त्याने पक्षी उडून जातात. त्याचप्रमाणे अॅल्युमिनीयम फॉईलच्या पट्ट्या १० ते १५ फुट लांबीच्या घेऊन त्या नायलॉन दोरीने बागेत बांधाव्यात, म्हणजे सुर्याच्या प्रकाशाने त्या चमकतात, त्यामुळे माकड, रानडुक्कर, पोपट पळून जातात असा अनुभव आहे.

आमची तिसरी समस्या म्हणजे शेतात उंदीर भरपूर आहेत. त्यामुळे पिकाचे नुकसान होते. त्यावर सरांनी एक नोव्हेल्टी उपाय सुचविला की, " ग्लॅरिसिडीयाची हादग्याच्या आकाराची जांभळी - पांढरट फुले असतात. ती उंदरांच्या बिळाजवळ ठेवली असता उंदीर पळून जातात".

आज सरांच्या वरील मार्गदर्शनाबरोबरच 'सिद्धीविनायक' शेवग्याची ३ पाकिटे बियाणे घेऊन जात आहे. त्याचा प्रयोग सरांच्या मार्गदर्शनाने यशस्वी करणार आहे.