उसाचा उतारा ७५ ते ८० टन , गव्हाचा उतारा एकरी २० क्विंटल

श्री. संजय विठ्ठल जाधव,
मु. पो. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा. ९९६०८८४८२२


मी 'कृषी विज्ञान' मासिकाचा ५ - ६ वर्षापासून वर्गणीदार असून तेव्हापासून मी ऊस व गहू पिकांवर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे, त्याचे मला अतिशय चांगले रिझल्ट मिळत आहेत.

माझ्याकडे एकूण १६ एकर जमीन असून त्यामधील ८ एकरमध्ये आडसाली गहू करतो. उसाला बेणेप्रक्रियेच्यावेळी जर्मिनेटर न चुकता वापरतो. त्यामुळे उगवण लवकर होऊन फुटवे भरपूर निघतात. पुढे १ -१ महिन्याचा अंतराने सप्तामृतातील जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंटचे फवारे घेत असतो, त्यामुळे उसाच्या फुटव्यांची वाढ अतिशय जोमाने होऊन पाने मोठी, रुंद हिरवीगार तयार होतात. उसाला वेगळाच 'लूक' येतो. त्यामुळे गावातील ऊस उत्पादक शेतकरी विचारतात, ऊस एवढा भारी कसा काय? मला दरवर्षी या तंत्रज्ञानाने एकरी ७५ ते ८० टन उतारा मिळतो.

गहू ग्रिनगोल्ड -२३ वाणाचा असतो. गहू नोव्हेंबरमध्ये पेरतो. गव्हालादेखील बिजप्रक्रीये पासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतो. गहू उगवल्यानंतर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५० मिली/पंप याप्रमाणे १५ दिवसांचा असताना पहिली फवारणी करतो. त्यामुळे गव्हालादेखील फुटवे जास्त फुटतात. त्यानंतर १ - १।। महिन्याचा गहू झाल्यावर दुसरी फवारणी थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंटची करतो. त्यामुळे मावा येत नाही किंवा तांबेरा रोग पडत नाही. इतरांच्या गव्हावर मात्र रोग येतो. त्यामुळे त्यांचे उत्पादनात घट तर येतेच शिवाय दर्जाही ढासळतो. या दुसऱ्या फवारणीने आपल्या गव्हाचे फुटवे वाढून पोटरीत येतो. त्यानंतर गहू निसवल्यावर थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर फवारतो. त्यामुळे ओंबीची लांबी वाढते, दाणे भरतात. अशा पद्धतीने एकरी २० क्विंटल उत्पादन मिळते.

यंदा ६ एकर गहू केला आहे. त्याला २ फवारण्या झाल्या आहेत. सध्या गहू पोटरीत आहे. उरलेल्या २ एकरपैकी १ एकरमध्ये प्रथमच भेंडी लावणार आहे. भेंडीला उन्हाळ्यात बाजार चांगले असतात. भेंडीतील आम्हाला अनुभव नाही. पहिल्यांदाच करत असल्याने आज (१६/०२/१४) फोनवरून सरांचे मार्गदर्शन घेतले. भेंडीलादेखील सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे.