डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची २ औषधे अर्ध्यातून वापरून ५०० संत्र्यापासून २ लाख सर्व तंत्रज्ञाना वापरल्यावर नफाच नफा

श्री. प्रविण माणिकसिंग बद्रटिये,
मु.पो. हराम, ता. अचलपूर, जि. अमरावती.
मोबा. ७७२१८५४५०५


माझ्याकडे एकूण १८ एकर काळी कसदार जमीन आहे. त्यातील १३ एकरमध्ये १६' x १६' वर जून २००७ मध्ये नागपूर संत्रा लावली आहे. सुरूवातीला खड्डे खोदून शेणखत १ - १ घमेले टाकून पारंपारिक पद्धतीने लागवड केली. त्यानंतर ४ - ५ वर्ष पारंपारिक पद्धतीने फक्त पाणी व गरजेपुरते रासायनिक खत देवून वाढ केली. यातील काही झाडांची मर होऊन सध्या एका प्लॉटमध्ये ८०० आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये ५०० अशी एकूण १३०० झाडे आहेत.

जानेवारी २०१४ मध्ये या बागेतील संत्रा विक्रीस पुणे येथे आलो असता डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ऑफिसमध्ये संत्रा पिकाविषयी सविस्तर माहिती व त्याविषयी डॉ.बावसकर तंत्रज्ञाना ची माहिती घेवून पुढील बहार फुटण्यासाठी प्रिझम व बहार फुटल्यानंतर पुढे माल पोसण्यासाठी न्युट्राटोन असे प्रत्येकी १० लि. घेवून गेलो. फेब्रुवारी २०१४ च्या पहिल्या आठवड्यात प्रिझम १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे ५०० झाडांवर फवारणी केली. त्यानंतर एक महिन्याने मार्च २०१४ मध्ये त्याच झाडांवर पुन्हा वरीलप्रमाणेच प्रिझमची फवारणी केली. त्यामुळे इतर ८०० झाडांपेक्षा या ५०० झाडांवरील फूट चांगली निघून कळी सेटिंग झाले. नंतर इतर रासायनिक व जैविक औषधांचा वापर करत असताना न्युट्राटोन १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे फळे लिंबू आकाराची असताना जून २०१४ पासून ८ - ८ दिवसांनी दोन वेळा फवारणी केली. त्यानंतर पुन्हा सप्टेंबरमध्ये न्युट्राटोनची वरीलप्रमाणेच तिसरी फवारणी केली. तर इतर ८०० झाडांमध्ये फळगळीचे प्रमाण जास्त जाणवले त्यामुळे ८०० झाडांपासून फक्त २ लाख रुपयेच झाले आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरलेल्या या ५०० झाडांवरील गळ फारच कमी होती. शिवाय फळांना शाईनिंग जास्त आली. फळांची साईज २०० ग्रॅमच्या दरम्यान मिळाली. आज २४ जानेवारी २०१५ रोजी या दोन्ही बागांमधील माल गुलटेकडी, पुणे मार्केटला लक्ष्मीनारायण ट्रेडिंग कंपनी, गाळा नं. ६६१ यांच्याकडे विकला. ५०० झाडांवर चांगला माल लागला. तो ४०० ते ५०० रू./क्रेट (२० - २२ किलो) भावाने गेला. तर फक्त ५०० झाडांपासून २ लाख रुपयाची संत्री मिळाली. अचलपुरला १० - १२ रुपये किलो भाव मिळतो. प्रिझम व न्युट्राटोनच्या फवारण्याने एवढा फरक पडत असेल तर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची बाकी ७ ही औषधे वापरली तर किती फरक पडेल या विचाराने आता पुढील व्यास्थापनासाठी सरांशी चर्चा करण्यास आलो आहे. पारंपारिक पद्धतीने संत्रा चालू होण्यास ५ वर्ष लागतात. तेथे सरांनी सांगितले, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ३ वर्षात बऱ्यापैकी माल निघून ४ थ्या वर्षापासून चांगले उत्पादन चालू होते.

माझा आदीमाया शक्ती नावाने हराम गावात गाळा

संत्रा एकापेटीला माल तोडणी, पेटी विकत घेणे, प्रतवारी, ट्रान्सपोर्ट धरून २०० रू. खर्च येतो. तेलाचे भाव आखाती राष्ट्रात उतरल्याने त्यांचे उत्पन्नांचे स्त्रोत कमी झाले आहेत. दिल्ली, लुधियानाला थंडीमुळे माल खपत नाही. निर्यात बंदी असल्याने मागणी कमी आहे. माझा अचलपूर तालुक्यात हराम गावात आदीमाया शक्ती नावाने स्वत:च्या जागेत गाळा आहे. रोज ३ गाड्या संत्रा माल आमच्याकडे येतो. मी पुर्ण हंगामात २०० गाड्या माल विकतो. मी स्वत: शेतकरी असल्याने कस लावून मालाची विक्री करतो. अचलपूरवरून तामिळनाडू, केरळ, बांग्लादेश तेथे माल जातो. बांग्लादेशला किलोवर संत्रा जातो. आडते १२ ते २० रुपयाने जागेवरून माल घेतात. तो बांग्लादेशात ६० रू. पासून १०० रू. पर्यंत विकतात. अचलपूरमध्ये जवळपास १० हजार एकर क्षेत्र संत्र्याखाली आहे. जंबोरीवर रंगपूर लाईम संत्रा असते. येथील जमीन काळी कसदार असून लागवड १८' x १८' वर जून ते ऑगस्टपर्यंत केली जाते. जंबोरीचे ३० ते ६० रुपयेपर्यंत कलम देतात. अचलपूरला मळगे नर्सरीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतात.